पाणीपुरी किंवा गोलगप्पा म्हटलं की आपल्या सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं. मस्त चटपटीत, मसालेदार हिरवंगार पाणी पाहून कुणालाही मोह आवरता येत नाही... पुदिना - कोथिंबीरीच्या हिरव्यागार पाण्यांत मूग डाळीची कुरकुरीत भजी घालून तयार केलेले 'पाणीवाले फुलके' म्हणजे खवय्यांचा आवडता पदार्थ... जर तुम्हाला चटपटीत खायला आवडत असेल आणि नेहमीच्या पाणीपुरीला काहीतरी हेल्दी आणि वेगळा ट्विस्ट द्यायचा असेल, तर ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे(Paaniwale Fulke Recipe).
पिवळ्या मूग डाळीचे मऊ - लुसलुशीत फुलके जेव्हा थंडगार, चटपटीत पाण्यात बुडवले जातात, तेव्हा मिळणारी चव खरोखरच अप्रतिम असते. उन्हाळ्याच्या दिवसात किंवा संध्याकाळच्या वेळी काहीतरी चटपटीत खावंसं वाटत असेल, तर ही रेसिपी नक्की करुन पाहा.. उत्तर भारतात अत्यंत लोकप्रिय असलेली ही रेसिपी आता महाराष्ट्रातील घराघरांतही केली जाते. कमी तेलात बनवलेली मूग डाळीची भजी आणि पुदिना-मिरचीचं थंडगार पाणी यांचा हा मेळ फक्त चविष्टच नाही, तर पचायलाही (how to make soft Paaniwale Fulke at home) हलका आहे...मस्त चटपटीत, चविष्ट 'पानीवाले फुलके' करण्याची खास रेसिपी पाहूयात...
साहित्य :-
१. पिवळी मूग डाळ - २ कप (पाण्यांत ४ ते ५ तास भिजवलेली)२. हळद - १/२ टेबलस्पून३. मीठ - चवीनुसार४. बेसन - १/२ कप ५. खायचा सोडा - १/२ टेबलस्पून६. ओवा - १ टेबलस्पून७. कोथिंबीर - २ ते ३ टेबलस्पून (बारीक चिरलेली)८. तेल - तळण्यासाठी९. पुदिना - १ कप १०. हिरव्या मिरच्या - ३ ते ४ (बारीक चिरलेल्या)११. आलं - १ छोटा तुकडा१२. चिंचेचा कोळ - १ टेबलस्पून १३. पाणी - गरजेनुसार१४. कांदा - १ कप (बारीक चिरलेला) १५. चिली फ्लेक्स - १/२ टेबलस्पून१६. लिंबाचा रस - १ टेबलस्पून
प्रमाण चुकलं की इडली डोसे फसलेच, डाळ तांदळांचं ‘असं’ गणित परफेक्ट- अजिबात विसरु नका प्रमाण...
कृती :-
१. पाण्यांत ४ ते ५ तास भिजवलेली पिवळी मूग डाळ एका मिक्सरच्या भांड्यात घालून त्यात चवीनुसार मीठ, हळद घालून, पाणी न घालता वाटून घ्यावे. वाटून घेतलेलं मिश्रण एका बाऊलमध्ये काढून त्यात बेसन, ओवा, खायचा सोडा, बारीक चिरलेली कोथिंबीर घालूंन मिश्रण व्यवस्थित २ ते ३ मिनिटे फेटून घ्यावे. २. कढईत तेल ओतून ते व्यवस्थित कडकडीत गरम करून घ्यावे. गरम तेलात तयार मिश्रणाच्या छोट्या - छोट्या गोलाकार भजी सोडून त्या खरपूस तळून घ्याव्यात.
३. मिक्सरच्या मोठ्या भांड्यात पुदिन्याची पाने, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, आल्याचा छोटा तुकडा, चवीनुसार मीठ, चिंचेचा कोळ, चवीनुसार मीठ आणि पाणी घालूंन मिश्रण एकत्रित वाटून घ्यावं. वाटून घेतलेलं मिश्रण एका मोठ्या बाऊलमध्ये काढून त्यात गरजेनुसार पाणी, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, चिलीफ्लेक्स, चवीनुसार मीठ घालून पाणी तयार करून घ्यावं. ४. तयार केलेल्या या कोथिंबीर - पुदिन्याच्या पाण्यात खरपूस तळून घेतलेल्या मूग डाळीच्या भजी घालाव्यात आणि ते पाणी भजीने शोषून घेण्यासाठी २ ते ३ मिनिटे झाकून ठेवावं. सर्व्ह करताना वरून लिंबाचा रस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरवून घालावी.
मस्त चटपटीत, चविष्ट पानीवाले फुलके खाण्यासाठी तयार आहेत.
Web Summary : Craving something chatpata? Try Paniwale Fulke, a healthy twist on pani puri. These moong dal fritters in mint-coriander water are delicious and light. A popular North Indian dish, now enjoyed in Maharashtra, perfect for summer evenings.
Web Summary : चटपटा खाने का मन है? पानी वाले फुलके आजमाएं, जो पानी पूरी का एक स्वस्थ रूप है। पुदीना-धनिया के पानी में मूंग दाल के भजिये स्वादिष्ट और हल्के होते हैं। एक लोकप्रिय उत्तर भारतीय व्यंजन, जो अब महाराष्ट्र में भी पसंद किया जाता है, गर्मियों की शाम के लिए बिल्कुल सही।