Dinner Food Tips : सततचं आजारपण कसं टाळायचं, वजन नियंत्रित कसं ठेवायचं, फिट कसं रहायचं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे पौष्टिक आहार, हेल्दी लाइफस्टाईल आणि नियमित एक्सरसाईज. जर या तीन गोष्टी तुम्ही काटेकोरपणे पाळल्या तर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये एक रूपयाही खर्च करण्याची वेळ येणार नाही. सोबतच खाण्या-पिण्याचे काही नियम असतात. जे आयुर्वेदातही सांगण्यात आले आहेत आणि न्यूट्रिशनिस्टही सतत सांगत असतात. कधी काय खावं, कधी काय खाऊ नये या गोष्टी आरोग्यासाठी खूप महत्वाच्या असतात. जर हे नियम पाळले गेले नाही तर आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या गंभीर समस्याही होऊ शकतात.
आपण जे काही खातो त्यातून शरीराल पोषण मिळत असतं. रक्त तयार होतं, स्नायू मजबूत होतात, मेंदू व्यवस्थित काम करतो असे अनेक फायदे मिळतात. त्याशिवाय वेगवेगळ्या गंभीर आजारांचा धोकाही कमी होतो. सामान्य सगळेच लोक दिवसातून तीन वेळा जेवण करतात. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवणं असा टाइमटेबल ठरलेला असतो. त्यामुळे या तिन्ही खाण्यात योग्य पदार्थ असणं गरजेचं असतं. अशात आज आम्ही तुम्हाला रात्रीच्या जेवणात काय खाऊ नये याबाबत सांगणार आहोत.
न्यूट्रिशनिस्ट साक्षी लालवाणी यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करून ५ अशा गोष्टींबाबत सांगितलं आहे, ज्या तुम्ही रात्री खाणं टाळल्या पाहिजेत. जर या गोष्टी रात्री खाल्ल्या तर पचन व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे पोटासंबंधी अनेक समस्या होऊ शकतात.
पालक
पालक भरपूर लोक नियमितपणे खातात. पण न्यूट्रिशनिस्ट साक्षीनुसार, पालक रात्री अजिबात खाऊ नये. पालक भाजीमध्ये आयर्न आणि फायबर भरपूर असतं. जे रात्री पचवणं जरा अवघड असतं. कारण रात्रीच्या वेळी पचनक्रिया स्लो होते. रात्री जर पालक खाल्ली तर पोट फुगणे, गॅस, अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठता अशा समस्या होऊ शकतात.
फळं आणि ज्यूस
न्यूट्रिशनिस्टनुसार, रात्री फळं खाणं किंवा फळांचा ज्यूस पिणं सुद्धा टाळलं पाहिजे. फळांमध्ये खूप पोषण मिळत असलं तरी यातील नॅचरल शुगरमुळे सूज निर्माण होते आणि तुम्हाला चांगली झोपती लागत नाही.
काकडी आणि बीट
सामान्यपणे सगळेच लोक जेवण करताना सलाद खातात. यात काकडी, बीट या गोष्टी असतात. पण रात्री या गोष्टी खाणं टाळलं पाहिजे, असा सल्ला न्यूट्रिशनिस्ट देतात. कारण या दोन्ही गोष्टी थंड असतात, ज्यामुळे पचनासाठी आवश्यक अग्नि कमजोर होते.
मोड आलेले कडधान्य
मोड आलेल्या कडधान्यातून शरीराला भरपूर पोषण मिळतं. पण यात फायबर भरपूर असल्यानं हे रात्री खाऊ नये. कारण यामुळे गॅस आणि पोटासंबंधी समस्या होऊ शकते.
दही
दही खाणं भरपूर लोकांना आवडतं. खासकरून उन्हाळ्यात दही भरपूर खाल्लं जातं. मात्र, दही रात्री खाल्ल्यास कफ होण्याचा धोका असतो. तसेच दही थंड असल्यानं पचनक्रिया आणखी स्लो होऊ शकते.