Join us

Navratri Special Fast Food: तेल-तूप न वापरता ३ मिनिटांत साबुदाणा खिचडी, चिकट-कडक होणार नाही- खिचडी होईल मऊ-परफेक्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2025 12:05 IST

Oil-free sabudana khichdi: quick sabudana khichdi recipe: soft sabudana khichdi: उपवासाच्या दिवशी कमी तेलात किंवा तेल न वापरता खिचडी बनवायची असेल तर काही सोप्या ट्रिक्स फॉलो करा.

Navratri 2025 Special Fast Food: नवरात्रीत अनेकांचे नऊ दिवस उपवास असतात. या काळात उपवासाचे पदार्थ निवडणं थोडं कठीणचं असतं. साधे पण स्वादिष्ट, हलके आणि दिवसभर ऊर्जा देणारे पदार्थ आपण खायला हवे.(sabudana khichdi) उपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी किंवा त्यापासून बनवलेले पदार्थ हमखास खाल्ले जातात.(oil-free sabudana khichdi) पण अनेकदा साबुदाणा भिजवल्यानंतरही व्यवस्थित फुलत नाही, चिकट होतो, कडक राहातो किंवा खूप घट्ट होतो. यामुळे खिचडी बनवायला देखील आपल्याला कंटाळा येतो. (quick sabudana khichdi recipe)अनेकजण साबुदाण्याची खिचडी बनवताना भरपूर तेलाचा वापर करतात.(soft sabudana khichdi) ज्यामुळे ती खूप तेलकट होते. पण आपल्याला उपवासाच्या दिवशी कमी तेलात किंवा तेल न वापरता खिचडी बनवायची असेल तर काही सोप्या ट्रिक्स फॉलो करा.(fasting recipes sabudana) या टिप्समुळे आपण तीन मिनिटांत तेलाशिवाय मऊ आणि झटपट साबुदाणा खिचडी तयार करु शकतो. तेल न वापरता जास्त फॅटी किंवा जड वाटणार नाही. त्यामुळे पचनावर ताणही येणार नाही. (healthy sabudana khichdi)

Navratri Special Fast Food : साबुदाणा न भिजवता करा कुरकुरीत वडा, तेलात फुटणारही नाही- वातडही होणार नाही- परफेक्ट उपवासाचा पदार्थ

तीन मिनिटांत साबुदाणा खिचडी कशी बनवायची (How to Make Sabudana Khichdi in 3 Minutes)

प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर शिखा यांनी तीन मिनिटांत साबुदाणा खिचडी कशी बनवायची याविषयी सांगितलं आहे. त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला साबुदाणा भिजवावा लागेल. एका पसरट भांड्यात साबुदाणा बुडेल इतक पाणी घाला. ६ ते ७ तास चांगले भिजवून घ्या. आता अर्धा किलो साबुदाण्यासाठी एक मोठा उकडलेला बटाटा घेतला. शेंगदाणे भाजून त्याचे साल काढून घ्या. मिक्सरच्या भांड्यात त्याचा जाडसर कूट तयार करा. आता हवं असल्यास लिंबाचा रस, एक चमचा साखर, दोन चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि थोडे जिरे घाला. यात मीठ आणि हवे असल्यास इतर साहित्य घालू शकता. 

 

साबुदाणा तेलमुक्त बनवण्यासाठी आपल्याला मायक्रोवेव्हचा वापर करावा लागेल. आता साबुदाण्यात सर्व साहित्य मिक्स करुन मायक्रोवेव्हमध्ये दीड मिनिटांसाठी ठेवा. काही वेळात साबुदाणा शिजेल, त्यानंतर पुन्हा व्यवस्थित एकजीव करा. जर आपल्याकडे मायक्रोवेव्ह नसेल तर आपण कढईत देखील वाफेवर बनवू शकतो. यामुळे ऑईल फ्री साबुदाणा झटपट बनेल. 

टॅग्स :शारदीय नवरात्रोत्सव २०२५नवरात्रीअन्नपाककृती