Lokmat Sakhi >Food > ओव्हन नको नी यीस्ट नको, चीझी पिझ्झा करण्याची पाहा सोपी रेसिपी! उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांसाठी खास

ओव्हन नको नी यीस्ट नको, चीझी पिझ्झा करण्याची पाहा सोपी रेसिपी! उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांसाठी खास

No oven, no yeast, check out this easy recipe for cheesy pizza! : घरी पिझ्झा करणे अगदीच सोपे. ही रेसिपी पाहा. मुलांना नक्कीच आवडेल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2025 15:22 IST2025-04-09T15:20:30+5:302025-04-09T15:22:45+5:30

No oven, no yeast, check out this easy recipe for cheesy pizza! : घरी पिझ्झा करणे अगदीच सोपे. ही रेसिपी पाहा. मुलांना नक्कीच आवडेल.

No oven, no yeast, check out this easy recipe for cheesy pizza! | ओव्हन नको नी यीस्ट नको, चीझी पिझ्झा करण्याची पाहा सोपी रेसिपी! उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांसाठी खास

ओव्हन नको नी यीस्ट नको, चीझी पिझ्झा करण्याची पाहा सोपी रेसिपी! उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांसाठी खास

लहान मुलांनाच नाही तर मोठ्यांनाही विकतचे पदार्थ खायला आवडतात. (No oven, no yeast, check out this easy recipe for cheesy pizza! )आपण आपले भारतीय पदार्थ तर खातोच मात्र आजकाल इटालियन, चायनिज, कोरीयन असे पदार्थ लोकप्रिय आहेत. फार आवडीने खाल्ले जातात. प्रचंड महागही असतात. वेगवेगळ्या फॉरेन  फूड ब्रॅण्ड्सचे आऊटलेट्स आता भारतभर आहेत. (No oven, no yeast, check out this easy recipe for cheesy pizza! )पिझ्झा हा पदार्थ सगळ्यांना फार आवडतो. आपण पिझ्झा घरीही करतोच. मात्र पिझ्झा बेस विकतच आणतो. पिझ्झा बेस घरी तयार करणं फार सोपं आहे. शिवाय विकतच्या बेसमध्ये यीस्ट सारखे पदार्थ असतात जे पोटासाठी चांगले नाहीत. घरी मस्त चीझी पिझ्झा करायची रेसिपी पाहा. 

बेससाठी लागणारे साहित्य
मैदा, पाणी, मीठ, साखर, दही, तेल 

कृती
१. एका परातीमध्ये मैद्याचे पीठ चाळून घ्या. त्यामध्ये चमचाभर मीठ घाला. चमचाभर साखर घाला. दोन ते तीन चमचे तेल घाला. ऑलिव्ह ऑइल वापरु शकता. नसेल तर साधेही चालते. 

२. सगळं व्यवस्थित मिक्स करा. नंतर त्यामध्ये दोन ते चार चमचे दही घाला. पीठ व दही मिक्स करा. नंतर त्यामध्ये थोडे-थोडे कोमट पाणी टाका आणि छान पीठ मळून घ्या. चिकट होईल एवढे पाणी घालू नका. किमान दोन तासांसाठी तरी पीठ झाकून ठेवा. ते जरा फुलेल मग पुन्हा व्यवस्थित मळून घ्या. 

पिझ्झा करण्यासाठी साहित्य
पिझ्झा बेस, कांदा, चीज, बटर, सिमला मिरची, पनीर, चिलीफ्लिक्स, ओरेगॅनो, मीठ

कृती
१. कांदा व सिमला मिरची चौकोनी कापून घ्या. मध्यम आकाराचे तुकडे करा. पनीरचेही तुकडे करा. इतर तुमच्या आवडीचे टॉपिंग्ज वापरा. चीज किसून घ्या.

२. एका कढईमध्ये थोडे बटर घ्या. त्यामध्ये चिरलेल्या भाज्या टाका. व्यवस्थित परतून घ्या. चवीपुरते मीठ घाला. चिलीफ्लिक्स घाला ओरेगॅनो घाला. झाकून ठेवा आणि एक वाफ काढून घ्या. पनीरही छान परतून घ्या. 

३. घरी केलेला पिझ्झा बेस एका बाजूने तव्यावर बटर लाऊन भाजून घ्या. मग भाजून झालेल्या बाजूवर कांदा सिमला मिरची इतर आवडीच्या भाज्यांचे तुकडे लावा. त्यावर किसलेले चीज घाला. पुन्हा गॅसवर ठेवा. चीज वितळवण्यासाठी वर झाकण ठेवा आणि पिझ्झा शिजू द्या. नंतर वर चिलीफ्लिक्स व ओरेगॅनो घाला. 

Web Title: No oven, no yeast, check out this easy recipe for cheesy pizza!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.