आलं-लिंबू पाचक आरोग्यसाठी फार चांगले असते. या पाचक पेयामधे आल्याचे उष्ण गुणधर्म आणि लिंबाच्या आम्लधर्मी व शीतल गुणधर्मांचे संतुलन असते. (No more digestive problems try 'this' remedy, make this ginger-lemon digestive at home, stomach grumbling will stop, home remedies for stomach problems )हे पेय पचनासाठी मदत करते. पचायला जड अन्नपदार्थ खाल्यास अन्नपचन प्रक्रिया चांगली व्हावी यासाठी हे पाचक चांगले आहे. आल्यामध्ये 'जिंजेरॉल' नावाचे संयुग असते. जे पचनरसांची निर्मिती वाढवते आणि पचनक्रियेला गती देते.तसेच हे संयुग अपचन, गॅसेस आणि पोटदुखी देखील कमी करते. लिंबामध्ये प्रचंड प्रमाणात जीवनसत्त्व 'सी' असते. जे अन्नपचनासोबतच शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते.
या पेयाचे नियमित सेवन केल्यास भूक व्यवस्थित लागते. ज्या लोकांना सतत अपचन, ढेकरा, पित्त किंवा गॅसेसच्या समस्या होतात, त्यांच्यासाठी आलं-लिंबू पाचक एक नैसर्गिक आणि सुरक्षित उपाय ठरतो. शिवाय, हे पेय शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासही मदत करते. आलं शरीराला उष्णता प्रदान करते आणि सर्दी-खोकल्यावर परिणामी ठरते. मात्र पचनासाठी हे पेय जादूसारखेच काम करते.
हा रस करायला अगदी सोपा आहे. अर्क एकदा तयार करुन फ्रिजमध्ये ठेवायचा. आठवडाभर तर आरामात चांगला राहतो. त्यात पाणी घालायचे आणि प्यायचे. चवही फार वाईट लागत नाही. औषध प्यायल्यासारखे वाटत नाही.
साहित्य आलं, लिंबू, सैंधव मीठ, हिंग, पाणी
कृती१. आलं किसून घ्यायचं. मस्त रसाळ ताजं आलं वापरा. सुकलेलं आलं असेल तर त्याचा रस हवा तेवढा निघणार नाही. अख्खं आलं किसायचं.
२. एका वाटीत लिंबाचा रस घ्यायचा. बिया पडणार नाहीत याची काळजी घ्यायची. लिंबाच्या रसात थोडे हिंग घालायचे. जास्त नको अगदी थोडे हिंग पुरेसे होते. त्यात चमचाभर सैंधव मीठ घाला आणि ढवळून घ्या. एका कॉटनच्या कापडात किंवा गाळणीत किसलेले आले घ्यायचे. त्याचा रस काढून घ्यायचा.
३. वाटीत लिंबाचा आणि आल्याचा सर एकत्र करायचा. मीठ आणि हिंग विरघळू द्यायचे. रसात थोडे पाणी घालायचे आणि थोड्या वेळाने प्यायचे. काही काही तासांनी दोन दोन चमचे रस प्यायचा. चवीला फार उग्र लागत असेल तर चमचाभर साखर त्यात घालू शकता.