Join us

Paneer Tawa Pulao Recipe : फक्त १० मिनिटात करा पनीर तवा पुलाव; स्वयंपाक झटपट- जेवण होईल मस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 16:14 IST

Paneer tawa pulao recipe : मार्केटमधून ताज्या भाज्या आणल्या की घरात उपलब्ध असलेल्या साध्या साहित्यापासून तुम्ही चटपटीत, चविष्ट पनीर तवा पुलाव करू शकता

 जेवणात वेगवेगळे पदार्थ असावेत. असं प्रत्येकलाच वाटतं. पण  रोजचा स्वयंपाक करायलाच पुरेसा वेळ मिळत नाही. कामाची घाई होते. त्यात वेगळं काही बनवायचं म्हटलं की बराच वेळ जातो. पण डाळ भात किंवा खिचडी तुम्ही रोज बनवत असाल तर त्यात बदल करून तुम्ही तवा पुलाव बनवू शकता. (Paneer Tawa Pulao Recipe) सध्या हिवाळ्यात भाज्या खूपच स्वस्त आणि ताज्या मिळत आहेत.  (Paneer Tawa pulao Step by step recipe) मार्केटमधून ताज्या भाज्या आणल्या की घरात उपलब्ध असलेल्या साध्या साहित्यापासून तुम्ही चटपटीत, चविष्ट पनीर तवा पुलाव करू शकता.  जर तुम्हाला पनीर फार आवडत नसेल तर यात तुम्ही हव्या त्या भाज्या एड केल्या तरी चालतील. (Quick and Easy Paneer Tawa Pulav)

पनीर तवा पुलाव कसा बनवायचा?

१) सगळ्यात आधी कढईत १ चमचा तेल गरम करा, थोडे बटर घाला. नंतर 1 टीस्पून जिरे घाला 

२) त्यात 2 कापलेले कांदे, 2 चिरलेल्या हिरव्या मिरच्या घाला. कांदे गुलाबी होईपर्यंत परतवा.

३) 1/2 टीस्पून आले लसूण ठेचून परतून घ्या

४) चिरलेली सिमला मिरची, चिरलेला गाजर आणि मटार घाला. 5 मिनिटे परतावे.

५) २ चिरलेले टोमॅटो घालून मिक्स करा.

६) मीठ, हळद आणि तिखट घालून टोमॅटो मऊ आणि मऊ होईपर्यंत परतावे.

७) मिरचीची पेस्ट आणि १ चमचा पावभाजी मसाला घाला. सर्वकाही चांगले मिसळा.

९) पनीरचे चौकोनी तुकडे घालून मिक्स करा. एक मिनिट परतून घ्या.

१०) नंतर शिजवलेला भात घालून हलक्या हाताने मिक्स करा. बटर क्यूब, १ चमचा लिंबाचा रस आणि थोडी चिरलेली कोथिंबीर घाला. चांगले मिसळा. गरमागरम रायत्याबरोबर सर्व्ह करा.

टॅग्स :सोशल मीडियासोशल व्हायरल