Join us

संत्रीच्या सालींचं लोणचं खाल्लंय का? बघा पौष्टिक लोणच्याची चटपटीत रेसिपी, करायला एकदम सोपी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2025 14:02 IST

Food And Recipe: संत्रीच्या सालींचं खूप चवदार लोणचं घालता येतं. ते कसं घालायचं त्याचीच खास रेसिपी पाहूया..(orange peel pickle)

ठळक मुद्देसंत्रीचं साल सुद्धा गुणकारी असतं. संत्रीच्या सालींमध्ये फायबर तसेच व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतात.

आजवर आपण लोणच्याचे अनेक वेगवेगळे प्रकार खाल्ले असतील. आता सध्या हिवाळा सुरू आहे. त्यामुळे गाजराचं लाेणचं, आवळ्याचं लोणचं, मुळ्याचं लोणचं असे अनेक प्रकारचे लोणचे आपण घालत असतो आणि त्याचा आस्वाद घेत असतो. पण संत्रीच्या सालीचं लोणचं हा प्रकार अजूनही बऱ्याच जणींनी ऐकलेला नाही. म्हणूनच आता ही एक खास पारंपरिक रेसिपी पाहा (orange peel pickle) आणि संत्रीच्या सालीचं लोणचं घालून पाहा (how to make orange peel pickle?). संत्री जेवढी पाैष्टिक असते, तेवढंच संत्रीचं साल सुद्धा गुणकारी असतं. संत्रीच्या सालींमध्ये फायबर तसेच व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे ज्यांना वारंवार अपचन, बद्धकोष्ठता असा त्रास होतो, त्यांच्यासाठी संत्रीच्या सालींचं लोणचं गुणकारी ठरू शकतं.(instant pickle recipe)

 

संत्रीच्या सालींचं लोणचं करण्याची रेसिपी 

साहित्य 

३ ते ४ संत्रीच्या साली

४ ते ५ टेबलस्पून गूळ

२ टीस्पून लाल तिखट

टोमॅटो खाण्याची योग्य पद्धत- एक्सपर्ट सांगतात 'या' पद्धतीने टोमॅटो खाल्ल्यास मिळतील भरपूर फायदे

चवीनुसार मीठ

२ लिंबांचा रस

१ टीस्पून जिरेपूड

फोडणीसाठी तेल, मोहरी आणि हिंग

 

कृती

सगळ्यात आधी संत्रीची सालं स्वच्छ धुवून घ्या आणि ती पुसून पुर्णपणे कोरडी करून घ्या.

त्यानंतर कुकरमध्ये थोडं पाणी टाका. त्यामध्ये कुकरचा डबा ठेवा आणि त्यात संत्रीची सालं घाला. त्या डब्यात पाणी घालण्याची गरज नाही. २ ते ३ शिट्ट्या करा आण साली वाफवून घ्या.

दुपारच्या झोपेने खरंच वजन वाढतं? एक्सपर्ट सांगतात दुपारच्या झोपेचं आणि वजनाचं नेमकं कनेक्शन

यानंतर एका कढईमध्ये गुळाचा पाक करून घ्या. त्या पाकामध्ये वाफवून घेतलेल्या संत्रीच्या साली थोड्या मॅश करून घाला आणि २ ते ३ मिनिटे ते एकत्र शिजवून घ्या. 

त्याचवेळी त्यामध्ये तिखट, मीठ, जिरेपूड घाला. त्यानंतर गॅस बंद करा आणि लोणच्यामध्ये लिंबू पिळा.

खाऊन पाहा खमंग चवदार स्प्राऊट पराठा! एकदा खाल तर वारंवार मागाल- घ्या सुपरहेल्दी रेसिपी

आता हे लोणचं थंड झाली की ते काचेच्या बरणीत भरून फ्रिजमध्ये ठेवून द्या. तुम्ही लोणचं फ्रिजमध्ये ठेवण्यापुर्वीही त्यात फोडणी घालू शकता किंवा खाण्यासाठी जसं थोडं थोडं वर काढाल तेव्हाही त्यात फोडणी घालून खाऊ शकता. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.