आपल्या नेहमीच्या जेवणात भात, भाजी, पोळी, डाळ, आमटी असे सगळे पदार्थ असतात. या पदार्थांमध्ये, नेहमीसाठी भाजी कोणती करावी असा प्रश्न घरच्या प्रत्येक गृहिणीला (Papad ki sabzi recipe) पडतोच. काहीवेळा नेहमीच्या त्याच त्या सुक्या आणि रस्सेदार भाज्या (Rajasthani Papad ki sabzi recipe) खाऊन फारच कंटाळा येतो. अशावेळी पोळी किंवा भातासोबतच (dahi papad sabzi) काहीतरी वेगळं खावंसं वाटत. जर घरात कोणतीही भाजी नसेल किंवा नेहमीपेक्षा काहीतरी (how to make papad curry recipe) वेगळं पण चमचमीत खावंसं वाटत असेल तर आपण राजस्थान फेमस 'पापड की सब्जी' झटपट तयार करु शकता(How To Make Papad ki sabzi At Home).
घरात भाजी नसतानाही तोंडाला पाणी सुटेल अशी चवदार आणि झणझणीत 'पापड की सब्जी' म्हणजे चवीला अप्रतिम लागणारा असा खास पदार्थ. आपल्या सगळ्यांच्या घरात कायम जास्तीचे पापड असतातच. साधे पापड, थोडेसे मसाले आणि झटपट खायला तयार आहे 'पापड की सब्जी'. पापड हा आपल्या स्वयंपाकघरातील असा एक पदार्थ आहे की जो कधीच दुर्लक्षित राहत नाही, आणि जेव्हा भाजी नसते तेव्हा या पापडावरच ताव मारुन जेवण फस्त केले जाते. यासाठीच, घरात भाजी नसेल तर आयत्यावेळी काय करावं हा प्रश्न पडला असेल तर ही राजस्थान फेमस 'पापड की सब्जी' नक्की करुन पाहा...
साहित्य :-
१. पापड - ४ ते ५ (भाजलेले पापड)
२. दही - १ कप
३. हळद - १/२ टेबलस्पून
४. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून
५. धणेपूड - १ टेबलस्पून
६. जिरेपूड - १ टेबलस्पून
७. मीठ - चवीनुसार
८. तेल - २ ते ३ टेबलस्पून
९. जिरे - १/२ टेबलस्पून
१०. मोहरी - १/२ टेबलस्पून
११. बडीशेप - १/२ टेबलस्पून
१३. हिंग - चिमुटभर
१४. तमालपत्र - १
१५. कांदा - १ कप (बारीक चिरलेला)
१६. लसूण - २ टेबलस्पून (बारीक चिरलेला)
१७. आलं - २ टेबलस्पून (बारीक चिरलेले)
१८. सुक्या लाल मिरच्या - ३ ते ४ मिरच्या
१९. गरम पाणी - गरजेनुसार
२०. गरम मसाला - १/२ टेबलस्पून
२१. कसुरी मेथी - १/२ टेबलस्पून
२२. हिरव्या मिरच्या - १ टेबलस्पून (बारीक चिरलेल्या)
फणस कापा की बरका? ओळखण्यासाठी फक्त ६ टिप्स, अंदाज चुकणार नाही! गरे खा पोटभर...
कृती :-
१. सगळ्यातआधी पापड मध्यम आचेवर भाजून घ्यावेत. त्यानंतर एका वाटीत दही घेऊन त्यात हळद, लाल तिखट मसाला, धणेपूड, जिरेपूड व चवीनुसार मीठ घालावे. आता हे सगळे जिन्नस कालवून एकजीव करून घ्यावेत.
२. एका कढईत तेल घेऊन त्यात मोहरी, जिरे, बडीशेप, चिमुटभर हिंग, तमालपत्र, बारीक चिरलेला कांदा, लसूण, आलं, सुक्या लाल मिरच्या, हिरव्या मिरच्या घालाव्यात.
कोण म्हणतं, वेटलॉससाठी पराठा खाणं सोडा? पराठ्याचे पौष्टिक ८ स्टफिंग्ज-वजन होईल झरझर कमी...
३. या तयार खमंग फोडणीत कालवून घेतलेले दही ओतावे. सगळे जिन्नस एकजीव करून त्यात थोडे पाणी घालून झाकण ठेवून एक उकळी काढून घ्यावी.
४. उकळी आल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ व भाजून घेतलेल्या पापडाचे मध्यम आकारचे तुकडे करून घालावेत. हे सगळे जिन्नस चमच्याने कालवून एकजीव करावेत.
५. सगळ्यात शेवटी यात गरम मसाला, कसुरी मेथी व बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.
मस्त चमचमीत राजस्थानी स्टाईल 'पापड की सब्जी' खाण्यासाठी तयार आहे. 'पापड की सब्जी' आपण रोटी, पराठा किंवा चपाती सोबत देखील खाऊ शकता.