Join us

बिनतेलाची झणझणीत गवारीची भाजी, एक थेंब तेल न वापरता करा पौष्टिक-चमचमीत गवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2025 15:36 IST

Oil-free spicy vegetable, make nutritious and delicious cluster beans without using a drop of oil : बिनतेलाची भाजी करणे अगदीच शक्य आहे. पाहा रेसिपी.

काही भाज्या अजिबात तेल न वापरातही करता येतात. चवीला छानच लागतात. तेल खाल्याने वजन वाढते. तसेच शरीरासाठी तेल चांगले नाही. (Oil-free spicy vegetable, make nutritious and delicious cluster beans without using a drop of oil)तेलाशिवाय आपला स्वयंपाक होत नाही पण काही पदार्थ तेलाशिवाय करता येतात. ते खाताना तेलाची कमतरताही जाणवत नाही. वजन कमी करायचे असेल तर अशा भाज्या आहारात घ्यायला सुरवात करा. (Oil-free spicy vegetable, make nutritious and delicious cluster beans without using a drop of oil)गवारीची छान परतून भाजी तुम्ही खाल्लीच असेल पण ही वाफवलेली भाजी अगदीच छान लागते, पाहा रेसिपी.

साहित्यगवार, पाणी, हळद, मीठ,  लसूण, जिरे, कोथिंबीर, लिंबू, लाल तिखट 

कृती१. छान ताजी गवारीची भाजी पाण्याने अगदी स्वच्छ धुऊन घ्या. नंतर एका पातेल्यामध्ये पाणी तापत ठेवा. त्या पाण्यामध्ये गवारीची भाजी टाका. त्यामध्ये चवीपुरते मीठ घाला. त्यामध्ये थोडी हळद घाला. भाजी छान उकळायला लागली की  मग मंद आचेवर गॅस चालू ठेवा. पातेल्यावर झाकण ठेवा आणि भाजी जरा वाफू द्या. गवार उकळवायची नसेल तर तुम्ही ती उकडूनही घेऊ शकता. तसेच वाफवूनही घेऊ शकता. गवार व्यवस्थित शिजली की मग गॅस बंद करा. 

२. ही भाजी करताना मसाला पाट्यावर वाटतात. किंवा मग कुटणीमध्ये कुटतात. तुम्ही मिक्सर वापरला तरी काहीच हरकत नाही. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घ्या. त्यामध्ये लाल तिखट घाला. तसेच मीठ घाला. कोथिंबीर बारीक चिरुन घ्या. चिरलेली कोथिंबीरही त्यामध्ये घाला. पाणी वगैरे काहीही न वापरता मस्त चटणी वाटून घ्या. ठेचून केली तर जास्त छान लागेल.  

३. गवार छान शिजली की मऊ होते. मऊ झालेली गवार मग एका खोलगट पातेल्यामध्ये काढून घ्या. त्यामध्ये लसाणाची ठेचलेली चटणी घाला. चटणी व गवार मस्त एकजीव करुन घ्या. सगळ्या भाजीला मसाला व्यवस्थित लागेल याची काळजी घ्या. 

भाताशी ही भाजी अगदीच मस्त लागते. तसेच गरमागरम भाकरीसोबत खाऊ शकतात. चपाती-पोळी सोबत खा. चवीला अगदीच झणझणीत व भन्नाट लागते.

  

 

टॅग्स :अन्नपाककृतीआहार योजना