नवरात्रीचे(Navratri 2025) शेवटचे दोन दिवस अर्थात अष्टमी आणि नवमी ही तिथी पूजेच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते. या दिवशी अनेक घरात कुंकुमार्चन, नवचंडी याग, ओटीभरण तसेच कुमारिकापूजनदेखील केले जाते. कुमारिका अर्थात लहान मुलींची देवीचे बालरूप समजून केलेली पूजा खास असते. लहान मुलींना बोलावून त्यांचे पाद्यपूजन केले जाते, त्यांना आवडते खेळणे भेट म्हणून दिले जाते आणि नैवेद्य म्हणून काळ्या वाटण्याची उसळ, पुऱ्या आणि शिरा केला जातो. कांदा-लसूण न घालता हा सात्त्विक प्रसाद करण्यासाठी दिलेल्या टिप्स फॉलो करा, तुमची कुमारिका तृप्त होईल आणि भरभरून आशीर्वाद देईल.
काळ्या वाटाण्याची उसळ साहित्य
काळे वाटाणे १ कपबटाटा १ मध्यम (बारीक चिरलेला)टोमॅटो १ मध्यम (बारीक चिरलेला)आल्याची पेस्ट १ चमचाहिरवी मिरची २-३ (बारीक चिरलेल्या)कढीपत्ता ५-६ पानेओले खोबरे २-३ चमचे (किसलेले)हळद १/२ चमचामिरची पावडर १ चमचाधने पावडर १ चमचाजिरे १ चमचातेल २-३ चमचेमीठ चवीनुसारबारीक चिरलेली कोथिंबीर
कृती :
- काळे वाटाणे रात्रभर (किंवा किमान ८ तास) पाण्यात भिजत ठेवा
- दुसऱ्या दिवशी भिजवलेले वाटाणे स्वच्छ पाण्याने धुवा. कुकरमध्ये वाटाणे आणि बटाट्याचे तुकडे, थोडे मीठ आणि पुरेसे पाणी घाला.
- कुकरच्या ३ ते ४ शिट्ट्या करून वाटाणे चांगले शिजवून घ्या. वाटाणे फार गाळ होऊ नयेत, याची काळजी घ्या.
- एका कढईत तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात जिरे आणि कढीपत्ता घालून तडतडू द्या.
- त्यानंतर लगेच आले पेस्ट आणि हिरवी मिरची घालून मंद आचेवर थोडा वेळ परतून घ्या.
- आता बारीक चिरलेला टोमॅटो घाला. टोमॅटो पूर्णपणे मऊ होईपर्यंत शिजवा.
- टोमॅटो शिजल्यावर त्यात हळद, धने पावडर आणि लाल तिखट घालून मंद आचेवर ३० सेकंद परतून घ्या.
- मसाला व्यवस्थित परतल्यावर, त्यात शिजवलेले काळे वाटाणे आणि बटाटे (पाण्यासकट) घाला.
- चवीनुसार मीठ घाला. उसळीला चांगली उकळी येऊ द्या आणि वाटाण्यांमध्ये मसाला मुरू द्या.
- पाणी जास्त वाटल्यास थोडा वेळ उकळू द्या, म्हणजे उसळ घट्ट होईल.
- गॅस बंद करण्यापूर्वी ओले खोबरे घाला आणि मिक्स करा.
टम्म फुगलेल्या पुऱ्या करण्यासाठी साहित्य :
गव्हाचे पीठ (कणिक) २ कपबारीक रवा २ चमचेमीठ चवीनुसारतेल किंवा तूप (मोहन/गरम तेल) १ ते २ चमचेपाणी आवश्यकतेनुसार (कोमट पाणी वापरल्यास उत्तम)तळण्यासाठी तेल पुरेसे
कृती
- एका मोठ्या भांड्यात गव्हाचे पीठ, रवा, मीठ आणि १ ते २ चमचे कडकडीत गरम तेल (किंवा तूप) एकत्र करून चांगले मिक्स करा.
- आता थोडे थोडे कोमट पाणी वापरून कणिक मळून घ्या. चपातीच्या कणकेपेक्षा जास्त घट्ट मळावी.
- कणिक घट्ट मळल्याने पुऱ्या तेल कमी शोषतात आणि छान फुगतात.
- कणिक मळून झाल्यावर ती २० मिनिटांसाठी एका ओल्या कपड्याने किंवा झाकणाने झाकून बाजूला ठेवा.
