मस्त पांढऱ्याशुभ्र रंगाचे आणि हिरवागार पाला असणारे मुळे बाजारात दिसायला लागले की हिवाळा सुरू झाल्याची नव्याने आठवण येते. छान पांढरा मुळा पाहिला की तो लगेच घेऊन त्याचे वेगवेगळे पदार्थ करून त्यांचा आस्वाद घेण्याचा मोह खवय्यांना होतोच. म्हणूनच हिवाळ्यात मुळ्याचे पराठे, मुळ्याच्या पाल्याची भाजी, मुळ्याचं इंस्टंट लोणचं असे पदार्थ आवर्जून घरोघरी केले जातात. आता या पदार्थांच्या यादीमध्ये मुळ्याची चटणीही घेऊन टाका. अतिशय सोप्या पद्धतीने अगदी झटपट मुळ्याची चटणी तयार होते आणि शिवाय ती खूप चवदारही लागते (how to make raddish or muli ki chutney?). बघा मुळ्याच्या चटणीची ही विंटर स्पेशल रेसिपी...(Winter Special Mooli ki Chutney)
मुळ्याच्या चटणीची रेसिपी
साहित्य
मुळ्याचे अर्धी वाटी काप आणि १ वाटी मुळ्याचा पाला
अर्धी वाटी कोथिंबीर आणि १ मध्यम आकाराचा टोमॅटो
हिवाळ्यात सारखी आजारपणं नको ना? २ गोष्टी आठवणीने करा- सुदृढ, निरोगी राहून थंडीचा आनंद घ्या..
अर्ध्या लिंबाचा रस आणि ३ ते ४ हिरव्या मिरच्या
१ ते दिड इंच आल्याचा तुकडा आणि लसूणाच्या ८ ते १० पाकळ्या
चवीनुसार मीठ आणि १ टीस्पून मीरेपूड
४ ते ५ आईसक्यूब
कृती
मुळ्याची चटणी करण्यासाठी सगळ्यात आधी मुळा आणि मुळ्याचा पाला दोन्ही स्वच्छ धुवून पुसून घ्या. त्यानंतर मुळाच्या पातळ काप करा आणि पाला बारीक चिरून घ्या.
काही केल्या छातीतला कफ मोकळा होईना? अंजीराचा सोपा उपाय- कफ, खोकला कमी होईल
यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मुळ्याचे काप, बारीक चिरलेला पाला आणि कोथिंबीर, हिरव्या मिरचीचे तुकडे, आलं, लसूण, मीठ, टोमॅटो, मिरेपूड असं सगळं घाला. या चटणीचा छान हिरवागार रंग टिकून राहण्यासाठी यात बर्फाचे काही तुकडेही घालायला हवे. बर्फाचे तुकडे घातले नाही तर चटणी काही वेळात काळी पडू शकते.
यानंतर सगळं मिश्रण मिक्सरमधून फिरवून घेतलं की मुळ्याची चटणी झाली तयार. ही चटणी तुम्ही अशीही खाऊ शकता किंवा मग तिला फोडणी घालूनही खाऊ शकता.
