Join us

नाश्त्याला करा १ वाटी मुगाचे आप्पे, मुलांच्या डब्यासाठी मस्त पदार्थ- मोठ्यांचं वजनही ठेवते नियंत्रणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2024 16:13 IST

Moong Dal Appe Recipe : भरपूर भाज्या घातल्या तर मुलांच्या पोटात भाज्या जाण्यासही मदत होते.

नाश्त्याला किंवा मुलांच्या डब्याला रोज वेगळं काय करायचं असा प्रश्न महिलांसमोर कायमच असतो. हा नाश्ता मुलांना आवडणारा हवा आणि तरीही तो हेल्दी हवा यासाठी आपला अट्टाहास असतो. सतत वेगळं काय द्यायचं हे अनेकदा आपल्याला सुचत नाही. अशावेळी घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून प्रोटीन रीच नाश्ता करायचा असेल तर आज आपण एक छान सोपी रेसिपी पाहणार आहोत. आप्पे लहान आकाराचे, छान स्पाँजी असल्याने लहान मुलं ते आवडीने खातात. पण आपण नेहमी डाळ-तांदळाचे आप्पे करतो. त्या ऐवजी मूगाचे आप्पे केले तर त्यातून मुलांना प्रोटीन मिळण्यास मदत होते. मूगाची डाळ आपल्या घरात सहज उपलब्ध असते. यामध्ये भरपूर भाज्या घातल्या तर मुलांच्या पोटात भाज्या जाण्यासही मदत होते. पाहूयात हे मूगाचे आप्पे नेमके कसे करायचे (Moong Dal Appe Recipe).

१. साधारण १ ते १.५ वाटी मूगाची डाळ रात्रभर भिजत घालायची. 

२. दुसऱ्या दिवशी सकाळी ही भिजलेली डाळ, आलं-लसूण, मिरची हे सगळे मिक्सरमध्ये घालून बारीक वाटून घ्यायचे. 

३. घरात उपलब्ध असतील त्या कोबी, मटार,बीट, गाजर, कांदा, कोथिंबीर या भाज्या बारीक चिरुन यामध्ये घालायच्या. 

(Image : Google)

४. चवीसाठी यामध्ये मीठ, साखर, जीरे घालायचे आणि थोडे लिंबू पिळायचे. 

५. हे पीठ किमान २० मिनीटे झाकून ठेवायचे. 

६. त्यानंतर आप्पे पात्रात तेल घालून हे पीठ घालायचे आणि दोन्ही बाजुने खरपूस आप्पे भाजून घ्यायचे. 

७. हे गरमागरम आप्पे हिरवी चटणी, चिंचेची चटणी, सॉस यांच्यासोबत किंवा नुसतेही छान लागतात. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.