Lokmat Sakhi >Food > कोणत्या तांदळाचा भात आरोग्यासाठी जास्त फायदेशीर? एक्सपर्टनी सांगितली नावं!

कोणत्या तांदळाचा भात आरोग्यासाठी जास्त फायदेशीर? एक्सपर्टनी सांगितली नावं!

Best Rice : भातानं शरीराला ऊर्जा तर मिळतेच, सोबतच भरपूर पोषणही मिळतं. तांदूळ वेगवेगळ्या प्रकारचे असतात, पण सगळ्यात हेल्दी तांदळाची निवड करणं जरा अवघड असतं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 11:09 IST2025-01-24T11:09:24+5:302025-01-24T11:09:58+5:30

Best Rice : भातानं शरीराला ऊर्जा तर मिळतेच, सोबतच भरपूर पोषणही मिळतं. तांदूळ वेगवेगळ्या प्रकारचे असतात, पण सगळ्यात हेल्दी तांदळाची निवड करणं जरा अवघड असतं.

Nutritionist told brown and red rice is best option for Indians health, know the right way to cook | कोणत्या तांदळाचा भात आरोग्यासाठी जास्त फायदेशीर? एक्सपर्टनी सांगितली नावं!

कोणत्या तांदळाचा भात आरोग्यासाठी जास्त फायदेशीर? एक्सपर्टनी सांगितली नावं!

Best Rice : भात भारतातील प्रमुख आहारापैकी एक आहे आणि प्रत्येक घरात रोज भात खाल्ला जातोच. दक्षिण भारत, पूर्व भारत आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यांमुळे भात मुख्य जेवण असतो. भातानं शरीराला ऊर्जा तर मिळतेच, सोबतच भरपूर पोषणही मिळतं. तांदूळ वेगवेगळ्या प्रकारचे असतात, पण सगळ्यात हेल्दी तांदळाची निवड करणं जरा अवघड असतं.

भात खाण्याचे फायदे

पोषक तत्वांबाबत सांगायचं तर भातातून शरीराला आवश्यक कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन आणि मिनरल्स मिळतात. भात हलका आणि पचायला सोपा असतो. रेड राइसमध्ये फायबर आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात, जे कोलेस्टेरॉल कमी करून हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवतात. ब्राउन राइस आणि रेड राइसमध्येही भरपूर फायबर असतं. ज्यामुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं आणि वजनही कंट्रोल राहतं.

सगळ्यात चांगले तांदूळ कोणते?

तांदळातील पोषण त्याचा प्रकार आणि शिजवण्याच्या पद्धतीवर अवलंबून असतं. तांदूळ वेगवेगळ्या प्रकारचे असतात, अशात हे जाणून घेणं गरजेचं असतं की, आरोग्यासाठी सगळ्यात बेस्ट तांदूळ कोणते? होलिस्टिक न्यूट्रिशनिस्ट प्रियांशी भटनागर यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.

ब्राउन राइस

ब्राउन राइस सगळ्यात हेल्दी पर्याय मानला जातो. कारण यात फायबर भरपूर प्रमाणात असतं आणि कमी प्रोसेस्ड असतो. ब्राउन राइसच्या फायद्यांबाबत सांगायचं तर यात फायबर भरपूर असल्यानं पचनक्रिया सुधारते आणि शुगर कंट्रोल करतं. यात मॅग्नेशिअम, फॉस्फोरस, सेलेनियम आणि व्हिटॅमिन बी सारखे पोषक तत्व भरपूर असतात. हा भात खाल्ल्यावर पोट जास्त वेळ भरलेलं राहतं, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते.

ब्राउन राइस शिजवण्याची योग्य पद्धत

एक्सपर्टनी सांगितलं की, जर तुम्हाला ब्राउन राइसपासून जास्त फायदे मिळवायचे असेल तर हे शिजवण्याआधी २० ते ३० मिनिटं पाण्यात भिजवून ठेवा आणि जास्त पाण्याचा वापर करा. असं केल्यानं यातील पोषक तत्व वाढतात. ब्राउन राइस भाज्यांसोबत खाऊ शकता. पांढऱ्या तांदळाऐवजी या तांदळाचा रोजच्या आहारात समावेश करा.

ब्राउन राइसचे फायदे

- ब्राउन राइसमध्ये फायबर जास्त असतं, जे पचन तंत्र मजबूत ठेवण्यास मदत करतं. फायबरनं बद्धकोष्ठतेसारखी समस्या दूर करण्यास मदत मिळते.

- तसेच यात कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आणि फायबर असतं, ज्यामुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं.

- ब्राउन राइसचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, ज्यामुळे यानं ब्लड शुगर कंट्रोल करण्यास मदत मिळते.

- यातील मॅग्नेशिअम आणि फायबर कोलेस्टेरॉल लेव्हल नियंत्रित करतं. ज्यामुळे हृदयारोगांचा धोका कमी होतो.

- ब्राउन राइसमध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स असतात, जे शरीराला हळूहळू ऊर्जा देतात. यानं दिवसभर शरीरात ऊर्जा कायम राहण्यास मदत मिळते.

- हा भात खाल्ल्यानं हाडं मजबूत होतात आणि शरीरातील अवयव आपली कामं व्यवस्थित करतात.

- ब्राउन राइसमध्ये लिगनान्स आणि फेनोलिक तत्व असतात, जे शरीरातील फ्री रॅडिकल्ससोबत लढून कॅन्सरचा धोका कमी करतात.

आणखी कोणता तांदूळ बेस्ट?

एक्सपर्टनी सांगितलं की, ब्राउन राइस व्यतिरिक्त तुम्ही रेड राइसही खाऊ शकता. लाल तांदूळ खासकरून दक्षिण आणि पूर्व भारतात लोकप्रिय आहे. यात अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स भरपूर असतात. हा भात खाल्ल्यास शरीरातील सूज कमी होते, हृदय निरोगी ठेवण्यास मदत मिळते, कोलेस्टेरॉल कमी होतं. हा भात हृदयाच्या रूग्णांसाठी खूप फायदेशीर असतो. यानं आयर्नची कमतरता दूर होते.

ब्लॅक राइसमध्येही भरपूर पोषण

एक्सपर्टनुसार, काळ्या तांदळाला "फॉरबिडन राइस" म्हटलं जातं. यात भरपूर पोषण असतं. तसेच यात भरपूर प्रमाणात अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात, ज्यामुळे अनेक आजारांपासून बचाव होतो. या तांदळाचा भात ग्लूटेन-फ्री, एलर्जी असलेल्या लोकांसाठी फायदेशीर आहे. त्याशिवाय हा भात मेंदू आणि इम्यूनिटीसाठीही चांगला असतो.

Web Title: Nutritionist told brown and red rice is best option for Indians health, know the right way to cook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.