Lokmat Sakhi >Food > Monsoon healthcare : लहान मुलांना सुंठगोळी देण्याचा पारंपरिक उपाय, पावसाळी सर्दीखोकल्यानं बुडणार नाही मुलांची शाळा

Monsoon healthcare : लहान मुलांना सुंठगोळी देण्याचा पारंपरिक उपाय, पावसाळी सर्दीखोकल्यानं बुडणार नाही मुलांची शाळा

Monsoon healthcare: Traditional solutions, monsoon cold and cough home remedies, easy recipe for Sunthgoli : लहान मुलांसाठी खास रेसिपी. रोज एक सुंठगोळी ठेवेल अनेक आजार दूर.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2025 14:03 IST2025-07-10T14:02:01+5:302025-07-10T14:03:28+5:30

Monsoon healthcare: Traditional solutions, monsoon cold and cough home remedies, easy recipe for Sunthgoli : लहान मुलांसाठी खास रेसिपी. रोज एक सुंठगोळी ठेवेल अनेक आजार दूर.

Monsoon healthcare: Traditional solutions, monsoon cold and cough home remedies, easy recipe for Sunthgoli | Monsoon healthcare : लहान मुलांना सुंठगोळी देण्याचा पारंपरिक उपाय, पावसाळी सर्दीखोकल्यानं बुडणार नाही मुलांची शाळा

Monsoon healthcare : लहान मुलांना सुंठगोळी देण्याचा पारंपरिक उपाय, पावसाळी सर्दीखोकल्यानं बुडणार नाही मुलांची शाळा

पावसाळा सुरु झाल्यावर हवामानात मोठा बदल होतो. या काळात वातावरण दमट आणि थंड असते. ज्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते. सर्दी, खोकला, ताप, अपचन आणि त्वचारोग यांसारख्या त्रासांना सामोरे जावे लागते. (Monsoon healthcare: Traditional solutions, monsoon cold and cough home remedies, easy recipe for Sunthgoli )अशा वेळी आपल्या आहारात सुंठगोळीचा समावेश करणे फारच फायदेशीर ठरते. सुंठ म्हणजे सुकवलेलं आलं. त्यात उष्णता, अँण्टी-बॅक्टेरियल आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात. तसेच पचनासाठी मदत करणारे गुणधर्म भरपूर असतात. सुंठगोळी ही घरगुती आयुर्वेदिक उपायांपैकी एक असून तिचा नियमित वापर केल्यास पावसाळ्यात होणार्‍या त्रासांपासून सुटका मिळते.

लहान मुलांसाठी ही गोळ फार पौष्टिक आहे. त्यांना रोज एक गोळी खायला द्यायची. सर्दी होणार नाही किंवा खोकलाही होणार नाही. मुले पावसात भिजतात खेळतात चिखलात माखतातही. मात्र मजा करुन झाल्यावर होणारा त्रास टाळण्यासाठी आहारात असे पदार्थ असणे फायद्याचे ठरेल.

साहित्य
सुंठ, गूळ, हळद, तूप, पिठीसाखर   

कृती 
१. सुंठ असेल तर तिची पूड करुन घ्यायची. बाजारात सुंठ पूडही आरामात विकत मिळते. सुंठ पूड घ्यायची त्यात गरम केलेले तूप ओतायचे. काही चमचे तूप ओतल्यावर पूड आणि तूप जरा एकजीव करायचे. हाताने जरा मळून घ्यायचे. 

२. गूळ अगदी व्यवस्थित छान किसून घ्यायचा. एका कढईत किंवा खोलगट पॅनमधे तूप घ्यायचे. जरा पातळ झाले की त्यावर तूप लावलेली सुंठ पूड परतायची. छान खमंग परता. जास्त वेळ लागत नाही. अगदी दोन मिनिटांचे काम आहे. पूड परतून झाल्यावर त्यात चमचाभर हळद घाला. तसेच किसलेला गूळ घाला आणि सतत ढवळत राहा. गूळ पातळ झाल्यावर मिश्रण चिकट आणि घट्ट होईल. अगदीच लगदा होण्याआधी गॅस बंद करायचा. 

३.  मिश्रण जरा कोमट झाल्यावर त्याचे गोळे वळून मस्त गोळ्या तयार करायच्या. गूळ जरा बेताचाच वापरायचा. जास्त गूळ नको. एका ताटलीत थोडी पिठीसाखर घ्यायची. त्यात सगळ्या गोळ्या घोळायच्या. सगळ्या गोळ्या मस्त पांढर्‍या दिसतील लहान मुलांना जास्त तिखटही लागणार नाहीत आणि ते आवडीने खातील.  
 

Web Title: Monsoon healthcare: Traditional solutions, monsoon cold and cough home remedies, easy recipe for Sunthgoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.