- मळलेल्या कणकेचे छोटे-छोट्या लिंबाच्या आकाराचे गोळे तयार करा.
- पुरी लाटताना कोरड्या पिठाचा वापर करू नका. त्याऐवजी लाटण्याला आणि पोळपाटाला हलके तेल लावा.
- पुऱ्या समान जाडीच्या लाटा. पुरी कडेला पातळ आणि मध्यभागी जाड राहिल्यास ती व्यवस्थित फुगत नाही.
- कढईत तेल चांगले कडकडीत गरम करून घ्या.
- तेल पुरेसे गरम आहे की नाही हे तपासण्यासाठी, कणकेचा छोटा तुकडा तेलात टाकून पाहा; तो लगेच वर आला पाहिजे.
- गरम तेलात पुरी सोडा. पुरी तेलात टाकल्यावर झाऱ्याच्या मदतीने हळूवारपणे हलका दाब द्या.
- दाब दिल्यावर पुरी लगेच फुगायला लागेल. फुगलेली पुरी पटकन उलटून दुसऱ्या बाजूने हलकी सोनेरी होईपर्यंत तळा.
- तळलेल्या पुऱ्या तेल निथळण्यासाठी टिशू पेपरवर काढून ठेवा.
- या पद्धतीने बनवलेल्या पुऱ्या नक्कीच टम्म फुगतील आणि जास्त वेळ कुरकुरीत राहतील!
रव्याचा शिरा करण्यासाठी साहित्य आणि कृती :
साहित्य :
बारीक रवा १ वाटीसाखर १ वाटी गरम दूध-पाणी ३ वाटी तूप १ वाटी काजू, बदाम, मनुका (ड्रायफ्रुट्स) २ चमचेवेलची पूड १/२ चमचाकेशर चिमूटभर
कृती :
- एका जाड बुडाच्या कढईत तूप गरम करा.
- तूप वितळल्यावर त्यात काजू, बदाम आणि मनुका घालून हलके सोनेरी होईपर्यंत तळून घ्या आणि एका भांड्यात काढून ठेवा.
- उरलेल्या तुपात रवा घाला. रवा मंद आचेवर हलका सोनेरी होईपर्यंत आणि खूप छान सुगंध सुटेपर्यंत भाजा.
- रवा व्यवस्थित भाजणे आवश्यक आहे, नाहीतर शिरा चिकट होतो.
- रवा भाजायला साधारण ७ ते १० मिनिटे लागतील. रवा भाजून झाल्यावर तो बाजूला काढून ठेवा.
- दुसऱ्या भांड्यात दूध आणि पाणी गरम करून घ्या.
- त्यात केशरचे धागे घाला. दूध चांगले उकळून बाजूला ठेवा.
- भाजलेला रवा पुन्हा कढईत घाला. त्यात साखर घाला आणि व्यवस्थित मिक्स करा.
- आता हळू हळू गरम दूध (केशरचे) रवा आणि साखरेच्या मिश्रणात ओता.
- या वेळी दुसऱ्या हाताने मिश्रण लगोलग ढवळत राहा, जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत.
- गॅस मंद ठेवा. मिश्रण एकजीव झाल्यावर कढईवर झाकण ठेवून २ ते ३ मिनिटे वाफ येऊ द्या. यामुळे रवा चांगला फुलतो.
- झाकण काढून त्यात वेलची पूड आणि तळून ठेवलेले सुके मेवे (ड्रायफ्रुट्स) घाला. सर्व मिश्रण पुन्हा एकदा हलक्या हाताने मिक्स करा.
- शिरा कढई सोडायला लागला आणि त्याला तूप सुटले की समजा तुमचा शिरा तयार आहे. गरमागरम आणि मऊ रव्याचा शिरा लगेच सर्व्ह करा!
Web Summary : Navratri's Ashtami & Navami are significant for puja. Prepare special prasad: black-eyed peas usal, puris, and shira without onion and garlic for Kanya Pujan. Follow these tips for a fulfilling offering.
Web Summary : नवरात्रि की अष्टमी और नवमी पूजा के लिए महत्वपूर्ण हैं। कन्या पूजन के लिए बिना प्याज और लहसुन के काले चने की उसल, पूरी और शिरा का विशेष प्रसाद तैयार करें। तृप्तिकारक भोग के लिए सुझावों का पालन करें।