Join us

तापत्या उन्हात शरीर थंड ठेवायचंय? ऋजुता दिवेकर सांगतात ३ गारेगार पदार्थ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 16:16 IST

Cooling Foods : प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्ट रूजुता दिवेकर यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात त्यांनी अशा तीन पदार्थांबाबत सांगितलं जे शरीर थंड ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात.

Cooling Foods : आता थंडी कमी होऊन तापमान वाढायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे उन्हाळा आला तब्येत सांभाळा...हे वाक्य तुम्ही अनेकांच्या तोंडून ऐकतही असाल. उन्हाळ्यात आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी हायड्रेटेड राहणं आणि योग्य आहार घेणं फार महत्वाचं ठरतं. अशात प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर (Rujuta Diwekar) यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात त्यांनी अशा तीन पदार्थांबाबत सांगितलं जे शरीर थंड ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात.

ऋजुता दिवेकर यांनी उष्णतेपासून बचाव करण्याचा सल्ला दिलाय. त्यांनी सांगितलं की, वाढत्या तापमानात शरीर आतून थंड ठेवण्यासाठी बेलाचं सरबत, भिजवलेले बदाम आणि ताक खूप फायदेशीर ठरतं. या गोष्टींमुळे शरीर तर थंड राहतंच, सोबतच आरोग्यासंबंधी अनेक फायदेही मिळतात. 

बेलाचं सरबत

बेलाचं सरबत उन्हाळ्यात पिणं खूप फायदेशीर असतं. हे एक नॅचरल हायड्रेटिंग ड्रिंक आहे. दिवेकर यांनी सांगितलं की, यात टॅनिन, फ्वेवोनॉइड्स आणि क्यूमरिन सारखे अ‍ॅंटी-इन्फ्लामेटरी तत्व असतात. ज्यामुळे सूज कमी होते. तसेच यात व्हिटॅमिन ए, सी आणि फायबर असतं. यानं इम्यूनिटी मजबूत होते आणि वेगवेगळ्या वायरल इन्फेक्शनपासून बचाव होतो.

सीझनल फळं

दिवेकर यांनी सांगितलं की, आपल्या डाएटमध्ये वेगवेगळ्या सीझनल फळांचा समावेश करा. दुपारच्या जेवणात डाळ-भाताचा समावेश करा. हे प्रीबायोटिक आणि प्रोबायटिकचं एक चांगलं मिश्रण आहे.

भिजवलेले बदाम

दिवेकर यांनी सांगितलं की, उष्णतेपासून बचावासाठी तुम्ही भिजवलेले बदाम खाऊ शकता. यानं मेंदुसोबतच त्वचे आणि नखांनाही सुरक्षा मिळते. यात थंड गुण असतात. याच कारणानं थंडाईसारख्या पेयांमध्ये बदाम टाकतात.

दुपारी प्या ताक

दिवेकर यांनी उन्हाळ्यात रोज दुपारी एक ग्लास ताक पिण्याचा सल्ला दिलाय. यात प्रोबायोटिक्स असतात, जे आतड्यांचं आरोग्य चांगलं ठेवतात. त्याशिवाय याने शरीराला इतरही अनेक फायदे मिळतात. लिव्हर डिटॉक्समध्येही यानं मदत मिळते. शरीर आतून थंड राहतं आणि हायड्रेटेड राहतं.

गुळाचं पाणी

रात्रीच्या जेवणानंतर झोपण्याआधी गुळाचं पाणी प्यावं. एक ग्लास पाण्यात १ चमचा गूळ मिक्स करा. या पाण्यानं अ‍ॅसिडिटी कमी होते आणि झोपेची क्वालिटी सुधारते. दुपारच्या जेवणात दही-भात आणि रात्रीच्या जेवणानंतर झोपण्याआधी तुम्ही गुळाचं एक ग्लास पाणी पिऊ शकता.

टॅग्स :अन्नसमर स्पेशलहेल्थ टिप्स