Lokmat Sakhi >Food > जगन्नाथपुरीच्या मंदिरात दिले जाणारे पौष्टिक पेय आता करा घरीच! प्रसादासारखा सुंदर स्वाद आणि रेसिपी खास

जगन्नाथपुरीच्या मंदिरात दिले जाणारे पौष्टिक पेय आता करा घरीच! प्रसादासारखा सुंदर स्वाद आणि रेसिपी खास

Now make the nutritious drink served at Jagannathpuri temple at home! special recipe : अशी रेसिपी कधी पाहिलीच नसेल. ओडीसाचे खास उन्हाळी सरबत. पाहा कसे करायचे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2025 14:16 IST2025-05-06T14:15:07+5:302025-05-06T14:16:47+5:30

Now make the nutritious drink served at Jagannathpuri temple at home! special recipe : अशी रेसिपी कधी पाहिलीच नसेल. ओडीसाचे खास उन्हाळी सरबत. पाहा कसे करायचे.

Now make the nutritious drink served at Jagannathpuri temple at home! special recipe | जगन्नाथपुरीच्या मंदिरात दिले जाणारे पौष्टिक पेय आता करा घरीच! प्रसादासारखा सुंदर स्वाद आणि रेसिपी खास

जगन्नाथपुरीच्या मंदिरात दिले जाणारे पौष्टिक पेय आता करा घरीच! प्रसादासारखा सुंदर स्वाद आणि रेसिपी खास

ओडीसामध्ये तयार केले जाणारे हे खास उन्हाळी सरबत आरोग्यासाठी फारच पौष्टिक आहे.(Now make the nutritious drink served at Jagannathpuri temple at home!  special recipe) याला टोंको तोरानी असे म्हटले जाते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंडावा मिळावा यासाठी हे पेय प्यायले जाते. खास म्हणजे जगन्नाथपुरी या प्रसिद्ध मंदिरात हे पेय प्रसाद म्हणून वाटले जाते. भाताची गरम पेज आपण पितो मात्र फर्मेंटेड भाताचे असे पेय नक्कीच कधी प्यायले नसेल. (Now make the nutritious drink served at Jagannathpuri temple at home!  special recipe)चवीलाही फार छान लागणारे हे पेय एकदा तरी नक्कीच प्यायला हवे.       


साहित्य
तांदूळ, पाणी, दही, अंबेहळद, कडीपत्ता, लिंबाची पाने, हिरवी मिरची, लिंबू, जिरे पूड

कृती
१. यामध्ये शिजवलेला भात वापरायचा आहे. त्यासाठी भात घ्यायचा आणि तो पाण्यात टाकून २४ तासांसाठी झाकून ठेवायचा. पाण्यात ठेवलेल्या भातामध्ये शरीरासाठी चांगला असणारा बॅक्टेरिया तयार होतो. भात वापरला नाही तर भात करताना येणारी भाताची पेज काढून घ्यायची आणि २४ तासासाठी ते पाणी झाकून ठेवायचे. या दोन पद्धतींचा उपयोग करता येईल. मात्र अख्खा दिवस भात भिजवणे गरजेचे आहे. 

२. ओली अंबेहळद घ्या. एकच तुकडा घ्या. जास्त नको. लिंबाच्या झाडाची पाने घ्या. दोन ते चार पाने घ्या. त्यांची चवही चांगली लागते. हिरव्या मिरचीचे तुकडे घ्या. जास्त तिखट होणार नाही याची काळजी घ्या. मिरची जास्त झाली तर छाती जळजळते. तिन्ही पदार्थ मिक्सरच्या भांड्यात घ्या आणि त्याची पेस्ट करा. पारंपारिक पद्धतीत कुटून घेतले जाते. तसे शक्य असेल तर कुटून घ्या.

३. भिजवलेला भात मस्त कुसकरून घ्यायचा. नंतर एका गाळणीने त्याचे पाणी गाळून घ्या. भात खाण्यासाठी वापरा पौष्टिक असतो. तसेच पेयासाठी फक्त पाणी घ्या. त्या पाण्यात वाटलेले मिश्रण घाला. आणि मस्त ढवळा.

४. कडीपत्याची कच्ची पाने तसेच लिंबाचा पाला लिंबाचे तुकडे त्या पेयात घाला. त्यात मीठ घाला. जिरे पूड घाला. नंतर हाताने ते सगळं कुसकरून एकजीव करायचं. हात वापरायचा नसेल तर स्मॅशर वापरा किंवा जास्त वेळ ढवळा. त्याचा रंग जरा पांढरा होईल. मग एका ग्लासमध्ये ओता आणि गारेगार प्या.    

Web Title: Now make the nutritious drink served at Jagannathpuri temple at home! special recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.