Lokmat Sakhi >Food > निवेदिता सराफ सांगतात परफेक्ट उकडीचा मोदक करण्यासाठी एक युक्ती, पिठीत घालतात एक खास पदार्थ

निवेदिता सराफ सांगतात परफेक्ट उकडीचा मोदक करण्यासाठी एक युक्ती, पिठीत घालतात एक खास पदार्थ

Nivedita Saraf shares a trick to make perfect Ukad for Modak, adding a special ingredient to the batter : निवेदिता सराफने सांगितलेल्या टिप्स लक्षात ठेवा आणि मोदक करा. नक्कीच छान होईल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2025 15:10 IST2025-08-22T15:08:25+5:302025-08-22T15:10:01+5:30

Nivedita Saraf shares a trick to make perfect Ukad for Modak, adding a special ingredient to the batter : निवेदिता सराफने सांगितलेल्या टिप्स लक्षात ठेवा आणि मोदक करा. नक्कीच छान होईल.

Nivedita Saraf shares a trick to make perfect Ukad for Modak, adding a special ingredient to the batter | निवेदिता सराफ सांगतात परफेक्ट उकडीचा मोदक करण्यासाठी एक युक्ती, पिठीत घालतात एक खास पदार्थ

निवेदिता सराफ सांगतात परफेक्ट उकडीचा मोदक करण्यासाठी एक युक्ती, पिठीत घालतात एक खास पदार्थ

मोदक करता येणे म्हणजे एक कलाच आहे. मोदकाला आकार देणे, त्याची उकड व्यवस्थित काढणे पुरणाचे प्रमाण एकदम बरोबर घेणे आणि इतरही साऱ्या गोष्टी छान जुळून आल्यावरच मोदक छान होतात. एक गोष्ट जरी फसली की मोदकही फसला. (Nivedita Saraf shares a trick to make perfect Ukad for Modak, adding a special ingredient to the batter)त्यामुळे सगळे जण मोदक करायचा घाट घालत नाहीत. बाप्पासाठी स्वतःच्या हाताने मोदक करुन त्याचा प्रसाद दाखवण्यात मात्र एक वेगळेच समाधान आहे. तुम्हालाही मोदक फार सुंदर करता येत नाही का ? काहीच काळजी करु नका. निवेदिता सराफ यांनी काही सोप्या टिप्स सांगितल्या आहेत. त्यांना स्वतःला फार मस्त मोदक करता येत नाही म्हणून त्या कोणती पद्धत वापरतात याची रेसिपी त्यांनी दिली. पाहा काय करायचे.    

तांदळाचे पीठ घेऊन त्याची उकड काढून मग आपण मोदक करतो मात्र निवेदिता सराफ या तांदूळाचे पीठ वापरुन त्याची उकड काढत नाहीत. मोदकाची पिठी करण्यासाठी इंद्रायणी तांदूळ आणि आंबेमोहर तांदूळ समप्रमाणात घ्यायचे. ते चार तासासाठी भिजवायचे. तांदूळ भिजल्यावर ते वाटून घ्यायचे. वाटताना त्यात थोडा साबुदाणाही घालालयचा. जास्त नाही अगदी थोडा. त्यामुळे नाजूक हाताने मोदक वळता आला नाही तरी पारी फाटत नाही. मोदक अजिबात फुटणार नाही छान होईल. वाटलेले पीठ कापडाच्या मदतीने गाळून घ्यायचे. मग एका पातेल्यात तूप घ्यायचे. तापले की त्यात पीठ घालायचे आणि थोडे पाणी घालून आटवायचे. बराच वेळ आटवायचे. अगदी त्याचा गोळा होऊ द्यायचा. 

सगळ्यांनाच छान सुंदर पाऱ्या जमतातच असे नाही. त्यामुळे ज्यांना तेवढी कलाकुसर जमत नाही त्यांनी ट्रिक्स वापरायच्या. एकदम सोपी एक टिप निवेदिता सारफ यांनी सांगितली. मोदकाच्या पाऱ्या एकत्र करुन घ्यायच्या. नंतर वरच्या शेंड्याजवळ धरुन मोदक गोल फिरवायचा. हातात आलेले जास्तीचे पीठ काढायचे. एक चमचा घ्यायचा. चमच्याच्या मागची बाजू वापरुन मोदकाच्या पाऱ्या चांगल्या करता येतात. त्यासाठी पारीवर चमच्याच्या मागील बाजूने जोर द्यायचा आणि पारी छान करुन घ्यायची.      

Web Title: Nivedita Saraf shares a trick to make perfect Ukad for Modak, adding a special ingredient to the batter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.