Join us

पापड कांद्याची चटणी - पावसाळ्यात त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा आला तर करा ही झटपट चमचमीत चटणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2023 11:59 IST

Papad Onion Chutney - Side Dish for Meal जेवताना तोंडी लावण्यासाठी हवीच पापड कांदा चटणी

भारतीय थाळी लोणचे, पापड, चटण्यांशिवाय अपूर्ण आहे. यामुळे जेवणाची रंगत तर वाढतेच, व दोन घास एक्स्ट्रा पोटात जातात. त्यामुळे जेवताना ताटात तोंडी लावण्यासाठी चटणी हवीच. पापड हा सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे. पापड रोस्ट किंवा तेलात फ्राय करून केले जाते. पण आपण कधी पापडाची चटणी खाऊन पहिली आहे का?

पापड कांदा चटणी ही महाराष्ट्रात फार फेमस आहे. ही चटणी आवडीने खाल्ली जाते. पापड कांद्याची चटकदार चटणी चवीला तर भन्नाट लागतेच, बनवायला देखील सोपी आहे. जर आपल्या घरात भाजी उपलब्ध नसेल किंवा, रोजची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर, पापड कांद्याची चटकदार चटणी करून पाहा(Papad Onion Chutney - Side Dish for Meal).

पापड कांदा चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य

उडीद डाळ पापड

शेंगदाणे

हिरवी मिरची

लसूण

जिरं

मोहरी

इडलीसाठी डाळ-तांदूळ भिजवताना त्यात घाला १ पांढरीशुभ्र ‘सिक्रेट’ गोष्ट, इडली होईल मऊ-हलकी

कांदा

मीठ

टोमॅटो

कोथिंबीर

कृती

सर्वप्रथम उडदाच्या डाळीचे पापड गॅसवर भाजून घ्या, व एका बाऊलमध्ये त्याचा चुरा तयार करा. खलबत्यात एक वाटी भाजलेले शेंगदाणे, ४ ते ५ हिरव्या मिरच्या, ५ ते ६ लसणाच्या पाकळ्या, २ चमचे जिरं घालून कुटून घ्या. हिरव्या मिरच्यांचा हा तयार ठेचा एका वाटीमध्ये काढून ठेवा.

सलमान खानने केले कांद्याचे इन्स्टंट लोणचे, भाईजान सांगतोय लोणच्याची रेसिपी

दुसरीकडे कढईत २ चमचे तेल घालून गरम करण्यासाठी ठेवा. त्यात अर्धा चमचा मोहरी घाला. मोहरी तडतडली की त्यात लांबट आकाराचा कांदा घालून भाजून घ्या. त्यानंतर त्यात हिरव्या मिरचींचा ठेचा, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेला टोमॅटो घालून साहित्य भाजून घ्या. कांदा लालसर झाल्यानंतर त्यात पापडाचा चुरा घालून मिक्स करा. शेवटी कोथिंबीर भुरभुरून डिश सर्व्ह करा.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स