पालकाची भाजी, पालकाचं सूप, पालकाचे पराठे, पालक पुरी असे पालकाचे वेगवेगळे पदार्थ आपण नेहमीच करून खात असतो. पालकामधून लोह भरपूर प्रमाणात मिळतं. त्यामुळे आपल्या आहारात नेहमीच पालक असायला हवा. पण पालकाचे तेच ते पदार्थ खाऊनही कधी कधी कंटाळा येतो आणि मग त्यामुळे काही दिवस पालक खाणंच बंद होतं. असं तुमच्याही बाबतीत जर कधी झालंच तर पालक भजी करण्याची ही रेसिपी एकदा पाहून घ्या (how to make palak pakoda?). या रेसिपीनुसार केलेली भजी अतिशय चवदार, खमंग आणि कुरकुरीत होतात. घरी पाहुणे आल्यानंतरही तुम्ही त्यांच्यासाठी झटपट पालक भजीचा बेत करू शकता..(palak pakoda recipe) बघा एक सोपी रेसिपी
पालक भजी रेसिपी
पालकाची हिरवीगार ताजी पानं ३ वाट्या
१ मध्यम आकाराचा कांदा
२ मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे
रखरखीत केस होतील सिल्की, चमकदार- आठवड्यातून फक्त एकदा 'हा' उपाय करा, केस राहतील काळेभोर
१ चमचा आलं- लसूण पेस्ट आणि २ ते ३ मिरच्यांचे बारीक तुकडे
२ ते ३ टेबलस्पून कोथिंबीर, धने- जिरेपूड प्रत्येकी एकेक टीस्पून
२ वाट्या बेसन, २ टेबलस्पून रवा
चवीनुसार मीठ आणि तळण्यासाठी तेल
कृती
ही रेसिपी करण्यासाठी सगळ्यात आधी बटाटे उकडून घ्या. त्यानंतर पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या.
एका मोठ्या भांड्यात चिरलेला पालक, कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, रवा, बेसन, धने- जिरेपूड असं सगळं घाला.
चेहरा नेहमीच सुजलेला दिसतो? नेहा धुपियाने सांगितलेला उपाय करा- पोट, दंड, मांड्यांवरची चरबीही उतरेल
सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ, आलं- लसूण पेस्ट, मिरचीचे तुकडे घालून थोडं थोडं पाणी घालून पीठ जरासं घट्ट भिजवून घ्या.
यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवा. त्यामध्ये तेल घाला. तेल तापल्यानंतर छोट्या छोट्या आकाराची पालक भजी तळून काढा. गरमागरम भजी सॉस, दही, तळलेली मिरची या पदार्थांसोबत खाऊ शकता.
