Join us

उपवासाची काजू कतली! करायला सोपी, जिभेवर रेंगाळणारी चवं - फराळाच्या ताटात हवाच असा पदार्थ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2025 13:40 IST

Navratri fasting special kaju katli recipe : vrat kaju katli recipe : kaju katli for navratri fast : easy kaju katli recipe for fasting : how to make kaju katli for vrat : upvas sweet kaju katli recipe : उपवासाची मऊसूत तोंडात टाकताच विरघळणारी काजू कतली यंदाच्या उपवासाला नक्की करुन पाहा.

नवरात्रीच्या सणाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. सण - उत्सव म्हटला की आपसूकच गोडाधोडाचे पदार्थ आलेच. नवरात्रीत अनेकांचे उपवास असतात, उपवासाला नेहमीचे तेच तेच (Navratri fasting special kaju katli recipe) पदार्थ खाऊन कंटाळा येतो, अशावेळी काहीतरी वेगळं आणि गोड काहीतरी खावंसं वाटतं. अशावेळी आपण बाहेरुन विकतची मिठाई आणण्यापेक्षा घरच्याघरीच, चक्क उपवासाची काजू कतली तयार (vrat kaju katli recipe) करु शकतो. ऐन उपवासात गोड खाण्याची इच्छा झाली तर आपण झटपट उपवासाची काजू कतली अगदी पोटभर खाऊ शकतो(how to make kaju katli for vrat).

उपवासाची काजू कतली तयार करण्यासाठी फारसे साहित्य देखील लागत नाही. कमी साहित्यात झटपट तयार करता येईल अशी उपवासाची काजू कतली चवीला अप्रतिम लागते आणि तितकीच पौष्टिकही असते. काजूची शाही चव, मखाण्यांची पौष्टिकता असलेली ही उपवासाची मऊसूत तोंडात टाकताच विरघळणारी काजू कतली यंदाच्या उपवासाला नक्की करुन पाहा. उपवास स्पेशल गोड काजू कतली कशी तयार करायची याची सोपी रेसिपी पाहूयात.     

साहित्य :- 

१. मखाणे - ३ कप २. काजू - १/२ कप ३. डेसीकेटेड कोकोनट - १ टेबलस्पून ४. मिल्क पावडर - २ टेबलस्पून  ५. साजूक तूप - १ टेबलस्पून ६. दूध - ३ ते ४ टेबलस्पून ७. ड्रायफ्रुटस - २ ते ३ टेबलस्पून ८. वेलची - ३ ते ४

ऐश्वर्या नारकर सांगतात, उपवासासाठी रताळ्याच्या हलव्याची रेसिपी! पारंपरिक पदार्थ - होईल झटपट फस्त...   

इडली - डोशाचं पीठ जास्त आंबलं,फेकून देण्याआधी वाचा ८ फायदे!  घराच्या स्वच्छतेसाठीही उपयोगी...

कृती :- 

१. एका पॅनमध्ये मखाणे कोरडे भाजून घ्यावेत. त्यानंतर त्याच पॅनमध्ये काजू देखील कोरडे खरपूस भाजून भाजून घ्यावेत. २. आता भाजून घेतलेले मखाणे आणि काजू थोडे थंड होऊ द्यावेत. ३. मिक्सरच्या मोठ्या भांड्यात भाजून घेतलेले मखाणे ओतून त्याची बारीक पूड तयार करून घ्यावी. ४. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काजू व वेलची घालून त्याची देखील एकत्रित बारीक पूड करून घ्यावी. ५. आता एका मोठ्या बाऊलमध्ये, मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेली मखाणा पूड,काजू व वेलचीची पूड, डेसीकेटेड कोकोनट, मिल्क पावडर, गरजेनुसार थोडे दूध व साजूक तूप घालून पीठ मळून घ्यावे. 

नागवेलींच्या पानांचा वेल वाढत नाही, पाने गळतात? ५ टिप्स - हिरव्यागार वेल वाढेल जोमाने... 

६. बटर पेपर अंथरून त्यावर तयार पिठाचा गोळा ठेवून लाटून घ्यावा. ७. लाटून घेतलेल्या या मिश्रणावर ड्रायफ्रूट्सचे काप भुरभुरवून पुन्हा एकदा लाटून घ्यावे. ८. मग या पोळीप्रमाणेच गोलाकार लाटलेल्या मिश्रणाचे काजूकतलीच्या आकाराचे काप सुरीने काढून घ्यावेत. 

उपवासाची गोड काजू कतली खाण्यासाठी तयार आहे. 

टॅग्स :शारदीय नवरात्रोत्सव २०२५नवरात्री उपवास आणि पदार्थ २०२४अन्नपाककृतीनवरात्री