lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > शेवग्याचा पानांचा पौष्टिक पराठा.... ही झक्कास ब्रेकफास्ट रेसिपी एकदा करून तर पहा...

शेवग्याचा पानांचा पौष्टिक पराठा.... ही झक्कास ब्रेकफास्ट रेसिपी एकदा करून तर पहा...

ब्रेकफास्टला काय करावे, हा अनेक गृहिणींना रोजच भेडसावणारा प्रश्न. ब्रेकफास्ट पोटभरही असला पाहिजे आणि तो पौष्टिकही असायलाच हवा, असा आपला आग्रह असतो. म्हणूनच शेवग्याच्या पानांचा पराठा ही झक्कास रेसिपी ब्रेकफास्ट कसा असावा, या चौकटीत अगदी चपखल बसते आणि सगळ्यांना अगदी मनापासून आवडते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 01:01 PM2021-06-20T13:01:34+5:302021-06-20T13:11:22+5:30

ब्रेकफास्टला काय करावे, हा अनेक गृहिणींना रोजच भेडसावणारा प्रश्न. ब्रेकफास्ट पोटभरही असला पाहिजे आणि तो पौष्टिकही असायलाच हवा, असा आपला आग्रह असतो. म्हणूनच शेवग्याच्या पानांचा पराठा ही झक्कास रेसिपी ब्रेकफास्ट कसा असावा, या चौकटीत अगदी चपखल बसते आणि सगळ्यांना अगदी मनापासून आवडते.

Nutritious drumstick shvaga paratha, healthy breakfast recipe | शेवग्याचा पानांचा पौष्टिक पराठा.... ही झक्कास ब्रेकफास्ट रेसिपी एकदा करून तर पहा...

शेवग्याचा पानांचा पौष्टिक पराठा.... ही झक्कास ब्रेकफास्ट रेसिपी एकदा करून तर पहा...

Highlightsशेवग्याचे एवढे फायदे आहेत की, जागतिक आराेग्य संघटनेनेही शेवग्याला चमत्कारीक वृक्ष म्हणून गौरविले आहे. शेवग्यामध्ये असणारी पोषक तत्त्वे अनेक जुनाट आजार, व्याधी नाहीशी करणारी आहेत.

शेवगा ही बाराही महिने उपलब्ध असणारी भाजी. पण तिच्या काेवळ्या पानांचे पराठे आपण केवळ पावसाळ्यातच खाऊ शकतो. त्यामुळे पावसाळ्याच्या या दिवसांमध्ये शेवग्याची कोवळी, लुसलुशीत आणि मुख्य म्हणजे अतिशय पौष्टिक असणारी पाने भाजी, पराठे या माध्यमातून अवश्य खावीत, असा सल्ला आहारतज्ज्ञ देत असतात.

 शेवगा ही मुख्यत: रानभाजी म्हणून ओळखली जाते. शेवग्याचे झाड लावणे आणि वाढविणे यासाठी फार कष्ट घेण्याची गरज पडत नाही. त्यामुळे थोडे मोेकळे अंगण असले तरी शेवग्याचे झाड तिथे वाढू शकते. त्यामुळेच  महाराष्ट्रातील जवळपास सर्वच प्रांतांमध्ये शेवगा अगदी मुबलक प्रमाणात आढळतो. 


शेवग्याच्या पानांमध्ये ए, सी ही जीवनसत्वे मोठ्या प्रमाणात असतात. तसेच कॅल्शियम, पोटॅशियम, लोह आणि प्रोटीन्सचे प्रमाणही भरपूर असते. तसेच अमिनो ॲसिड, ॲण्टीऑक्सिडंट्स यांचेही योग्य प्रमाण असते. शरीराच्या पोषणासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्याच गोष्टी शेवग्याच्या पानांमध्ये मुबलक प्रमाणात असल्याने शेवग्याचा पराठा नक्कीच एक हेल्दी ब्रेकफास्ट रेसिपी होऊ शकतो. 

शेवग्याबाबत थोडी माहिती
मॉरिंगा ओलायफेरा हे शेवग्याचे शास्त्रीय नाव आहे. शेवग्याची पाने, फुले, शेंगा या सर्वच गोष्टी पौष्टिक असतात आणि आपण त्यांचा वेगवेगळा उपयोग खाण्यासाठी करू शकतो. 

शेवग्याच्या पानांचा पराठा करण्याची रेसिपी
साधारण एक मोठी वाटी भरून शेवग्याची कोवळी पाने घ्या. ती अगदी बारीक चिरून घ्यावीत. चार कप तांदळाचे पीठ घेऊन त्या पीठात ही पाने टाकावीत. तांदळाचे पीठ नसेल तर थोडी कणीक आणि थोडे ज्वारीचे पीठही आपण वापरू शकतो. पीठ भिजविताना त्यात थोडा चिरलेला कांदा, टाेमॅटो आणि कोथिंबीरही टाकावी. तिखटाऐवजी अद्रक, लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट वापरल्यास चव अधिकच चांगली होते. आता हे सगळे साहित्य एकत्र करून पीठ चांगल्या पद्धतीने मळून घ्यावे. त्याचे पराठे लाटून तव्यावर भाजून घ्यावेत. पराठे अधिक चविष्ट होण्यासाठी भाजताना तव्यावर तूप सोडावे. 

 

शेवग्याचे आरोग्याला होणारे फायदे
१. शेवग्याच्या पानांचा रस रक्तदाब, मधुमेह आणि शरीरातील ग्लूकोजची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो.
२. शेवग्याची पाने पोटातील जंत नष्ट करतात आणि पचनशक्ती सुधारतात. 
३. अस्थमा, दमा या आजारातही शेवगा उपयुक्त ठरतो.
४. एक ते तीन वर्षांच्या लहान मुलांसाठी आणि गर्भवती मातांसाठी शेवगा म्हणजे अमृत मानले जाते. 
५. शेवग्याच्या शेंगेतील अ जीवनसत्व डोळ्यांचे विकार दूर करतात.
६. शेवग्याच्या नियमित सेवनामुळे त्वचेचा पोत सुधारतो आणि पिंपल्सची समस्या दूर होते.

Web Title: Nutritious drumstick shvaga paratha, healthy breakfast recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.