Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > फक्त मुखवास नाही उन्हाळ्यात बडीशेप ठरते औषधी !!! आहारात असायलाच हवी कारण ...

फक्त मुखवास नाही उन्हाळ्यात बडीशेप ठरते औषधी !!! आहारात असायलाच हवी कारण ...

Not just a mouth freshener – fennel becomes medicinal in summer, here’s why it must be in your diet : उन्हाळ्यात बडीशेप ठरते औषधी. पाहा कशी घ्यावी आहारात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2026 08:50 IST2026-04-04T08:50:00+5:302026-04-04T08:50:02+5:30

Not just a mouth freshener – fennel becomes medicinal in summer, here’s why it must be in your diet : उन्हाळ्यात बडीशेप ठरते औषधी. पाहा कशी घ्यावी आहारात.

Not just a mouth freshener – fennel becomes medicinal in summer, here’s why it must be in your diet : | फक्त मुखवास नाही उन्हाळ्यात बडीशेप ठरते औषधी !!! आहारात असायलाच हवी कारण ...

फक्त मुखवास नाही उन्हाळ्यात बडीशेप ठरते औषधी !!! आहारात असायलाच हवी कारण ...

उन्हाळा सुरू झाला की शरीरात उष्णता वाढणे, पचन बिघडणे, तोंड कोरडे पडणे अशा समस्या अनेकांना जाणवतात. अशा वेळी स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेली एक साधी पण गुणकारी गोष्ट म्हणजे बडीशेप. चवीला गोडसर आणि थंडावा देणारी बडीशेप केवळ मुखवास म्हणूनच नव्हे, तर आरोग्यासाठीही खूप उपयुक्त ठरते. बडीशेपमध्ये नैसर्गिक थंडावा देणारे गुण असतात, त्यामुळे ती उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते. (Not just a mouth freshener – fennel becomes medicinal in summer, here’s why it must be in your diet :   )तिच्यात फायबर, अँटी ऑक्सिडंट्स आणि काही महत्त्वाचे खनिज घटक असतात. बडीशेप पचन सुधारते, गॅस, अपचन आणि पोटफुगी कमी करते. त्यामुळे जेवणानंतर थोडी बडीशेप खाण्याची सवय चांगली मानली जाते.

तसेच बडीशेप शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते. तिचा सुगंध आणि चव तोंडाला ताजेपणा देतात. उन्हाळ्यात तोंडाला कोरडेपणा येतो, तो कमी करण्यासाठीही बडीशेप उपयोगी ठरते. बडीशेपमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्मही असतात, ज्यामुळे शरीरातील सूज कमी होण्यास मदत होते.

उन्हाळ्यात बडीशेप कशी फायदेशीर ठरते?
उन्हाळ्यात शरीराचे तापमान संतुलित ठेवणे खूप महत्त्वाचे असते. बडीशेप पाण्यात भिजवून ते पाणी प्यायल्यास शरीराला थंडावा मिळतो. यामुळे उष्माघाताचा धोका कमी होतो. तसेच पचन सुधारल्यामुळे पोटही चांगले राहते. 
बडीशेपचा आणखी एक फायदा म्हणजे ती भूक नियंत्रित ठेवते. उन्हाळ्यात भूक कमी लागते, पण बडीशेप खाल्ल्याने तोंडाला चव येते आणि खाण्याची इच्छा वाढते.

बडीशेपचा उपयोग अनेक प्रकारे करता येतो. सर्वात सोपा प्रकार म्हणजे मुखवास. जेवणानंतर थोडी बडीशेप खाल्ल्याने तोंडाला सुगंध येतो आणि पचन सुधारते. बडीशेप सरबत हे उन्हाळ्यातील अत्यंत लोकप्रिय आणि उपयुक्त पेय आहे. बडीशेप रात्रभर पाण्यात भिजवून ठेवली जाते, नंतर ती गाळून त्यात साखर किंवा गूळ घालून थंड करून प्यायली जाते. हे सरबत शरीराला थंडावा देते आणि ताजेतवाने ठेवते. तसेच त्याची पूड करुन साठवून ठेवता येते.

याशिवाय बडीशेप चहा (फेनेल टी) देखील करता येतो. गरम पाण्यात बडीशेप उकळून हा चहा तयार केला जातो, जो पचनासाठी खूप फायदेशीर असतो. काहीजण बडीशेपचा वापर भाजी, आमटी किंवा मसाल्यातही करतात, ज्यामुळे पदार्थाला हलकी गोडसर आणि सुगंधी चव येते. तसेच बडीशेप घालून लाडू, पन्ह्यासारखी पेये किंवा घरगुती काढे तयार केले जातात. काही ठिकाणी बडीशेप आणि साखर एकत्र करून गोड मुखवासही बनवला जातो. बडीशेप नियमित योग्य प्रमाणात घेतल्यास पचन सुधारते, अॅसिडिटी कमी होते आणि शरीर हलके राहते. उन्हाळ्यात होणारी जळजळ, उष्णता आणि तोंडातील कोरडेपणा कमी करण्यास ती मदत करते. 

Web Title : सौंफ: गर्मी में मुखवास से बढ़कर स्वास्थ्य के लिए फायदेमंद

Web Summary : सौंफ शरीर को ठंडक देती है, पाचन में मदद करती है और डिहाइड्रेशन से बचाती है। यह सूजन कम करती है, भूख नियंत्रित करती है, और सांस को ताज़ा करती है। गर्मी में इसे मुखवास, पेय या चाय के रूप में लें।

Web Title : Fennel Seeds: Summer Health Benefits Beyond a Mouth Freshener

Web Summary : Fennel seeds cool the body, aid digestion, and prevent dehydration. They reduce inflammation, control appetite, and freshen breath. Enjoy as a mouth freshener, drink, or tea for summer health.