Lokmat Sakhi >Food > पुदिन्याची दोन पाने चघळणे ठरते आरोग्यासाठी उपयुक्त, आहारात पुदिना हवाच कारण...

पुदिन्याची दोन पाने चघळणे ठरते आरोग्यासाठी उपयुक्त, आहारात पुदिना हवाच कारण...

mint leaves are beneficial for health, mint is a must in the diet, health tips : आरोग्यासाठी फायद्याचा ठरतो पुदिना. पाहा कसा करायचा उपयोग.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2025 16:35 IST2025-09-01T16:24:43+5:302025-09-01T16:35:47+5:30

mint leaves are beneficial for health, mint is a must in the diet, health tips : आरोग्यासाठी फायद्याचा ठरतो पुदिना. पाहा कसा करायचा उपयोग.

mint leaves are beneficial for health, mint is a must in the diet, health tips | पुदिन्याची दोन पाने चघळणे ठरते आरोग्यासाठी उपयुक्त, आहारात पुदिना हवाच कारण...

पुदिन्याची दोन पाने चघळणे ठरते आरोग्यासाठी उपयुक्त, आहारात पुदिना हवाच कारण...

पुदिना ही अतिशय सुगंधी आणि चविष्ट वनस्पती असून स्वयंपाकात तिचा वापर अनेक प्रकारे केला जातो. पुदिन्याची पाने जेवणाला विशेष चव देतात तसेच शरीराला ताजेतवाने ठेवतात. (mint leaves are beneficial for health, mint is a must in the diet, health tips )भारतीय स्वयंपाकघरात पुदिन्याची चटणी हा एक नेहमीचा पदार्थ आहे. कोथिंबीर, हिरवी मिरची, लिंबाचा रस आदी पदार्थ घालून केलेली ही चटणी पराठा किंवा भातासोबतही अतिशय स्वादिष्ट लागते. पुदिना पराठाही लोकप्रिय असून पिठात पुदिन्याची पाने मिसळून बनवला जातो. उन्हाळ्यात पुदिन्याचे पाणी, ताक किंवा सरबत प्यायल्यास शरीराला गारवा मिळतो आणि तहान भागते. पुदिन्याचा रायता, पुलाव, बिर्याणीमध्ये घालता येतो. सर्दी-खोकल्यात पुदिन्याचा काढा किंवा पुदिन्याचा चहा घेतल्यास आराम मिळतो.

पुदिन्याच्या पानांमध्ये शरीरासाठी आवश्यक अनेक पोषक घटक आढळतात. त्यात जीवनसत्त्व ए, जीवनसत्त्व सी, तसेच फॉलिक अॅसिड, रिबोफ्लेविनसारखी बी कॉम्प्लेक्स जीवनसत्वे असतात. खनिजांमध्ये आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस आणि मँगनीज यांचा समावेश होतो. पुदिन्यातील मेन्थॉल तेल हे विशेष संयुग असून ते शरीराला थंडावा देते, श्वसनमार्ग स्वच्छ ठेवते आणि पचन सुधारते

त्यामुळे पुदिना केवळ चवीसाठीच नाही तर आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहे. पोटातील गॅस, अपचन, पोटफुगी यांसारख्या समस्या असल्यास पुदिना फार उपयोगी ठरतो. त्यातील थंडावा देणारे घटक पचन सुधारतात आणि शरीरातील उष्णता कमी करतात. श्वसनासंबंधी तक्रारींमध्ये पुदिन्याच्या पानांची वाफ घेतल्यास श्वसनमार्ग मोकळे होतात आणि खोकला, सर्दी किंवा दम्याचा त्रास कमी होतो. पुदिन्याचा गारवा मनालाही शांत करतो, त्यामुळे ताणतणाव कमी होतो. तोंडाचा वास दूर करण्यासाठी पुदिन्याची पाने चघळल्यास श्वासही चांगला राहतो. पुदिन्यात नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्म असल्यामुळे तो शरीराला संसर्गांपासून वाचवतो. त्वचेतील दाह, उष्णता किंवा केस गळती यावरही पुदिन्याचा उपयोग होतो. उन्हामुळे होणारे त्रास कमी करण्यासाठी पुदिना सरबत शरीरासाठी फायद्याचे ठरते. निर्जलीकरण टाळता येते. 

एकूणच पुदिना ही एक साधी पण बहुगुणी वनस्पती आहे. तिच्यापासून केले जाणारे पदार्थ चविष्ट असतातच आणि त्याचबरोबर आरोग्यालाही पोषक ठरतात. नियमित आहारात पुदिन्याचा समावेश केल्याने पचन सुधारते, श्वसन व्यवस्थित राहते, शरीराला थंडावा मिळतो. त्यामुळे पचनाचा काही त्रास होत असेल तर पुदिना नक्की खा. 

Web Title: mint leaves are beneficial for health, mint is a must in the diet, health tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.