Lokmat Sakhi >Food > नागपंचमी विशेष : हळदीच्या पानांतील पातोळ्या! सणासुदीला पारंपरिक पदार्थांचा गोडवा हवाच...

नागपंचमी विशेष : हळदीच्या पानांतील पातोळ्या! सणासुदीला पारंपरिक पदार्थांचा गोडवा हवाच...

Nagpanchami Special : Sweet & Super Healthy Patolya Recipe : Festival Special : Patolya Recipe : How To Make Patolya At Home : Haldichya Panatil Patolya : नागपंचमीच्या सणाला घरोघरी बनवल्या जाणाऱ्या हळदीच्या पानांतील पातोळ्यांचा सुवास व चव कायमच जिभेवर रेंगाळत राहते...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2025 14:41 IST2025-07-28T14:26:10+5:302025-07-28T14:41:38+5:30

Nagpanchami Special : Sweet & Super Healthy Patolya Recipe : Festival Special : Patolya Recipe : How To Make Patolya At Home : Haldichya Panatil Patolya : नागपंचमीच्या सणाला घरोघरी बनवल्या जाणाऱ्या हळदीच्या पानांतील पातोळ्यांचा सुवास व चव कायमच जिभेवर रेंगाळत राहते...

Nagpanchami Special Sweet & Super Healthy Patolya Recipe Nagpanchami Festival Special Patolya Patolya Recipe Haldichya Panatil Patolya | नागपंचमी विशेष : हळदीच्या पानांतील पातोळ्या! सणासुदीला पारंपरिक पदार्थांचा गोडवा हवाच...

नागपंचमी विशेष : हळदीच्या पानांतील पातोळ्या! सणासुदीला पारंपरिक पदार्थांचा गोडवा हवाच...

नागपंचमी सण उद्यावर आला आहे. प्रत्येक मुलीला माहेरची आठवण करून देणारा हा नागपंचमीचा सण. श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे (Nagpanchami Special) नागपंचमी. या दिवशी घरोघरी नाग देवाची पूजा (Patolya Recipe) करून त्याला नैवेद्य दाखवणायची प्रथा आहे. या सणाला विशेषत: गव्हाची खीर आणि चण्याची डाळ, गूळ यांपासून बनवलेल्या उकडीच्या पुरणाची दिंड, तसेच हळदीच्या पानातील पातोळ्या बनवल्या जातात(Sweet & Super Healthy Patolya Recipe).

कोकणातील काही पदार्थांची चव ही नेहमीच खास असते. काही सण असेल तर कोकणात वेगळ्या पद्धतीचे गोड पदार्थ बनवले जातात. नागपंचमीचा सण कोकणातील विशेष पारंपरिक खाद्य संस्कृतीची आठवण करून देतो. कोकणात नागपंचमीला हमखास बनणारा पदार्थ म्हणजे हळदीच्या पानांतील पातोळ्या (Haldichya Panatil Patolya). श्रावण महिन्यात स्वतःच्याच परसातील डोलणारी हळदीची पाने, माडाच्या झाडावरून काढलेले रसरशीत ओले नारळ, सुगरणींचा उत्साह (How To Make Patolya At Home) आणि खवय्यांना सणाचे निमित्त. पातोळ्यांचा पहिला घाणा वाफवायला ठेवला की घरभर दरवळणारा हळदीच्या पानांचा सुगंध खवय्यांच्या पोटातील भूक चळवतो. गरमागरम पातोळ्यांवर साजूक तुपाची धार सोडून ७ ते ८ पातोळ्या फस्त केल्यावरच आपला जीव शांत होतो(Healthy Sweet Patolya, Haldichya Panatil Patolya).

साहित्य :- 

१. तूप - ४ ते ५ टेबलस्पून 
२. किसलेलं ओलं खोबर - २ कप 
३. किसलेला गूळ - २ कप 
४. हळदीची पाने - ६ ते ८ पाने 
५. तांदुळाचे पीठ - २ कप 
६. पाणी - २ कप 
७. मीठ - चवीनुसार 
८. वेलची पूड - चिमूटभर 

नागपंचमी विशेष : पारंपरिक पदार्थ तिळाच्या करंज्या, चवीला खास आणि वेगळा पदार्थ...


श्रावणातील पदार्थ खास करा डाळिंबी भात! जेवणाची वाढेल लज्जत - खा पोटभर निवांत...

कृती :- 

१. सर्वप्रथम एका कढईत तूप घेऊन त्यात गूळ घालून तो गूळ व्यवस्थित वितळवून घ्यावा.  
२. तुपात गूळ संपूर्णपणे वितळवून झाल्यावर त्यात किसलेलं खोबर व चिमूटभर वेलची पूड घालावी. 
३. आता खोबर व गूळ एकत्रित चमच्याने ढळवून घेऊन ते एकजीव करून त्यांचे सारण बनवून घ्यावे. 
४. हे सारण एका वेगळ्या डिशमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवून द्यावे. 
५. आता एका मोठ्या भांड्यांत सम प्रमाणात पाणी व तांदुळाचे पीठ घेऊन त्या पिठाची उकड काढून घ्यावी. पिठाची उकड काढताना त्यात चवीनुसार मीठ घालावे. 

श्रावण स्पेशल : साबुदाण्याची रसमलाई! उपवासाला करा गोडाधोडाचा नवीन पदार्थ, करायलाही सोपा...

६. या पिठाची उकड काढल्यानंतर, ही उकड एका डिशमध्ये काढून घेऊन तेलाचा हात लावून ही उकड मळून घ्यावी. 
७. हळदीची पाने स्वच्छ धुवून पुसून घ्यावीत. आता या हळदीच्या पानांवर किंचितसे तेल लावून तांदुळाच्या पिठाचा गोळा हलक्या हातांनी थापून घ्यावा. 
८. त्यानंतर यात खोबऱ्याचे सारण भरून हळदीचे पान दुमडून घ्यावे, त्यानंतर सगळ्या बाजुंनी पातोळी व्यवस्थित बंद करून घ्यावी. 
९. आता एक चाळण घेऊन त्यात या सगळ्या पातोळ्या ठेवून १५ ते २० मिनिटे वाफवून घ्याव्यात. 
१०. एका मोठ्या टोपात गरम पाणी घेऊन त्यावर ही चाळण ठेवून वरून झाकण ठेवावे. 

हळदीच्या पानांतील पातोळ्या खाण्यासाठी तयार आहेत.

Web Title: Nagpanchami Special Sweet & Super Healthy Patolya Recipe Nagpanchami Festival Special Patolya Patolya Recipe Haldichya Panatil Patolya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.