Join us

पावसाळा म्हणजे ओव्याच्या पानांची भजी हवीच, कुरकुरीत आणि खमंग, ओव्याचा सुगंध म्हणजे अहाहा!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2025 14:19 IST

Monsoon season special, a must-have dish, crispy and delicious pakoda, the aroma of ova is amazing : ओव्याची भजी नक्की करा. पावसाळ्यात ताजी पाने मिळतात. छान कुरकुरीत खाऊ करा.

ओव्याच्या पानांची भजी ही पारंपरिक मराठी रेसिपी आहे. पावसाळ्यात गावोगावी छान ताजी ओव्याची पाने बहरतात. त्यांचे औषधी उपयोग भरपूर आहेतच. मात्र चवीला ही पाने अगदी मस्त असतात. कांदा भजी, बटाटा भजी, मिरची भजी फार लोकप्रिय आहेत.(Monsoon season special, a must-have dish,  crispy and delicious pakoda, the aroma of ova is amazing ) मात्र ही पारंपरिक ओव्याच्या पानांची भजी आजकाल फार पहायला मिळत नाही ही भजी पूर्वी पावसाळ्यात विशेषतः जूनच्या शेवटी फार लोकप्रिय होती. घरोघरी केली जायची. ओव्याची पाने औषधी गुणधर्मांनी भरलेली असतात. ती पचन सुधारण्यास मदत करतात. त्यामुळे ही भजी चविष्ट असण्यासोबतच आरोग्यासाठीही लाभदायक ठरते. तळण्याऐवजी फक्त परतूनही करता येते. आजकाल एअर फ्राय करणेही शक्य आहे. 

घरच्यांना खास म्हणजे लहान मुलांना एकदा तरी ही भजी खाऊ घाला. त्यांनाही पारंपरिक रेसिपींमधील मज्जा समजेल. करायला हा पदार्थ अगदीच सोपा आहे. इतर भजी जशी करता अगदी तशीच कृती असते. 

साहित्यओव्याची ताजी पाने, बेसन, तांदळाचे पीठ, हळद, लाल तिखट, मीठ, हिंग, धणे-जिरे पूड, बेकींग सोडा, पाणी, तेल  

१.सगळ्यात आधी ओव्याची पाने चांगली स्वच्छ धुवून  घ्या आणि मग पुसूनही घ्या. एक मोठ्या भांड्यात बेसन, तांदळाचे पीठ, थोडी हळद, चमचाभर हिंग घ्या. त्यात थोडे लाल तिखट आणि चवी पुरते मीठ घाला. धणे–जिरे पूड घाला. थोडा अगदी किंचित बेकिंग सोडा घालायचा. नाही घातला तरी चालेल. सारे पदार्थ एकजीव करुन घ्या. त्यात गरम तेल म्हणजेच मोहन घालायचे आणि सर्व साहित्य नीट मिक्स करुन घ्यायचे.

२. आता पाणी घालून मध्यम पातळ असे  पीठ तयार करायचे. त्यात गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्यायची.. तेल गरम करून घ्यायचे आणि मध्यम आचेवर ठेवायचे म्हणजे भजी करपत नाही. ओव्याचे पान पीठात नीट बुडवून घ्या आणि गरम तेलात दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळायचे. 

३. एकदा भजी तयार झाल्यावर तळण्यानंतर कागदावर काढून घ्या. तसे नको तर जाळीदार भांड्यात ठेवा म्हणजे त्यातील तेल निघून जाईल. गरमागरम भजी चहा, चिंच‑गुळाच्या चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा. हिरवी चटणीही मस्त लागेल. 

टॅग्स :अन्नमोसमी पाऊसपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.