Join us
Daily Top 2Weekly Top 5

हे ३ पदार्थ तांबे पितळाच्या भांड्यांमध्ये अजिबात ठेवू नका, पोट दुखून पडाल हमखास आजारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2026 18:22 IST

Never store these 3 foods in copper or brass utensils, you will definitely get sick with stomach ache : पाहा अन्न साठवताना केलेली ही चूक पडेल महागात.

तांबं आणि पितळ या धातूंची भांडी आपल्या स्वयंपाकघरात आजही खास वापरली जातात. पारंपरिक अशी ही भांडी घरोघरी असतात. या भांड्यांमध्ये पाणी ठेवणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते, कारण तांब्यातील सूक्ष्म घटक पाण्यात मिसळून शरीराला लाभ देतात. पण प्रत्येक पदार्थ या भांड्यांसाठी योग्य असतोच असे नाही. (Never store these 3 foods in copper or brass utensils, you will definitely get sick with stomach ache)काही पदार्थ तांब्या–पितळ्याच्या संपर्कात आल्यावर रासायनिक प्रतिक्रिया होऊन अन्न खराब होऊ शकते आणि आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो.

सर्वात आधी  लक्षात ठेवण्यासारखा पदार्थ म्हणजे ताक. ताक हे नैसर्गिकरित्या आंबट असते. तांब्या किंवा पितळ्याच्या भांड्यात ठेवले तर त्यातील आम्ल धातूसोबत प्रतिक्रिया देऊन अन्नात हानिकारक घटक निर्माण करू शकते. त्यामुळे ताक नेहमी स्टील किंवा काचेच्या भांड्यात ठेवणे योग्य ठरते.

याचप्रमाणे इतर आंबट पदार्थही या भांड्यांमध्ये ठेवणे टाळावे. उदाहरणार्थ लिंबू पाणी, चिंचेचे पाणी किंवा आमटीसारखे पदार्थ तांब्या–पितळ्याशी संपर्कात आले तर त्यांचा स्वाद बदलतो आणि ते आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकतात. दही हा देखील आंबट गुणधर्म असलेला पदार्थ आहे, त्यामुळे तो ही या भांड्यांत ठेवू नये.

टोमॅटो किंवा टोमॅटो घालून केलेले कोणतेही पदार्थ जसे की भाजी आणि रस्सा हे सुद्धा आम्लयुक्त असल्याने तांब्या–पितळ्याच्या भांड्यात साठवणे टाळावे. त्याचप्रमाणे फळांचे रस, विशेषतः संत्रा, मोसंबी किंवा इतर सिट्रस फळांचे ज्यूस, हे या धातूंशी प्रतिक्रिया करतात. त्यामुळे त्यांचा पोषकपणा कमी होऊ शकतो आणि चवही बिघडते.

लोणची हा आणखी एक पदार्थ आहे जो या भांड्यांमध्ये ठेवू नये. लोणच्यात मीठ, तेल आणि आम्ल असते. हे घटक धातूंशी प्रतिक्रिया देऊन लोणच्याची गुणवत्ता खराब करू शकतात आणि दीर्घकाळ ठेवल्यास ते खाण्यास अयोग्य होऊ शकते. लोणची मातीच्या भांड्यात साठवावी. काचेच्या भांड्यात जास्त छान राहतील. 

एकंदरीत, तांब्या आणि पितळ्याची भांडी वापरताना योग्य पदार्थांची निवड करणे खूप महत्त्वाचे आहे. पाणी साठवण्यासाठी ही भांडी उत्तम असली तरी आंबट, खारट किंवा रासायनिक प्रतिक्रिया होऊ शकणारे पदार्थ यात ठेवणे टाळले पाहिजे. शक्यतो पदार्थ साठवून ठेवताना, म्हणजे उरलेले अन्न काढून ठेवताना या प्रकारची भांडी वापरुनच नयेत .

English
हिंदी सारांश
Web Title : Avoid storing these foods in copper, brass: Health risk!

Web Summary : Storing sour foods like yogurt, buttermilk, tomatoes, pickles, and citrus juices in copper or brass utensils can cause harmful chemical reactions. Use glass or steel instead to maintain food quality and prevent health issues.
टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सहोम रेमेडी