Join us
Daily Top 2Weekly Top 5

कांदाबटाट्यांना कोंब फुटतात, लवकर सडतात? ३ गोष्टी करा- कांदेबटाटे जास्त विकत आणले तरी नो टेंशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2025 17:26 IST

Onion - Potato will last longer - Don't make these mistakes while storing garlic, foods gets spoil because .... : कांदा - लसूण - बटाटा साठवताना ही काळजी घ्यायची.

कांदा, बटाटा आणि लसूण घरात रोज लागणारे हे तीन घटक खरे तर साधे, पण त्यांची साठवणूक योग्य केली नाही तर ते लगेच नासतात, वास येऊ लागतो, कीड लागू शकते किंवा त्याला मोडही येतात. (Onion - Potato will last longer - Don't make these mistakes while storing garlic, foods gets spoil because ....)त्यामुळे यांची एकत्रित, व्यवस्थित आणि टिकाऊ साठवणूक कशी करावी हा प्रश्न अनेकांना पडतो. योग्य काळजी घेतली तर हे पदार्थ सहज ताजे राहू शकतात.

घरात हे पदार्थ ठेवताना सर्वप्रथम लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे ओलावा आणि सूर्यप्रकाश यापासून जितके दूर ठेवता येतील तितके उत्तम. कांदा, बटाटा आणि लसूण या तिन्ही पदार्थांना कोरडी, थंड आणि हवेशीर जागा सर्वाधिक योग्य असते. प्लास्टिकचे बंद डबे, हवाबंद पिशव्या, कंटेनर्स वापरले तर त्यामध्ये ओलावा साचतो, त्याला वास लागतो आणि पदार्थ पटकन सडतात. त्याऐवजी जाळीच्या पिशव्या, खोपटी, विणलेल्या टोपल्या टोपले किंवा उघडी बास्केट्स अधिक चांगली ठरतात.

बटाटे सूर्यप्रकाशात ठेवले तर ते हिरवे पडतात आणि अपायकारक होतात, म्हणूनच ते अंधाऱ्या ठिकाणीच ठेवावेत. लसूणदेखील कोरड्या, हलक्या उबदार जागेत ठेवल्यास त्याला बुरशी लागत नाही. या तिन्ही पदार्थांत ओलावा शिरला की त्यांचा वास वाढतो, बुरशी येते आणि कीटक आकर्षित होण्याची शक्यता जास्त असते.

एकत्र साठवताना साधा पण प्रभावी उपाय म्हणजे आठवड्यातून एकदा साठवलेली सामग्री तपासणे. एखादा कांदा मऊ वाटतोय, एक-दोन बटाट्यांना काळे डाग दिसत आहेत किंवा लसणाला पांढरी बुरशी लागलीय असे आढळले तर ते त्वरित काढून टाकावेत. एक खराब घटक आजूबाजूच्या चांगल्या पदार्थांनाही लगेच खराब करतो.

वास कमी करण्यासाठी आणि कीड दूर ठेवण्यासाठी काही लहान उपायही मदत करतात. जाळीच्या टोपलीत एक-दोन सुंठीचे तुकडे किंवा तमालपत्र ठेवले तर कीड लागण्याची शक्यता कमी होते. हे  पदार्थ फळांच्या किंवा ओलसर भाज्यांच्या जवळ ठेवू नयेत, त्यामुळे कांदा - बटाटा खराब होतो. ओलसर होतो आणि कुजतो.  लसूण , कांदा आणि बटाटा एकत्र ठेवा. फक्त इतर पदार्थांच्या जवळ ठेवणे टाळा. 

English
हिंदी सारांश
Web Title : Store onions, potatoes, garlic longer: Avoid these storage mistakes.

Web Summary : Proper storage keeps onions, potatoes, and garlic fresh longer. Store them in a cool, dry, well-ventilated place, away from moisture and sunlight. Check regularly and remove spoiled items to prevent further spoilage. Keep away from fruits and vegetables.
टॅग्स :अन्नहोम रेमेडीकिचन टिप्सआरोग्य