नवरात्रीचा उपवास बरेचजण करतात. उपवासाला शक्यतो आपण साबुदाण्याचे वेगवेगळे पदार्थ करुन खातो. साबुदाण्याची खिचडी, वडे असे असंख्य वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ घरोघरी (Navratri Special Sabudana Ladoo) तयार केले जातात. परंतु साबुदाण्याचे नेहमीचे तेच ते पारंपरिक पदार्थ (Sabudana Ladoo Recipe) खाऊन आपल्याला कंटाळा येतो. अशावेळी साबुदाण्याचा थोडा वेगळा पदार्थ म्हणजे साबुदाण्याचे गोड लाडू. साबुदाण्याचे लाडू फक्त चविष्टच नाहीत, तर उपवासात इन्स्टंट एनर्जी देणारे आणि पोटभरीसाठी उत्तम पर्याय ठरतात(How To Make Sabudana Ladoo For Faasting).
महिनाभर सहज टिकणारे हे लाडू आपण तयार करून ठेवू शकता आणि उपवासादरम्यान कधीही खाऊ शकता. घरच्याघरीच उपलब्ध असणाऱ्या साहित्यात पटकन तयार होणारे साबुदाण्याचे लाडू म्हणजे उपवास होईल झक्कास... या लाडूची चव इतकी अप्रतिम लागते की, उपवास नसतानाही आपण ते आवडीने खाऊ शकता. यंदाच्या नवरात्रीच्या उपवासासाठी साबुदाण्याची खिचडी, वडे करण्यापेक्षा अप्रतिम चवीचे लाडू नक्की करुन पाहा.
साहित्य :-
१. साबुदाणा - १ कप
२. साखर - १ कप
३. डेसीकेटेड कोकोनट - १ कप
४. काजू - १/२ कप
५. साजूक तूप - २ ते ४ टेबलस्पून
१. सगळ्यांतआधी पॅन हलका गरम करुन त्यात साबुदाणे घालून ते कोरडेच २ ते ३ मिनिटे परतून घ्यावेत.
२. भाजून घेतलेले साबुदाणे एका डिशमध्ये काढून थोडे थंड होऊ द्यावेत. थंड झाल्यावर साबुदाणे मिक्सरमध्ये वाटून त्याची बारीक पूड तयार करून घ्यावी. मग साबुदाण्याचे पीठ बारीक चाळणीने चाळून घ्यावे.
साजूक तुपासाठी साठवलेल्या सायीला येते दुर्गंधी? सायीत मिसळा ८ पदार्थ - कुबट वास होईल कमी...
३. याचप्रमाणे साखर आणि काजू, डेसीकेटेड कोकोनट देखील मिक्सरमध्ये घालून तिन्ही पदार्थ वेगवेगळे बारीक करून त्यांची पूड तयार करून घ्यावी.
४. आता एका कढईत साजूक तूप घेऊन त्यात साबुदाण्याचे पीठ, काजूची पावडर व डेसीकेटेड कोकोनट घालून २ ते ३ मिनिटे हलकेच परतून घ्यावे.
५. साजूक तुपात खमंग असे भाजून घेतलेलं मिश्रण एका ताटात काढून थोडे थंड होऊ द्यावेत. मग यात साखरेची पूड मिसळून सगळे मिश्रण एकजीव करून गोलाकार लाडू वळून घ्यावेत.
उपवासाचे महिनाभर टिकणारे असे गोड साबुदाण्याचे लाडू खाण्यासाठी तयार आहे.