पोळ्या आपण घरी रोज करतोच. बरेचदा आपण उरलेल्या पोळीचा लाडू, फोडणीची पोळी, चहाबरोबर परतलेली पोळी असे प्रकार करुन शिळ्या पोळ्या संपवतो.(Paneer Tikka Roll) तेच तेच बनवून कंटाळा आला असेल तर शिळ्या पोळ्यांचे पनीर टिक्का रोल बनवून बघा. फार सोपा आणि पटकन बनणारा पदार्थ आहे. डाएट करणाऱ्यांनाही हा पदार्थ खायला हरकत नाही.(Paneer Tikka Roll) पाहा रेसिपी.
रोल्स बनवण्यासाठी शक्यतो मैद्याची पोळी वापरतात. मात्र जर फक्त चविष्ट नाही तर हेल्दी असा रोल खायचा असेल तर अशा पद्धतीने रोल करुन पाहा.
साहित्य -
पनीर, पोळी, कांदा, गाजर, कोबी, सिमला मिर्ची, आलं, लसुण, मिरची, बेसन, लिंबू, कोथिंबीर, तिखट, चाट मसाला, मीठ, कसूरी मेथी, हळद, तेल, टमाटे, सॉस, मिंट सॉस, शेजवान चटणी, (इतर आवडीचे सॉस)
कृती-(Paneer Tikka Roll)
१. सर्वप्रथम कांदा, गाजर, कोबी, सिमला मिरची लांब-लांब कापून घ्या. बारीक कापा तुकडे फार जाडे नका ठेऊ. सगळ्या भाज्या थोडंसं मीठ लावून एकत्र करून घ्या.
२. आलं-लसुण-मिरची यांची छान पेस्ट करून घ्या. जास्त पाणी घालू नका. बारीक वाटून घ्या.
३.एका ताटात तिखट, चाट मसाला, मीठ, कसूरी मेथी(अगदी थोडीशी), हळद आणि तुमच्या आवडीचे मसाले घ्या. आलं-लसुण-मिरची पेस्टसुद्धा घ्या. त्यात अगदी थोडं पाणी घाला आता ते कालवून घ्या.(Paneer Tikka Roll)
४. पनीरचे मध्यम चौकोनी तुकडे करा आणि कालवलेल्या मसाल्यात घाला. छान एकजीव करून घ्या. सगळ्या तुकड्यांना मसाला लागू द्या. आता ते मिश्रण मॅरिनेट करत ठेवा.
५. १० मिनिटांनी एका नॉनस्टिकी पॅनमध्ये चमचाभर तेल घ्या. त्यात पनीर टाका छान परतून घ्या. थोडावेळ झाकून ठेवा.
६. आता टॉमेटॉ सॉस, मिंट सॉस, शेजवान चटणी,(इतर आवडीचे सॉस) एका भांड्यात एकत्र करा. सगळे सॉस एकजीव होऊ द्या.
७. आता पोळी एका बाजूने थोडीशी गरम करुन घ्या. गरम बाजू उलटवून त्या बाजूला सॉस लावा. त्यावर चिरलेल्या भाज्या आणि पनीरचं मिश्रण सरळ रेषेत ठेवा. दोन्ही बाजूंनी गुडाळी करून पोळीचा रोल करा आणि गरमागरम खा.