बिर्याणी हा अनेकांचा अतिशय आवडीचा पदार्थ. आता तर हिवाळ्याचे दिवस असल्याने बाजारात वेगवेगळ्या भाज्या भरपूर प्रमाणात मिळत आहेत. अशा छान रंगबेरंगी भाज्या पाहिल्या की खवय्यांना बिर्याणीची आठवण हमखास येतेच.. म्हणूनच या दिवसांत भरपूर भाज्या आणा आणि पुरेपूर भाज्या घालून बिर्याणी करून पाहा. पनीर बिर्याणीही अनेकांना आवडते (paneer veg dum biryani recipe). म्हणूनच आता भाज्या आणि पनीर या दोन्ही गोष्टी भरपूर प्रमाणात असणारी पनीर बिर्याणी कशी करायची ते पाहूया...(how to make dum biryani?)
बिर्याणी करण्याची रेसिपी
बिर्याणी करण्यासाठी सगळ्यात आधी तर तुम्हाला हवे तेवढे तांदूळ घ्या. ते २ ते ३ वेळा स्वच्छ धुवा आणि नंतर अर्धा तास पाण्यात भिजत ठेवा. यानंतर कांदा बारीक उभा कापून तेलामध्ये छान खमंग तळून घ्या. यानंतर बिर्याणीसाठी तुम्हाला ज्या भाज्या हव्या आहेत त्या सगळ्या चिरून घ्या.
आता चिरलेल्या भाज्या आणि पनीरचे तुकडे हे दोन्हीही वेगवेगळ्या दोन भांड्यांमध्ये मॅरिनेट करायला ठेवा. त्यासाठी भांड्यांमध्ये दही घाला. दह्यामध्ये गरम मसाला, बिर्याणी मसाला, धणे पूड, जिरे पूड, लाल तिखट, मीठ, कसूरी मेथी असं सगळं घाला. यानंतर भाज्या आणि पनीर त्यात टाकून १५ मिनिटांसाठी झाकून ठेवा.
यानंतर तांदूळ शिजवायला घ्या. जेवढे तांदूळ असतील त्याच्या दुप्पट पाणी घाला. तांदूळ शिजवताना त्यात मीठ, तेल आणि लिंबाचा रस घाला. यामुळे तांदूळ छान मोकळे शिजवले जातात. ८० टक्के तांदूळ शिजल्यानंतर गॅस बंद करावा.
हिवाळ्यात पायात सॉक्स घालून पाय उबदार ठेवायलाच हवेत, कारण... वाचा ६ जबरदस्त फायदे
यानंतर गॅसवर कुकर गरम करायला ठेवा. कुकर गरम झाल्यानंतर त्यात तेल आणि तूप घाला. आलं, लसूण, हिरवी मिरची परतून घ्या. कांदा आणि टोमॅटोही परतून घ्या. त्यानंतर मॅरिनेट केलेल्या भाज्या त्यात घाला. त्या भाज्यांपुरतं मीठ आणि विकत मिळणारा बिर्याणी मसाला घालून त्या व्यवस्थित हलवून घ्या आणि ६ ते ७ मिनिटे वाफवायला ठेवा.
भाज्या वाफवून झाल्यानंतर त्यावर शिजलेल्या तांदळाचा एक थर द्या. त्यावर मेरिनेटेन पनीरचा एक थर द्या. त्यावर पुन्हा तांदूळ घाला आणि त्यावर सगळ्यात शेवटी तळलेला कांदा, तळलेले काजू, केशराच्या काड्या, बारीक चिरलेला पुदिना, कोथिंबीर असं सगळं घालून त्यावर २ ते ३ चमचे तूप सोडा.
कोंड्यामुळे डोक्यात सतत खाज येते? जावेद हबीब सांगतात कोंडा घालवून टाकण्याचा भन्नाट उपाय
आता गॅसवर तवा ठेवा. गॅसची फ्लेम मोठी ठेवा आणि त्यावर कुकर ठेवा. कुकरची शिट्टी आणि वायर काढून टाकावे. २० ते २५ मिनिटे बिर्याणीला दम देऊन झाला की गरमागरम सुगंधित दम बिर्याणी तयार..
