काही पदार्थ जे आपण घाई आहे म्हणून पटकन करुन खातो ते खरे आरोग्यासाठी चांगले असतात. (Nutritious rice porridge is very special for health!! Give it to children and you can eat it too)फक्त वेळेला केले जाणारे हे पदार्थ खरं तर आहारात समाविष्ट असायला हवेत. पावसाळ्याच्या दिवसात काय खावे यावर बारकाईने लक्ष ठेवणे फार गरजेचे आहे. कारण पाऊस पडतोय मज्जा म्हणून आपण भरपूर तेलकट असे पदार्थ खातो मात्र त्याचा आपल्या आरोग्याला फार त्रास होतो. पावसात गरमागरम घशाला बरे वाटेल असे पदार्थ खावेत. त्यात विविध पौष्टिक सूप असायला हवेत गरम पेये असायला हवीत. खिचडी भाताचे प्रकार खावेत.
लहानपणी आजारी पडल्यावर आई भाताची पेज खायला द्यायची. तोंडाला चव नसल्यामुळे ती पेज आपण पितो असे आपल्याला वाटायचे. मात्र भाताची पेज पौष्टिक असते. शरीराला ताकद देते. (Nutritious rice porridge is very special for health!! Give it to children and you can eat it too)आजारपण दूर करते. तसेच पोटासाठी आरामदायक ठरते. लहान मुलांना खिमट देताच त्यांना भाताची साधी पेजही देत जा. पचायला अगदीच हलकी असते. भातापेक्षा पचायला हलकी असते आणि पौष्टिकही जास्त असते. भाताची पेज करायची पद्धत वेगळी असते. एकदा या पद्धतीने करुन पाहा.
साहित्य तुकडा तांदूळ, तूप, पाणीकृती१. पेज करण्यासाठी शक्यतो तुकडा तांदूळ वापरला जातो. जर तुकडा तांदूळ नसेल तर साधे तांदूळ जरा हाताने मोडून घ्यायचे. तळव्याने तांदूळ चुरायचा. पाण्यात भिजत ठेवायचा. छान स्वच्छ धुवायचा.
२. एका खोलगट पातेल्यात पाणी उकळत ठेवायचे. पाणी उकळल्यावर त्यात चमचाभर तूप घालायचे. मीठ घालायचे आणि तांदूळ घालायचे. सतत ढवळत राहायचे. भात व्यवस्थित शिजवून घ्यायचा. भात शिजल्यावर ढवळून मऊ करायचा. त्यात पाणी जास्त असायला हवे. भात अगदी पातळ करायचा.
३. खायला घेताना त्यावर छान तूप घालायचे. आवडीनुसार तूप घ्या. तुपामुळे चव दुप्पट होते.
नाश्त्याला भाताची पेज करा. तसेच रात्रीच्या जेवणालाही करु शकता. रात्री जेवल्यावर अनेकांना त्रास होतो. अपचन होते. मात्र हा पदार्थ पचायला अगदी हलका असतो. त्यामुळे रात्री खाणे अगदी चांगले ठरेल. पोटाला आराम मिळेल आणि त्रासही होणार नाही.