Lokmat Sakhi >Food > पावसाळ्यात मुरमुऱ्याचा चिवडा सादळतो, मऊ होतो? त्यात ' हा ' मसाला घाला, चिवडा होईल कुरकुरीत

पावसाळ्यात मुरमुऱ्याचा चिवडा सादळतो, मऊ होतो? त्यात ' हा ' मसाला घाला, चिवडा होईल कुरकुरीत

Murmura Chivda (Easy Spicy Puffed Rice) : छोटी भूक भागवण्यासाठी किलोभर मुरमुऱ्याचा करा खमंग कुरकुरीत चिवडा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2024 05:12 PM2024-06-09T17:12:53+5:302024-06-09T17:13:48+5:30

Murmura Chivda (Easy Spicy Puffed Rice) : छोटी भूक भागवण्यासाठी किलोभर मुरमुऱ्याचा करा खमंग कुरकुरीत चिवडा..

Murmura Chivda (Easy Spicy Puffed Rice) | पावसाळ्यात मुरमुऱ्याचा चिवडा सादळतो, मऊ होतो? त्यात ' हा ' मसाला घाला, चिवडा होईल कुरकुरीत

पावसाळ्यात मुरमुऱ्याचा चिवडा सादळतो, मऊ होतो? त्यात ' हा ' मसाला घाला, चिवडा होईल कुरकुरीत

प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार घरात चिवडा तयार करतात (Food). चिवडा अनेक प्रकारचे केले जातात. मका, पोहा, मुरमुऱ्याचा चिवडा आपण करतोच. पण मुरमुऱ्याचा चिवडा काही वेळानंतर नरम पडतो (Cooking Tips). तर कधी साहित्यांचे प्रमाण चुकते. ज्यामुळे किलोभर चिवडा बनवूनही वाया जातो (Kitchen Tips). सादळलेला चिवडा कोणीच खाणं पसंत करत नाही.

जर आपल्याला दुकानात मिळतो तसा कुरकुरीत मुरमुऱ्याचा चिवडा करायचा असेल तर, 'या' पद्धतीने चिवडा करून पाहा. मिनिटात चविष्ट चिवडा तयार करून होईल. शिवाय महिनाभर आरामात टिकेल(Murmura Chivda (Easy Spicy Puffed Rice)).

मुरमुऱ्याचा चिवडा कसा करायचा?

लागणारं साहित्य

मुरमुरे

पिवळी शेव

लसूण

शेंगदाणे

पालकाची भाजी नेहमीचीच, करा पालकाची चटणी! तोंडी लावण्यासाठी चमचमीत पदार्थ, पालक आवडायला लागेल

चणा डाळ

हिरव्या मिरच्या

कडीपत्ता

हळद

लाल तिखट

हिंग

मीठ

कृती

- सर्वात आधी एका परातीत १०० ग्राम मुरमुरे घ्या. त्यात पाव किलो पिवळी शेव घाला. खलबत्त्यात ७ ते ८ मोठ्या लसणाच्या पाकळ्या घालून ठेचून घ्या. 
एका कढईत ५ ते ६ चमचे तेल घालून गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात ठेचलेला लसूण घालून लालसर होईपर्यंत भाजून घ्या. तळलेला लसूण एका प्लेटमध्ये काढून घ्या. त्यात एक वाटी शेंगदाणे घालून तळून घ्या.

रोजरोज चपात्या लाटण्याची गरजच नाही, ‘या’ पद्धतीनं चपात्या केल्या तर ३ महिने टिकतात

तळलेले शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घ्या. नंतर त्यात एक वाटी चणा डाळ, ५ ते ६ हिरव्या मिरच्या, एक छोटी वाटी कडीपत्ता घालून भाजून घ्या. भाजून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्या.

त्याच गरम तेलात एक चमचा हळद, लाल तिखट, हिंग, चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. मुरमुऱ्यामध्ये तळलेले सर्व साहित्य घालून मिक्स करा. शेवटी फोडणी ओतून चमच्याने साहित्य एकजीव करा. अशा प्रकारे मुरमुऱ्याचा चिवडा खाण्यासाठी रेडी.

Web Title: Murmura Chivda (Easy Spicy Puffed Rice)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.