lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > Rice Kheer Recipe: जगन्नाथ रथयात्रेचा प्रसाद बनवा घरी, भोग म्हणून खास ओडिसी खिरीची ही घ्या रेसिपी 

Rice Kheer Recipe: जगन्नाथ रथयात्रेचा प्रसाद बनवा घरी, भोग म्हणून खास ओडिसी खिरीची ही घ्या रेसिपी 

How to Make Rice Kheer: भगवान जगन्नाथाला तांदळाच्या खिरीचा विशेष नैवेद्य (special bhog for Bhagvan Jagannath) दाखवला जातो. त्यामुळे या खिरीचा एक खास मान आहे. आता हाच प्रसाद घरी करण्यासाठी बघा तांदळाच्या खिरीची खास ओरिसा स्टाईल रेसिपी.. (Odisa style rice kheer)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2022 01:03 PM2022-07-04T13:03:48+5:302022-07-04T13:04:54+5:30

How to Make Rice Kheer: भगवान जगन्नाथाला तांदळाच्या खिरीचा विशेष नैवेद्य (special bhog for Bhagvan Jagannath) दाखवला जातो. त्यामुळे या खिरीचा एक खास मान आहे. आता हाच प्रसाद घरी करण्यासाठी बघा तांदळाच्या खिरीची खास ओरिसा स्टाईल रेसिपी.. (Odisa style rice kheer)

Odisa style rice kheer, How to make rice kheer? tandalachi kheer recipe, Bhagvan Jagannath special bhog | Rice Kheer Recipe: जगन्नाथ रथयात्रेचा प्रसाद बनवा घरी, भोग म्हणून खास ओडिसी खिरीची ही घ्या रेसिपी 

Rice Kheer Recipe: जगन्नाथ रथयात्रेचा प्रसाद बनवा घरी, भोग म्हणून खास ओडिसी खिरीची ही घ्या रेसिपी 

Highlightsप्रसाद म्हणूनच नाही, पण घरी एरवीही एखादा कार्यक्रम, सण असेल तर स्वीट डिश म्हणून तुम्ही ही खीर करू शकता.

मागे २ वर्षांपासून कोरोनामुळे भगवान जगन्नाथाची रथयात्रा (Bhagvan Jagannath Rathyatra) निघाली नव्हती. पण यंदा मात्र काही तासांपुर्वीच नाहन या शहरातून भगवान जगन्नाथ रथयात्रेला मोठ्या थाटात, उत्साहात सुरुवात झाली आहे. पुढील काही दिवस हा रथयात्रा उत्सव सुरू असतो. रथयात्रा तसेच एरवी देखील जगन्नाथाला प्रसाद म्हणून तांदळाच्या खिरीचा (tandalachi kheer recipe) नैवेद्य दाखवला जातो. बाकी ५६ भोग तर असतातच पण त्यातही सगळ्यात जास्त महत्त्वाचा पदार्थ म्हणजे तांदळाची खीर (How to make rice kheer?). आता हा रथयात्रेचा प्रसाद घरी करायचा असेल तर त्यासाठी बघा ही खास रेसिपी. ही रेसिपी इन्स्टाग्रामच्या _thefoodiewiththebook_ या पेजवर शेअर (instagram share) करण्यात आली आहे. प्रसाद म्हणूनच नाही, पण घरी एरवीही एखादा कार्यक्रम, सण असेल तर स्वीट डिश म्हणून तुम्ही ही खीर करू शकता.

 

ओडिसा स्पेशल खीर रेसिपी
साहित्य

अर्धा कप तांदुळ, एक लीटर उकळलेले दूध, १ टेबलस्पून तूप, ८- १० काजू आणि ८- १० मनुका, १ कप साखर, तेजपत्ताची २ पाने, वेलची, बदाम आणि पिस्ताचे काप आणि चिमुटभर मीठ, २ ते ३ टेबलस्पून कंडेन्स्ड मिल्क
रेसिपी
- यासाठी सगळ्यात आधी तांदुळ धुवून २० ते २५ मिनिटे पाण्यात भिजवून घ्यावेत.
- यानंतर एक पॅन गॅसवर ठेवा. त्यात तूप टाका आणि मंद आचेवर काजू आणि मनुका तुपात परतून घ्या.
- काजू- मनुका पॅनमधून काढून घ्या. त्यात ३ ते ४ टेबलस्पून साखर टाका. त्याचा पाक करून घ्या.


- साखरेच्या पाकामध्येच तेजपान, वेलची आणि भिजवलेले तांदूळ टाकून २ मिनिटांसाठी परतून घ्या.
- यानंतर त्यात उकळलेले दूध टाका आणि सगळे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या.
- साधारण ४० ते ४५ मिनिटे मंद गॅसवर दूध उकळू द्या. त्यानंतर त्यात साखर, चिमुटभर मीठ आणि २ ते ३ टेबलस्पून कंडेन्स्ड मिल्क टाका. सगळे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या.
- खिरीतले तांदूळ एकदा चमच्यात घेऊन हाताने दाबून बघा. तांदूळ शिजले की वरतून तळलेले काजू आणि मनूका, तसेच बदाम आणि पिस्त्याचे काप टाका. 
- पुन्हा एकदा छान वाफ आली की खीर झाली तयार.
- गरम किंवा थंड, तुमच्या आवडीनुसार ही खीर तुम्ही कशीही खाऊ शकता. 
- तांदळाची खीर अतिशय पौष्टिकही मानली जाते. 

 

Web Title: Odisa style rice kheer, How to make rice kheer? tandalachi kheer recipe, Bhagvan Jagannath special bhog

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.