पिझ्झा या पदार्थाने लहान मुलांना वेडं केलंय.. काही अपवाद सोडले तर घरोघरी पिझ्झा आवडीने खाल्ला जातो. लहान मुलांना तर तो आवडतोच.. पण मोठ्या माणसांनाही नेहमीच पिझ्झा खाण्याची इच्छा होते आणि मग त्यावर मनसोक्त ताव मारला जातो. पण नंतर मात्र मैद्याचा पिझ्झा खाल्ला म्हणून सतत गिल्टी वाटत राहातं. म्हणूनच आता अशी गिल्टी भावना मनात येऊ नये आणि पिझ्झा खाण्याचा पुरेपूर आनंद मिळावा यासाठी मुगाच्या डाळीचा सुपरहेल्दी पिझ्झा कसा करायचा ते पाहा.. ही रेसिपी अतिशय सोपी असून पिझ्झा खूपच चवदार होतो.(healthy pizza recipe for kids tiffin and breakfast)
मुगाच्या डाळीचा पिझ्झा
साहित्य
२ वाट्या भिजवलेली मुगाची डाळ
३ ते ४ हिरव्याा मिरच्या आणि ५ ते ६ लसूण पाकळ्या
Vitamin B12 वाढवणारे ५ पदार्थ-रोज १ तरी खा, उदास मूड-अंगदुखी होईल गायब
सिमला मिरची, कांदा, टोमॅटो, कॉर्न अशा आवडीच्या भाज्या
पिझ्झा सॉस आणि टोमॅटो सॉस प्रत्येकी एकेक चमचा
आवडीनुसार चिलीफ्लेक्स, ओरिगॅनो आणि चवीनुसार मीठ
मोजेरेला जीच आणि बटर
कृती
सगळ्यात आधी भिजवलेली मुगाची डाळ, हिरव्या मिरच्या आणि लसूण मिक्सरमध्ये घालून वाटून घ्या. यानंतर त्यात चवीनुसार मीठ घाला.
गॅसवर कढई गरम करायला ठेवा. तिच्यामध्ये बटर घालून कांदा, टाेमॅटो, कॉर्न, सिमला मिरची यांच्या मोठ्या मोठ्या फोडी करून त्या हलक्या परतून घ्या. या भाज्या शिजवू नयेत.
सगळ्याच प्रकारच्या साड्यांवर ठेवणीतले दागिने घालू नका, साडीनुसार दागिन्यांची निवड करण्यासाठी ५ टिप्स
नंतर गॅसवर तवा गरम करायला ठेवा. त्याला तेल, तूप किंवा बटर लावा आणि त्यावर तयार केलेलं मुगाच्या डाळीचं पीठ घाला. डोशाप्रमाणे ते पसरवून घ्या. फक्त थोडा जाडसर थर ठेवा. यानंतर तो डोसा खालच्या बाजुने भाजून झाल्यानंतर उलटवून घ्या. आता वर आलेल्या बाजुला पिझ्झा सॉस, टोमॅटो सॉस लावा, त्यावर भाज्या, चीज, ओरिगॅनो, चिलीफ्लेक्स घालून त्यावर झाकण ठेवून वाफ येऊ द्या. गॅस मंद ठेवावा. ५ ते ७ मिनिटांत चवदार पिझ्झा तयार..
