पंचायत सिरीजनंतर नीना गुप्तांची मंजू देवी ही भूमिका फार गाजली. संपूर्ण सिरीयलमध्ये मंजू देवी घरी येणाऱ्या सगळ्यांना दुधीभोपळा खाऊ घालताना दिसल्या. पण फक्त मंजूलाच नाही तर नीनाला देखील दुधीभोपळा आवडतो.(Panchayat fame Manju Devi's favorite food, 'Lauki Jabar' dish) त्यांनी सांगितलेली दुधीभोपळा राईस रेसिपी फारच लोकप्रिय ठरली. अत्यंत साधी आणि चविष्ट अशी ही रेसिपी नक्की करुन पाहा. ही रेसिपी बिहारमध्ये केली जाते. लौकी जाबार असे या पदार्थाचे नाव आहे. एक साधा तडका देऊन ही रेसिपी करता येते. पाहा कशी करायची. दुधीभोपळा पौष्टिक असतो मात्र त्याची चव लोकांना आवडत नाही. एकदा ही रेसिपी खाल्यावर मात्र चव आवडायला लागेल.
साहित्यदुधीभोपळा, तांदूळ, पाणी, दूध, तूप, मोहरी, जिरे, कडीपत्ता, लाल मिरची, मीठ, मेथी दाणे
कृती१. दुधीभोपळा सोलून घ्यायचा आणि सोलून झाल्यावर छान किसून घ्यायचा. तांदूळ स्वच्छ धुवायचे आणि मग थोडावेळ पाण्यात ठेवायचे.
२. एका खोलगट पातेल्यात किंवा कुकरमध्ये कुसलेला दुधीभोपळा परतायचा. व्यवस्थित दोन मिनिटांसाठी परतायचा. मग त्यात तांदूळ घालायचे आणि ढवळून घ्यायचे. पाणी घालायचे आणि भात आणि दुधीभोपळा शिजेपर्यंत वाफवायचे. भात छान शिजल्यावर त्यात दूध घालायचे. दूध भातात छान जिरले की मग त्यात मीठ घालायचे भात मस्त मऊ आणि ओलसरच करायचा. एकदम पातळ नको. भात झाल्यावर भात नीट शिजलाय की नाही ते तपासायचे. भात छान शिजल्यावर गॅस बंद करायचा.
३. एका फोडणीपात्रात थोडे तूप घ्यायचे. तूप गरम झाल्यावर त्यात मोहरी घालायचा. मोहरी मस्त तडतडली की त्यात कडीपत्त्याची पाने घालायची. कडीपत्ता छान परतायचा. नंतर त्यात लाल मिरचीचे तुकडे घालायचे आणि परतायचे. त्यात अगदी काही मेथीचे दाणे घालायचे. सगळं छान परतून झाल्यावर गॅस बंद करायचा आणि त्यात लाल तिखट घालायचे. मग ती फोडणी भातात घालायची.
४. भातात फोडणी घातल्यावर छान मिक्स करायचे. फोडणी भातात मिक्स झाली की गरमागरम भात खायचा. ही रेसिपी खरंच खुप मस्त लागते. अगदीच सोपी आहे.