Join us

पावसाळ्यात खायलाच हवे चमचमीत ब्रेड पॅटिस! झटपट रेसिपी- चहासोबत गरमागरम खाऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2022 13:35 IST

Monsoon Special Bread patties Recipe : बाहेर धुवाधार पाऊस आणि सोबत गरमागरम ब्रेड पॅटीस आणि चहा..आणखी काय हवं...

ठळक मुद्देबारीक चिरलेला कांदा, हिरवी चटणी, चिंचेची चटणी आणि शेव घालून हे पॅटीस खूप मस्त लागतातपावसाळ्यात भजी, वडे यांबरोबरच घरीच करा हॉटेलसारखे गरमागरम ब्रेड पॅटीस, घ्या सोपी रेसिपी...

पावसाळा आला की आपल्याला गरमागरम, चटपटीत खायची इच्छा होते. अशावेळी आपण कधी कांद्याची तर कधी बटाट्याची, मूगाची अशी वेगवेगळी भजी करतो. कधी बटाटे वडे, मेदू वडेही करतो, पण तेच ते खाऊन कंटाळा येतो (Monsoon Special). अशावेळी पोटभरीचे आणि हॉटेलमध्ये मिळणारे काही घरी बनवले तर बच्चेकंपनी खूश होतेच पण मोठेही आनंदाने खातात. पावसाळ्यात बाहेरचे खाल्ल्याने आरोग्य खराब होते, अशावेळी हॉटेलमध्ये मिळणारे पदार्थ घरच्या घरी केले तर आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. (Home made food ) कमीत कमी गोष्टींमध्ये तयार होणारे आणि सगळ्यांना आवडेल असे ब्रेड पॅटीस आपण सकाळच्या नाश्त्याला किंवा चहासोबतही ५ वाजताचा स्नॅक म्हणून खाऊ शकतो. पाहूया चमचमीत-गरमागरम ब्रेड पॅटीस कसे करायचे (Bread patties Recipe)...

(Image : Google)

सकाळी घाईत भराभर टेस्टी भाज्या करायच्या? तयार ठेवा 3 प्रकारची ग्रेव्ही-भाजी चमचमीत

साहित्य -

१. बटाटे- ४ ते ५ मध्यम आकाराचे

२. आलं-मिरची लसूण पेस्ट - १ चमचा 

३. मीठ - चवीनुसार 

४. धने-जीरे पावडर - १ चमचा 

५. लिंबाचा रस - १ चमचा 

६. साखर - अर्धा चमचा 

७. आमचूर पावडर किंवा चाट मसाला - अर्धा चमचा 

८. ब्रे़ड - १० ते १२ स्लाईस 

९. बेसन पीठ - १ वाटी 

१०. कोथिंबीर - अर्धी वाटी बारीक चिरलेली 

११. तेल - २ वाट्या 

(Image : Google)

त्याच त्या भाज्या, आमट्या खाऊन कंटाळलात? करा गरमागरम कढी वडे, झटपट-पौष्टीक रेसिपी...

कृती - 

१. बटाटे उकडून सोलून घ्यावेत 

२. बटाटे स्मॅश करुन त्यामध्ये आलं-मिरची-लसूण पेस्ट, आमचूर पावडर किंवा चाट मसाला, मीठ, साखर, धने-जीरे पावडर, लिंबाचा रस, कोथिंबीर, मीठ, साखर घालून याचे छान मिश्रण करावे. 

३. दोन ब्रेडचे स्लाईस थोडे ओले करुन घ्यावे. त्यामध्ये हे मिश्रण भरावे. 

४. स्लाईसला वरच्या बाजुनेही थोडे पाणी लावावे.

५. बेसन पीठ थोडे घट्टसर भिजवावे.

६. हे तयार झालेले ब्रेड पॅटीस बेसन पीठात घोळवून तळून काढावेत. 

७. तांबूस रंगावर तळल्यावर बाहेर काढावेत. मध्यभागी कापून त्यावर बारीक चिरलेला कांदा, हिरवी चटणी, चिंचेची चटणी आणि शेव घालून खायला द्यावे. 

८. आवडत असेल तर यासोबत तळलेली हिरवी मिरचीही घेता येईल. काहीच नाही तर सॉससोबतही हे पॅटीस अतिशय चविष्ट लागतात.  

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.