फळांचा राजा जरी आंबा असला, तरी हिवाळ्याच्या दिवसांत ताजी, रसरशीत नारंगी संत्री खाण्याची मजा काही वेगळीच असते. संत्र्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन 'सी' असते, जे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. ताजी, रसरशीत, आंबट-गोड चव आणि मनमोहक सुगंध असणारी संत्री आपण हमखास विकत आणतो. संत्री हे फळं खाण्यापासून आपण त्याचे वेगवेगळे (Orange Jelly Dessert) पदार्थ देखील तयार करून त्यावर ताव मारतो, असाच एक संत्र्याचा खास पदार्थ म्हणजे आंबट - गोड चवीची संत्र्याची जेली... लहान असो किंवा मोठे, जेलीचं नाव काढलं की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं. त्यातही संत्र्याचा तो आंबट-गोड स्वाद असेल, तर मग काय विचारायलाच नको! बाजारात मिळणाऱ्या जेलीमध्ये अनेकदा प्रिझर्व्हेटिव्ह्ज आणि कृत्रिम रंग असतात. पण जर तुम्हाला घरच्या घरी ताज्या संत्र्यांपासून मऊ, रसरशीत आणि पारदर्शक जेली बनवता आली तर किती भारी...(Orange Jelly Recipe).
घरच्याघरीच उपलब्ध साहित्य वापरून तयार केलेली संत्र्याची जेली चव आणि गुणवत्तेच्या बाबतीत नक्कीच सरस ठरते. विकतची जेली आणण्यापेक्षा घरच्या साहित्यात अगदी १०-१५ मिनिटांत तयार होणारी संत्र्याची जेली घरातील प्रत्येकाला नक्कीच आवडेल. हिवाळ्यात मिळणाऱ्या संत्र्यांची चविष्ट जेली घरच्याघरीच तयार (How To Make Orange Jelly At Home) करण्याची साधीसोपी रेसिपी पाहूयात..
साहित्य :-
१. संत्राचा रस - २ ते ३ कप २. कस्टर्ड पावडर - २ टेबलस्पून ३. पिठीसाखर - चवीनुसार४. डेसिकेटेड कोकोनट - ३ ते ४ टेबलस्पून
भाजी काय करावी सुचत नाही? १० मिनिटांत करा राजस्थानी 'दही मिरची', - दोन ऐवजी चार पोळ्या जास्त खाल...
कृती :-
१. ताजी, रसरशीत, रसाळ संत्री घेऊन ती सोलून घ्यावी. त्यावरील सालं आणि बिया काढून आतील फक्त गर काढून घ्यावा. २. संत्र्याचा गर मिक्सरच्या भांड्यात ओतून त्याचा रस तयार करून घ्यावा, हा रस गाळणीने गाळून घ्यावा. ३. एका पॅनमध्ये हा रस घेऊन मंद आचेवर गरम करावा. यात कस्टर्ड पावडर आणि चवीनुसार पिठीसाखर घालावी.
४. संत्राच्या रसात कस्टर्ड पावडर आणि चवीनुसार पिठीसाखर विरघळवून घ्यावी, मिश्रण थोडे घट्ट व दाटसर होऊ द्यावे. ५. तयार मिश्रण एका स्टील किंवा काचेच्या डब्यात काढून ते सेट होण्यासाठी फ्रिजमध्ये ३ ते ४ तास ठेवून द्यावे. ६. मिश्रण व्यवस्थित सेट झाल्यानंतर त्याचे सुरीने कापून तुकडे करून घ्यावेत. या तुकड्यांवर थोडीशी पिठीसाखर भुरभुरवून घालावी आणि तुकडे डेसिकेटेड कोकोनटमध्ये घोळवून घ्यावेत.
संत्र्याची आंबट - गोड अशी चविष्ट जेली खाण्यासाठी तयार आहे.
Web Summary : Enjoy fresh orange jelly, a healthy treat packed with Vitamin C. This easy recipe uses simple ingredients for a homemade dessert, avoiding preservatives. Ready in minutes, it's perfect for kids and adults alike, offering a delicious, homemade alternative to store-bought jelly.
Web Summary : विटामिन सी से भरपूर, ताज़े संतरे की जेली का आनंद लें। यह आसान रेसिपी घर पर प्रिजर्वेटिव्स से मुक्त मिठाई बनाने के लिए सरल सामग्री का उपयोग करती है। मिनटों में तैयार, यह बच्चों और बड़ों दोनों के लिए एकदम सही है, जो बाजार से खरीदी गई जेली का स्वादिष्ट, घरेलू विकल्प है।