Join us

ना वाफवायची गरज ना उकडायची.. १५ मिनिटांत तयार करा कोथिंबीर वडी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2025 17:59 IST

No need to steam or boil, Prepare kothimbir vadi in 15 minutes : झटपट तयार करा कुरकुरीत कोथिंबीर वडी. नक्कीच आवडेल ही रेसिपी.

काही पदार्थ असे असतात जे आपल्याला खायला तर फार आवडतात, मात्र तयार करायला किचकट असतात. (No need to steam or boil.. Prepare kothimbir vadi in 15 minutes)विकत आणून खायचे म्हणजे त्याची चव घरच्यासारखी मस्त येत नाही. शिवाय विकतचे पदार्थ फार तेलकट असतात. बाहेरचे खाणे टाळायलाच हवे. घरी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या वड्या तयार करतो. सुरळीची वडी, अळूवडी, कोथिंबीर वडी इतरही प्रकार आहेत. या वड्या तयार करायला फार किचकट आहे असे आपल्याला वाटते. (No need to steam or boil.. Prepare kothimbir vadi in 15 minutes)मात्र विविध प्रकारे या वड्या तयार केल्या जातात. कोथिंबीर वडी तयार करायची म्हणजे लांबलचक प्रक्रिया करावी लागते. म्हणून आपण ती तयार करायलाच जात नाही. पण या पद्धतीने कोथिंबीर वडी तयार करून पाहा. अगदी झटपट होते. वाफवायचे, उकडायचे काहीच कष्ट घ्यावे लागत नाहीत. 

साहित्यआलं, लसूण, हिरवी मिरची, मोहरी, पांढरे तीळ, कोथिंबीर, तांदळाचे पीठ, जिरं, मीठ, पाणी, हळद, हिंग

कृती१. कोथिंबीरीची जुडी छान बारीक चिरुन घ्या. कोथिंबीर भरपूर वापरा. त्याशिवाय वडीला मज्जा नाही. कोथिंबीर छान स्वच्छ धुऊनच वापरा. 

२. आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट तयार करा. लसूण सगळेच वापरतात असे नाही. पण लसूण खुप मस्त लागतो. पेस्ट जरा जास्त तयार करा.

३. एका कढईमध्ये तेल घ्या. त्यामध्ये मोहरी घाला. जिरे घाला. छान तडतडू द्या. नंतर त्यामध्ये हिंग घाला. पांढरे तीळ घाला. तयार केलेली आलं-लसूण-मिरचीची पेस्ट घाला. व्यवस्थित परतून घ्या. परतून झाल्यावर त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर घाला. कोथिंबीर छान खमंग परतायची. 

४. एका पातेल्यामध्ये बेसन घ्या. त्यामध्ये पाणी घाला. पातळ पीठ तयार करा. त्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्या. चवीपुरते मीठ घाला. हळद घाला. सगळं छान मिक्स करा. कोथिंबीर परतून झाल्यावर त्यामध्ये तयार पीठ घाला आणि ढवळत राहा. ढवळले नाही तर पीठ चिकटते. गरजेनुसार पाणी वापरा.   

५. पीठ घट्ट होईल आणि कढईला  सोडायला लागेल. असे झाल्यावर गॅस बंद करा. एका ताटाला तेल लावा. त्यावर पांढरे तीळ घाला. तयार पीठ त्यावर थापा. सगळीकडे समान थापून घ्या.

६. गार झाल्यानंतर त्याच्या वड्या पाडून घ्या. तेल गरम करा आणि मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.  

टॅग्स :अन्नपाककृतीहोम रेमेडीकिचन टिप्स