Lokmat Sakhi >Food > श्रावणात नैवैद्याला करा पारंपरिक पंचामृत, पाहा प्रत्येक पदार्थाचं परफेक्ट प्रमाण, चव जणू आजीच्या हातचीच...

श्रावणात नैवैद्याला करा पारंपरिक पंचामृत, पाहा प्रत्येक पदार्थाचं परफेक्ट प्रमाण, चव जणू आजीच्या हातचीच...

Panchamrut Recipe : How To Make Panchamrut At Home : Panchamrut 5 Ingredients : Traditional Panchamrut recipe : Homemade Panchamrut for puja : पंचामृत तयार करताना त्यातील पाचही घटकांचे योग्य प्रमाण नेमके किती असावे? ते पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2025 15:39 IST2025-07-24T15:26:49+5:302025-07-24T15:39:25+5:30

Panchamrut Recipe : How To Make Panchamrut At Home : Panchamrut 5 Ingredients : Traditional Panchamrut recipe : Homemade Panchamrut for puja : पंचामृत तयार करताना त्यातील पाचही घटकांचे योग्य प्रमाण नेमके किती असावे? ते पाहा...

Panchamrut Recipe How To Make Panchamrut At Home Traditional Panchamrut recipe Homemade Panchamrut for puja | श्रावणात नैवैद्याला करा पारंपरिक पंचामृत, पाहा प्रत्येक पदार्थाचं परफेक्ट प्रमाण, चव जणू आजीच्या हातचीच...

श्रावणात नैवैद्याला करा पारंपरिक पंचामृत, पाहा प्रत्येक पदार्थाचं परफेक्ट प्रमाण, चव जणू आजीच्या हातचीच...

श्रावण महिना सुरु झाला म्हणजे सण - उत्सवांची रेलचेल कायम सुरूच असते. श्रावण महिन्यांत नागपंचमी, मंगळागौर, गोकुळाष्टमी, नारळी पौर्णिमा,गणेशोत्सव असे एकापाठोपाठ (Panchamrut Recipe) एक सण येतच असतात. सणवार म्हटलं की पूजापाठ, व्रत, पूजाअर्चा ओघाने आलेच. सणवार, पूजा अशा खास प्रसंगांना प्रसाद म्हणून पंचामृत आवर्जून दिले जाते. आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी पूजेनंतरचा प्रसाद म्हणून रव्याचा शिरा आणि पंचामृत (How To Make Panchamrut At Home) दिले जाते. पूजेदरम्यान पंचामृत ( Traditional Panchamrut recipe) देवाला दाखवून मग ते प्रसाद म्हणून दिले जाते. दूध, दही, तूप, साखर, मध असे अम्रुतासमान पदार्थांचा वापर करुन तयार केलेले म्हणून ते 'पंचामृत'(Homemade Panchamrut for puja).

श्रावणातील प्रत्येक सणाला किंवा पूजेला हमखास प्रत्येक घरोघरी पंचामृत केले जाते. इतर गोडधोड पदार्थांसोबत पंचामृत नैवेद्य म्हणून दाखवतो. कोणतीही पूजा, नैवेद्य, प्रसाद हा पंचामृताशिवाय अपूर्णच मानला जातो. पंचामृत तयार करण्याची शास्त्रोक्त पद्धत आजही बऱ्याचजणांना फारशी माहित नाही. पंचामृत पिण्याने त्याचे आपल्या आरोग्याला अनेक फायदे मिळतात. परंतु, हे पंचामृत शास्त्रोक्त पद्धतीने तयार केले असेल तरच त्याचे दुप्पट फायदे आपल्याला मिळतात. यासाठीच पंचामृत तयार करताना त्यातील पाचही घटकांचे योग्य प्रमाण नेमके किती असावे ? आणि पंचामृत तयार करण्याची शास्त्रोक्त पद्धत कोणती ते पाहूयात...  

साहित्य :- 

१. मध - १ चमचा 
२. तूप - २ चमचे 
३. साखर - ४ चमचे
४. दही - ८ चमचे 
५. दूध - १६ चमचे 

Cake : तूप कढवून बेरी फेकून देता, करा बेरीचा मावा केक! मुलांनाही आवडेल, बेकरीपेक्षाही भारी चव...


साजूक तूप कढवताना बिघडते? लोण्यात २ पदार्थ मिसळा - तूप होईल रवाळ रंगही येईल मस्त...

कृती :- 

१. एका मोठ्या भांड्यात दूध घेऊन त्यात दही, तूप, मध, साखर घालून घ्यावे. 
२. त्यानंतर हे सगळे जिन्नस एकत्रित करुन घ्यावेत. तुम्ही हे मिश्रण हलकेच मिक्सरमध्ये देखील फिरवू शकता. यामुळे पंचामृत चांगले मिळून येते. 
३. आता त्यावर तुळशीचे पान ठेवावे. पंचामृत पिण्यासाठी तयार आहे. 

Traditional Food :मुसळधार पावसात गरमागरम वाफाळत्या चहासोबत बिस्किट नको खा पारंपरिक मुगाची मठरी!

शास्त्रोक्त पद्धतीने पंचामृत कसे करावे ? 

१. पंचामृत पिण्याने आपल्या आरोग्याला त्याचे अनेक फायदे मिळतात, परंतु हे फक्त तेव्हाच शक्य होत जेव्हा पंचामृत शास्त्रोक्त पद्धतीनेच तयार केले जाते. पंचामृत शास्त्रोक्त पद्धतीने तयार करताना त्यातील सगळ्या पदार्थांचे प्रमाण हे अचूक मापानुसारच घेतले पाहिजे. यासाठी जर आपण एक चमचाभर मध घेतले असेल तर त्याच्या दुप्पटीने म्हणजेच दोन चमचा तूप घ्यावे. त्यानंतर तुपाच्या दुपट्टीने साखर घालायची म्हणजेच चार चमचे साखर घालावी. जितक्या प्रमाणात साखर घेतली आहे त्याच्या दुप्पटीने म्हणजेच आठ चमचे दही घ्यावे. याचप्रमाणे जितके दही घेतले आहे त्याच्या दुपट्टीने म्हणजेच १६ चमचे दूध घालावे. अशा प्रकारे आपण शास्त्रोक्त पद्धतीने अगदी परफेक्ट पंचामृत तयार करु शकतो. 

२. पंचामृत अधिक गुणकारी व्हावे तसेच ते बाधू नये म्हणून यात तुळशीचे पान आवर्जून घालावे. 

३. पंचामृत तयार करताना शक्यतो ते चांदीच्या किंवा काचेच्या भांड्यामध्ये तयार करावे. 

४. पंचामृत तयार करुन बराचवेळ ठेऊ नये ते लगेच पिऊन संपवावे. प्रत्येकवेळी पंचामृत ताजे तयार करून घेऊन प्यावे. 

५. पंचामृतात तूप आणि मधाचे प्रमाण सारखे नसावे, थोडे कमी - जास्त असावे. आयुर्वेदानुसार तूप आणि मध जर समप्रमाणात खाल्ले तर ते आरोग्याला अपायकारक ठरु शकते.


Web Title: Panchamrut Recipe How To Make Panchamrut At Home Traditional Panchamrut recipe Homemade Panchamrut for puja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.