Panipuri Water Recipe : पाणीपुरी खाणं जवळपास सगळ्यांनाच आवडतं. नुसतं पाणीपुरीचं नाव जरी घेतलं तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. पाणीपुरी हा अशा पदार्थ आहे जो एकदा खाल्ला तर खातच रहावा असं वाटतं. कुरकुरीत - गोलगोल पुऱ्यांसोबत जेव्हा तिखट, आंबट आणि गोड पाणी तोंडात जातं, तेव्हा एक वेगळाच तृप्तीचा आनंद मिळतो. जास्तीत जास्त लोक बाहेर पाणीपुरी खातात, तर काही लोक स्वच्छतेच्या दृष्टीने घरीच पाणीपुरी बनवून खातात. पण अनेकांना हा अनुभव येतो की, घरी बनवलेलं पाणी हे वेगवेगळ्या गोष्टी घालूनही ठेल्यावरील पाण्यासारखं टेस्टी लागत नाही. अशात ठेल्यावरील पाणीपुरीचं पाणी कसं तयार केलं जातं किंवा त्यात ते वेगळं असं काय घालतात ज्यामुळे ते कमालीचं टेस्ट होतं. तेच आज आपण जाणून घेणार आहोत.
सामान्यपणे सगळेच लोक पाणीपुरीचं पाणी तयार करण्यासाठी त्यात चिंच आणि पुदिना टाकतात. पण काही पाणीपुरीवाले लोक यात आणखी चार गोष्टी घालण्यावर भर देतात. ज्यामुळे पाण्याची टेस्ट अधिक चांगली होते. चला तर जाणून घेऊया ठेल्यावरील पाणीपुरीच्या पाण्याची सीक्रेट रेसिपी.
जुन्या चिंचेचा पल्प आणि गूळ
आपल्याला माहीत आहेच की, पाणीपुरीच्या पाण्याचा बेस थोडा आंबट, गोड आणि थोडा चटपटीत असतो. फक्त साखर, चिंच किंवा तिखट घालून ती टेस्ट येत नाही. टेस्ट आणखी चटकदार हवी असेल तर जुन्या चिंचेच्या पल्पसोबत गुळाचा वापर करा. गुळाने पाणी जरा घट्ट होतं आणि एक वेगळाच गोडवा त्याला मिळतो. हे चांगलं गाळून घ्या, जेणेकरून स्वच्छ आणि मुलायम होईल.
पाणी अधिक टेस्टी करणाऱ्या ४ सीक्रेट गोष्टी
- सूंठ पावडर - बरेच दुकानदार पाणीपपुरीच्या पाण्यात सूंठ घालतात. ज्यामुळे टेस्ट आणखी वाढते.
- काळी मिरी आणि लवंग - पाणीपुरीचं पाणी जरा झणझणीत होण्यासाठी केवळ हिरवी मिरची पुरेशी नाही. यासाठी लवंगाची पावडर आणि काळी मिरी महत्वाची आहे. याने पाण्याला 'हिट' मिळते, जी आपल्याला खाताना घशात जाणवते.
- हींगाचं पाणी - पाणीपुरीच्या पाण्यात हींग थेट टाकण्याऐवजी कोमट पाण्यात मिक्स करून टाका. याने हींगाचा गंध जास्तवेळ टिकून राहणार.
- काळं मीठ आणि भाजलेल्या जिऱ्याची पूड - साध्या मिठाऐवजी पाणीपुरीच्या पाण्यात काळ्या मिठाचा वापर करावा. तसेच भाजलेल्या जिऱ्याची पूडही खूप महत्वाची ठरते.
तसेच, पाणी जरा हिरवं दिसावं यासाठी पुदिना आणि कोथिंबिरीची पेस्ट करताना त्यात थोडे बर्फाचे तुकडे टाला. याने पानं काळी होणार नाहीत. पाणीपुरी खाण्याच्या साधारण १ तासआधी ते फ्रिजमध्ये ठेवा. जेणेकरून सगळे मसाले चांगले मिक्स होतील. आपलं ठेल्यावर मिळतं तसं टेस्टी पाणीपुरीचं पाणी तयार आहे.
