नवरात्रीचे दिवस आता मोठ्या उत्साहात सुरू आहेत. नवरात्रीच्या निमित्ताने देवीसाठी कित्येक पदार्थ प्रसाद किंवा नैवेद्य म्हणून केले जातात. देवीला नैवेद्य दाखवल्यानंतर तिच्यापुढे तांबुल किंवा विडा ठेवण्याची प्रथा अनेक घरांमध्ये आहे. कारण देवीला तांबुल अतिशय प्रिय असतो असे मानले जाते. त्यामुळेच या दिवसांमध्ये अनेक जणी हळदीकुंकू कार्यक्रमात घरी येणाऱ्या महिलांना तांबूल देतातच (how to make tambul for Navratri?). म्हणूनच नवरात्रीमध्ये अतिशय महत्त्व असणाऱ्या या पदार्थाची साेपी रेसिपी एकदा बघून घ्या. खूप वेळ न घालवता अगदी १० मिनिटांत तांबूल तयार.(easy and simple recipe of making tambul in Marathi)
नवरात्रीमध्ये देवीसाठी तांबुल तयार करण्याची रेसिपी
साहित्य
१५ ते २० विड्याची पानं
२ टेबलस्पून बडिशेप
नवरात्रीचे उपवास करताना ५ चुका टाळा, तब्येत बिघडेल- ९ दिवस आनंदात उपवास करायचे तर...
अर्धा टीस्पून कात
अगदी चिमूटभर चुना
२ ते ३ टीस्पून ज्येष्ठमधाची पावडर
१ ते २ टीस्पून गुलकंद
५ ते ६ लवंग आणि तेवढ्याच वेलची
कृती
सगळ्यात आधी विड्याची पानं स्वच्छ धुवून घ्या आणि त्यांची देठं काढून टाका.
पाठ दुखणं थांबेल, स्ट्रेस कमी होईल, केसही वाढतील! आलिया भटची फिटनेस ट्रेनर सांगते खास उपाय
विड्याची पानं धुतल्यानंतर पुसून अगदी कोरडी करा. त्यानंतर पानांचे बारीक बारीक तुकडे करा.
आता विड्याच्या पानाचे बारीक काप, वेलची, लवंग, ज्येष्ठमधाची पावडर, कात आणि चुना मिक्सरमध्ये घालून बारीक करून घ्या.
तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तांबुलामध्ये सुपारीही घालू शकता. पण सुपारी घातलेला तांबुल छातीमध्ये बसतो अशी अनेकांची तक्रार असते.
नवरात्रीच्या उपवासाला करून खा पौष्टिक मखाना खीर! थकवा जाऊन अंगात येईल भरपूर एनर्जी
आता मिक्सरमधून जेव्हा तुम्ही तांबूल करून घ्याल तेव्हा त्यात गुलकंद घाला आणि पुन्हा एकदा सगळं मिश्रण मिक्सरमधून फिरवून घ्या. अतिशय चवदार तांबूल तयार. गुलकंद सगळ्यात शेवटी घालावा. कारण गुलकंदाच्या चिकटपणामुळे अनेकदा विड्याची पानं चांगली बारीक होत नाहीत.