Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > सुपरफूड नाश्ता करा वजन आपोआप होईल कमी, पाहा शेवग्याच्या पानांचं धिरडं-पोटभर पौष्टिक पदार्थ

सुपरफूड नाश्ता करा वजन आपोआप होईल कमी, पाहा शेवग्याच्या पानांचं धिरडं-पोटभर पौष्टिक पदार्थ

Weight loss breakfast ideas for Indians: Superfood Moringa recipes: शेवग्याच्या पानांचं धिरडं कसं करायचं, यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2026 09:30 IST2026-04-09T09:30:00+5:302026-04-09T09:30:02+5:30

Weight loss breakfast ideas for Indians: Superfood Moringa recipes: शेवग्याच्या पानांचं धिरडं कसं करायचं, यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया.

Moringa leaf chilla recipe Drumstick leaves cheela for weight loss Healthy breakfast recipes marathi High protein vegetarian breakfast Moringa moong dal cheela benefits | सुपरफूड नाश्ता करा वजन आपोआप होईल कमी, पाहा शेवग्याच्या पानांचं धिरडं-पोटभर पौष्टिक पदार्थ

सुपरफूड नाश्ता करा वजन आपोआप होईल कमी, पाहा शेवग्याच्या पानांचं धिरडं-पोटभर पौष्टिक पदार्थ

सध्याच्या धावपळीच्या युगात सकाळचा नाश्ता करणं फार गरजेचे आहे. जर आपल्याला वजन कमी करायचे असेल तर आहारात अशा पदार्थांचा समावेश असायला हवा जो फक्त चविष्ट नसून हाय-प्रोटीन आणि लो-कॅलरीने भरलेला असेल. (Morning Breakfast Idea) शेवग्याची पाने आणि मुगाच्या डाळीपासून आपण धिरड करु शकतो. शेवग्याच्या पाल्याला जागतिक स्तरावर 'सुपरफूड' म्हणून ओळखले जाते, कारण त्यात संत्र्यापेक्षा सात पट जास्त व्हिटॅमिन-सी आणि दुधापेक्षा चार पट जास्त कॅल्शियम असते.(Weight loss breakfast ideas for Indians)
अनेकदा वजन कमी करताना आपल्याला भूक लवकर लागते, पण मुगाच्या डाळीतील फायबर आणि प्रोटीनमुळे हे धिरडं खाल्ल्यानंतर तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहते.(Superfood Moringa recipes) हे धिरडं बनवायला अत्यंत सोपे असून, चवीला इतके अप्रतिम लागते की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण ते आवडीने खातील. ज्यांना जिम किंवा व्यायामानंतर शरीराला ऊर्जा द्यायची आहे किंवा ज्यांना रक्ताची कमतरता आणि हाडांचे दुखणे दूर करायचे आहे, त्यांच्यासाठी हा नाश्ता म्हणजे एक उत्तम औषधच आहे.  शेवग्याच्या पानांचं धिरडं कसं करायचं, यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया. (Nutritious breakfast for immunity)

हळदीचं दूध कधी प्यावं, सकाळी की रात्री? ७ फायदे, चेहऱ्यावर येईल ग्लो- हाडांना मिळेल पोलादासारखी मजबुती!

साहित्य 

शेवग्याची पाने - १ वाटी
भिजवलेली मुगाची डाळ - २ वाटी 
तेल - २ चमचे
जिरे - १ चमचा
हिरवी मिरची - १ 
लसूण पाकळ्या - ३ ते ४
मीठ - चवीनुसार 
बर्फाचे तुकडे - ३ ते ४
किसलेला गाजर - १ वाटी 
किसलेले पनीर - १ वाटी 
उकडलेला मका - १ वाटी
चिरलेला कोथिंबीर - १ छोटी वाटी 
काळे तीळ - १ चमचा
मसाला पावडर - १ चमचा

कृती 

1. सगळ्यात आधी मुगाची डाळ स्वच्छ पाण्याने धुवून २ ते ३ तास भिजवा. यानंतर शेवग्याची पाने पाण्याने धुवा. आता एका पॅनमध्ये तेल गरम करुन त्यात तेल, जिरे, हिरवी मिरची आणि लसूण पाकळ्या घालून चांगले परतवून घ्या. त्यात शेवग्याची पाने घालून रंग बदलोस्तोवर भाजून घ्या. 

2. यानंतर मिक्सरच्या भांड्यात भिजवेलली मुगाची डाळ, भाजलेले सर्व साहित्य, मीठ आणि बर्फाचे तुकडे आणि थोडे पाणी घालून त्याचे बॅटर तयार करा. 

3. आता एका बाऊलमध्ये किसलेले गाजर, पनीर, मका, कोथिंबीर आणि काळे तीळ घालून सर्व साहित्य एकजीव करा. 

4. पॅन गरम करुन त्यावर तयार बॅटर डोशासारखे पसरवा. वरुन तेल आणि मसाला घाला. धिरड्याच्या एका बाजूला तयार गाजर-पनीरचे सारण घाला. धिरड व्यवस्थित शिजल्यानंतर त्याला दुसऱ्या बाजूने बंद करुन सॉस किंवा दह्यासोबत खा. 
 

Web Title : मोरिंगा ढिरडे: वजन घटाने और पोषण के लिए सुपरफूड नाश्ता।

Web Summary : मोरिंगा ढिरडे के साथ अपने दिन की शुरुआत करें। मोरिंगा के पत्तों और मूंग दाल से बना, यह व्यंजन प्रोटीन, फाइबर और वजन घटाने और संपूर्ण स्वास्थ्य के लिए आवश्यक पोषक तत्वों से भरपूर है। इस सरल, पौष्टिक और स्वादिष्ट नाश्ते का आनंद लें!

Web Title : Moringa Dhirde: Superfood breakfast for weight loss and boosted nutrition.

Web Summary : Start your day with a healthy and tasty Moringa Dhirde. Made with moringa leaves and moong dal, this dish is packed with protein, fiber, and essential nutrients for weight loss and overall health. Enjoy this simple, nutritious, and delicious breakfast!