पनीरची भाजी हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत कित्येकांचा अतिशय आवडीचा पदार्थ. हॉटेलमध्ये गेल्यानंतरही मुलं हमखास पनीरच्या भाज्याच ऑर्डर करत असतात. शिवाय घरीही पनीरच्या भाजीची फर्माहिश अधूनमधून येतच असते. अशा पनीर आवडणाऱ्या सगळ्याच मंडळींना पनीर नवाबी ही भाजीही खूप आवडेल. बहुतांशवेळा आपण लाल किंवा हिरव्या ग्रेव्हीमध्ये पनीरच्या भाज्या करतो. पण पनीर नवाबी मात्र पांढऱ्या ग्रेव्हीमध्ये होते आणि तिची चवसुद्धा इतर भाज्यांपेक्षा खूप वेगळी लागते (paneer nawabi recipe in white gravy). शेफ स्मिता देव यांनी ही रेसिपी सोशल मीडियावर शेअर केली आहे.(how to make paneer nawabi?)
पनीर नवाबी करण्याची रेसिपी
साहित्य
अर्धा किलाे पनीरचे तुकडे
४ ते ५ लसून पाकळ्या आणि एखादा इंच आल्याचा तुकडा
२ ते ३ मध्यम आकाराचे कांदे
अर्धा कप काजू
नॅशनल क्रश गिरिजा ओक 'या' प्रकारावर प्रचंड नाराज, म्हणाली महिलांच्या बाबतीत हे जास्त होतंय...
४ ते ५ हिरव्या मिरच्या
अर्धी वाटी क्रिम आणि तेवढेच तूप
१ कप दूध
१ टीस्पून खसखस, चवीनुसार मीठ
२ टीस्पून कसूरी मेथी आणि चवीनुसार गरम मसाला
कृती
सगळ्यात आधी गॅसवर कढई गरम करायला ठेवा. त्यात तूप घालून काजू, मिरच्या, लसूण, कांदा, आलं, खसखस असं सगळं परतून घ्या. यानंतर हे सगळे पदार्थ थंड होऊ द्या आणि त्यानंतर मिक्सरमधून फिरवून त्यांची अगदी बारीक पेस्ट करून घ्या.
दुसरीकडे गॅसवर पुन्हा कढई गरम करायला ठेवा. त्यात तूप घाला. मिक्सरमधलं वाटण तुपामध्ये घालून परतून घ्या. त्यात थोडं दूध, क्रिम घाला आणि पुन्हा एकदा सगळं हलवून घ्या. त्यामध्ये गरम मसाला, कसूरी मेथी आणि चवीनुसार मीठ घाला.
पनीरदेखील तुपावर परतून घ्या आणि त्यानंतर ते कढईमधल्या ग्रेव्हीमध्ये टाका. कढईवर झाकण ठेवून ५ मिनिटे वाफ येऊ द्या आणि नंतर गॅस बंद करा. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर भाजीवर टाका आणि गरमागरम पनीर नवाबी पोळी, पराठा, भात या पदार्थांसोबत खाऊन पाहा.
