घरात एकदा जिन्नस भरले की ते महिनाभर वापरले जाते. मात्र भाज्या आपण ताज्याच घेऊन येतो. स्वयंपाक करताना वापरल्या जाणाऱ्या या पदार्थांची साठवण करावी लागते. अनेक पदार्थ आपण कपाटात ठेवतो. तसेच बास्केटमध्ये
ठेवतो. (Never keep these 5 vegetables and fruits in the fridge, they will ruin your nutrition and cause stomach pain)मात्र बरेचसे पदार्थ फ्रिजमध्येच ठेवले जातात. फ्रिजचा वापर भारतीय घरांमध्ये कपाटाप्रमाणेच केला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का की काही पदार्थ जे आपण बिनधास्त फ्रिजमध्ये ठेवतो ते खरंतर फ्रिजमध्ये ठेवल्याने खराब होतात. खराब नाही झाले तरी त्याची गुणवत्ता कमी होते. त्या पदार्थातून मिळणारे पोषण कमी होते. पाहा असे कोणते पदार्थ आहेत जे चुकूनही फ्रिजमध्ये ठेऊ नयेत.
१. कांदा
कांदा हा साठवणीचा पदार्थ आहे. कांदे आपण एकदाच आणून ठेवतो. काही जण कांदा फ्रिजमध्येही ठेवतात. मात्र कांदा कधीच फ्रिजमध्ये ठेवू नये. कांद्याला पाणी सुटते. त्यामुळे कांदा लवकर सडतो. तसेच त्याचे पोषणही कमी होते. कांदा कायम थोड्या अंधाऱ्या जागेत ठेवावा.
२. वांगी फ्रिजमध्ये ठेवता? त्यामुळे ते आकसते. वांगं फ्रिजमध्ये कधीच ठेवायचे नाही. आपल्याला असे वाटते की फ्रिजमध्ये वांगं खराब होणार नाही. मात्र मुळात अगदी उलटी प्रक्रिया होते. वांगं खराब होतं आणि त्यावर सुरकुत्या येतात.
३. केळी कधीही फ्रिजमध्ये ठेवायची नाहीत. केळी साध्या हवामानात छान राहतात. अजिबात खराब होत नाहीत. मात्र थंड जागेत काळी पडतात. त्यामुळे केळी कधीच फ्रिजमध्ये ठेवायची नाहीत.
४. टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवायची अनेकांना सवय असते. टोमॅटो थंड जागेत ठेवल्यावर चव बदलते तसेच तो ताजा राहत नाही. जास्त काळ टिकला तरी त्याची गुणवत्ता कमी होते.
५. भोपळा कायम फ्रिजमध्येच ठेवता ? भोपळा एकदा फोडला की तो दोन दिवसात वापरावा. तसाच ठेवल्याने तो पचनासाठी अपायकारक ठरु शकतो. तसेच भोपळा फ्रिजमध्ये जास्त लवकर खराब होतो.
असे अनेक पदार्थ आहेत जे फ्रिजमध्ये ठेऊ नयेत. त्यामुळे फ्रिजमध्ये काहीही ठेवण्याआधी त्याची माहिती मिळवणे गरजेचे असते.