Lokmat Sakhi >Food > नवरात्रीत देवीच्या नैवेद्याला करा साजूक तुपातला बदामाचा शिरा... बघा एकदम सोपी- चवदार रेसिपी 

नवरात्रीत देवीच्या नैवेद्याला करा साजूक तुपातला बदामाचा शिरा... बघा एकदम सोपी- चवदार रेसिपी 

Food And Recipe: नवरात्रीत एखाद्या दिवशी देवीच्या नैवेद्यासाठी हा बदामाचा शिरा करून पाहा (How to make almond halwa)... रेसिपी अगदी सोपी आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2023 02:21 PM2023-10-19T14:21:49+5:302023-10-19T14:24:42+5:30

Food And Recipe: नवरात्रीत एखाद्या दिवशी देवीच्या नैवेद्यासाठी हा बदामाचा शिरा करून पाहा (How to make almond halwa)... रेसिपी अगदी सोपी आहे.

Navratri Fast Special Recipe: How to make almond halwa, Badam sheera recipe | नवरात्रीत देवीच्या नैवेद्याला करा साजूक तुपातला बदामाचा शिरा... बघा एकदम सोपी- चवदार रेसिपी 

नवरात्रीत देवीच्या नैवेद्याला करा साजूक तुपातला बदामाचा शिरा... बघा एकदम सोपी- चवदार रेसिपी 

Highlightsएखाद्या दिवशी बदामाचा शीरा करून पाहा. रेसिपी अगदी सोपी आहे.

नवरात्रीमध्ये अनेक घरांमध्ये देवीसाठी दररोज काहीतरी वेगळा नैवेद्य केला जातो. अशावेळी रोज काय नविन करावं, हा प्रश्न असतोच. शिवाय बऱ्याचदा असंही होतं की आपल्याकडे खूप कमी वेळ असतो. त्यामुळे झटपट होईल असा पदार्थ नैवेद्याला करता आला, तर आणखी चांगलं. म्हणूनच आता एखाद्या दिवशी बदामाचा शीरा (Badam sheera recipe) करून पाहा. रेसिपी अगदी सोपी आहे. शिवाय ती करायला खूप वेळही लागत नाही. बदाम आरोग्यासाठी पोषकच आहेत. त्यामुळे हा शीरा खाल्ल्याने तब्येतीलाही फायदाच होईल हे नक्की (How to make almond halwa). बदाम खूप जास्त प्रमाणात खाणं योग्य नसतं कारण ते उष्ण असतात. त्यामुळे आपण नेहमीचा शीरा जसा खातो तसा हा शीरा डिशभर घेऊन खाऊ नका. एक किंवा दोन टेबलस्पून एवढाच तो खावा (Navratri Fast Special Recipe).

 

बदामाचा शीरा करण्याची रेसिपी

साहित्य

१. एक वाटी बदाम

२. पाऊण वाटी तूप बदामाचा शीरा करायला तूप जरा जास्त लागतं

खाऊन पाहिली कधी उपवासाची झुणका भाकरी? ही घ्या मस्त रेसिपी- फराळही होईल चमचमीत- चवदार

३. पाऊण वाटी साखर तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी- जास्त करू शकता.

४. दिड वाटी दूध

५. १ टेबलस्पून लाल मनुका 

६. केशराच्या ७ ते ८ काड्या

 

कृती

१. सगळ्यात आधी तर बदाम रात्री पाण्यात भिजत घाला. रात्रभर ते चांगले भिजू द्या

२. दुसऱ्या दिवशी सकाळी बदामाची टरफलं काढून टाका आणि ते मिक्सरमधून फिरवून त्याची जाडीभरडी पेस्ट करून घ्या. अगदी बारीक पेस्ट करू नये आणि मिक्सरमधून फिरवताना त्यात पाणीही टाकू नये.

शिल्पा शेट्टी करतेय मुलासोबत व्यायाम, बघा मुलाला नेमकं शिकवतेय तरी काय- व्यायामाचा हा कोणता प्रकार?

३. कढई गॅसवर तापायला ठेवा आणि त्यात तूप टाका.

४. तूप गरम झालं की त्यात मनुका टाकून परतून घ्या. तसेच अर्धी वाटी दुधात केशराच्या काड्या भिजायला टाकून द्या.

५. यानंतर मिक्सरमधून फिरवलेली बदामाची पेस्ट कढईत टाका आणि मंद आचेवर व्यवस्थित लालसर होईपर्यंत परतून घ्या.

६. यानंतर त्यात केशराचे दूध आणि साधे दूध टाका. मध्यम आचेवर हे मिश्रण उकळू द्या. अधून मधून हलवत राहा.

७. सगळं दूध आळून आलं की मग त्यात साखर टाका आणि पुन्हा एकदा सगळं मिश्रण आळून येईपर्यंत शीरा शिजू द्या. गरमागरम शीरा झाला तयार. 

 

 

Web Title: Navratri Fast Special Recipe: How to make almond halwa, Badam sheera recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.