Lokmat Sakhi >Food > फक्त तोंडी लावायला ठेचा कशाला आता करा झणझणीत पनीर ठेचा पराठा- मुलांनाही आवडेल...

फक्त तोंडी लावायला ठेचा कशाला आता करा झणझणीत पनीर ठेचा पराठा- मुलांनाही आवडेल...

Paneer Thecha Paratha : Paneer Thecha Paratha Recipe : Homemade Paneer Thecha Paratha : पोटभरीचा, झणझणीत, चवीला उत्तम असा 'पनीर ठेचा पराठा' एकदा तरी नक्की ट्राय करायलाच हवा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2025 14:48 IST2025-06-19T14:35:47+5:302025-06-19T14:48:22+5:30

Paneer Thecha Paratha : Paneer Thecha Paratha Recipe : Homemade Paneer Thecha Paratha : पोटभरीचा, झणझणीत, चवीला उत्तम असा 'पनीर ठेचा पराठा' एकदा तरी नक्की ट्राय करायलाच हवा.

Paneer Thecha Paratha Paneer Thecha Paratha Recipe Homemade Paneer Thecha Paratha | फक्त तोंडी लावायला ठेचा कशाला आता करा झणझणीत पनीर ठेचा पराठा- मुलांनाही आवडेल...

फक्त तोंडी लावायला ठेचा कशाला आता करा झणझणीत पनीर ठेचा पराठा- मुलांनाही आवडेल...

'पराठा' हा आपल्याकडील फारच फेमस असा पदार्थ आहे. सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत, पराठा हा एकमेव असा पदार्थ आहे जो आपण  कधीही खाऊ शकतो. सगळ्यांच्याच 'ऑल टाईम फेव्हरेट' पदार्थांच्या यादीत पराठ्याचे नाव हे पहिले येते.'पराठा' हा एक असा पदार्थ आहे की जो (Paneer Thecha Paratha) आपल्यात सगळं काही सामावून घेतो. पराठ्यांचे (Paneer Thecha Paratha Recipe) वेगवेगळे असे असंख्य प्रकार असतात. कणकेच्या गोळ्यात वेगवेगळ्या प्रकारचे स्टफिंग (Homemade Paneer Thecha Paratha) भरुन आपण पटकन पराठा तयार करू शकतो. असाच नेहमीपेक्षा थोडा वेगळा आणि चविष्ट असा 'पनीर ठेचा पराठा' - नाव ऐकूनच तोंडाला पाणी सुटेल असा हा पराठा आहे!

आपल्याकडे महाराष्ट्रात ठेचा हा पारंपरिक लोकप्रिय पदार्थ असून तो भाकरी सोबत खाल्ला जातो. परंतु याच पारंपरिक ठेच्याला थोडा मॉडर्न ट्विस्ट देत वेगळ्या पद्धतीने पराठ्यात भरून तयार केलेला हा पराठा म्हणजेच 'पनीर ठेचा पराठा'. भरपूर प्रोटीनयुक्त पनीर, त्यात झणझणीत ठेचा यांचं अनोखं कॉम्बिनेशन असलेला 'पनीर ठेचा पराठा' म्हणजे पराठा प्रेमींसाठी मेजवानीच. विशेष म्हणजे हा पराठा झटपट तयार होतो आणि घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या पसंतीस उतरतो. असा हा पोटभरीचा, झणझणीत आणि चवीला अतिशय उत्तम असणारा 'पनीर ठेचा पराठा' एकदा तरी नक्की ट्राय करायलाच हवा. पनीर ठेचा पराठ्याची सोपी रेसिपी पाहा...    

साहित्य :- 

१. तेल - २ ते ३ टेबलस्पून 
२. लसूण पाकळ्या - ५ ते ८ पाकळ्या
३. हिरव्या मिरच्या - ६ ते ८ मिरच्या 
४. जिरे - १ टेबलस्पून 
५. शेंगदाणे - २ टेबलस्पून 
६. मीठ - चवीनुसार 
७. कोथिंबीर - १ कप 
८. गव्हाचे पीठ - २ कप 
९. पनीर - १/२ कप (किसलेलं पनीर)
१०. चिली फ्लेक्स - २ टेबलस्पून 
११. बटर - ४ ते ५ टेबलस्पून 
१२. पाणी - गरजेनुसार 

Kids Lunch Box Recipe : शाळेत खाऊच्या डब्यासाठी करा क्रिमी चॉकलेट सँडविच! झटपट पदार्थ मुलांनाही आवडेल...

घरात कोणतीच भाजी नाही? मग करा राजस्थानी फेमस 'पापड की सब्जी' - अस्सल झणझणीत पारंपरिक चव...

कृती :- 

१. सगळ्यांत आधी एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यात जिरे, हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या, शेंगदाणे असे सगळे जिन्नस घालून ते हलकेच तेलात परतून घ्यावेत. 
२. आता एक मोठा खलबत्ता घेऊन त्यात तेलात परतून घेतलेलं मिश्रण ओतून घ्यावं. याचबरोबर, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर देखील घालावी. आता हे सगळे मिश्रण एकत्रित कुटून त्याची जाडसर भरड तयार करून ठेचा तयार करून घ्यावा. आता हा तयार ठेचा एका बाऊलमध्ये काढून घ्यावा. 
३. एका मोठ्या परातीमध्ये गव्हाचे पीठ घेऊन त्यात चवीनुसार मीठ, तेल व पाणी घालून नेहमीप्रमाणे चपातीसाठी कणिक मळतो तशी कणिक मळून घ्यावी.

मस्त मुसळधार पावसात करा पौष्टिक आणि चमचमीत फणसाच्या आठळ्या फ्राय- पारंपरिक टेस्टी पदार्थ...

४. तयार कणकेचे छोटे गोळे करून त्याचा गोलाकार चपातीप्रमाणेच पराठा लाटून घ्यावी. या लाटून घेतलेल्या पराठ्यावर तयार मिरचीचा ठेचा घालून तो व्यवस्थित पसरवून घ्यावा. मग त्यावर किसलेलं पनीर देखील भुरभुरवून घालावं, त्यानंतर पुन्हा या पराठ्याची चौकोनी घडी घालून घ्यावी. 
५. या घडी घातलेल्या पराठ्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडेसे चिली फ्लेक्स भुरभुरवून घ्यावेत आणि पराठा पुन्हा एकदा लाटून घ्यावा. 
६. पॅनला थोडे बटर लावून त्यावर हा पराठा दोन्ही बाजुंनी खरपूस रंग येईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यावा. 

पनीर ठेचा पराठा खाण्यासाठी तयार आहे. हा पराठा लोणचं, दही, लोणी किंवा टोमॅटो सॉससोबत खाण्याची मज्जा काही औरच असते.


Web Title: Paneer Thecha Paratha Paneer Thecha Paratha Recipe Homemade Paneer Thecha Paratha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.