हिवाळ्यात आवर्जून बाजरी खायला पाहिजे. कारण बाजरी उष्ण असते. त्यामुळे हिवाळ्यात शरीरात उब निर्माण होण्यासाठी बाजरी खाणे फायदेशीर ठरते. बाजरीमध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन बी ६, मॅग्नेशियम, फायबर यांचे प्रमाण जास्त असल्याने ती पचनक्रिया चांगली होण्यासाठी मदत करते. ज्या लोकांना वजन कमी करायचं आहे, त्यांच्यासाठीही बाजरी खाणं योग्य आहे. पण आता बाजरीची भाकरी काही सगळ्यांनाच आवडत नाही. त्यामुळे ज्यांना भाकरी आवडत नाही, त्यांनी तर बाजरीची खिचडी आवर्जून करून खायला हवी (Winter food bajara khichadi recipe). हा पारंपरिक पदार्थ अतिशय चवदार आणि खमंग तर आहेच (how to make bajari khichadi?) पण तब्येतीसाठीही अतिशय पौष्टिक आहे.(bajarichi khichadi recipe in Marathi)
बाजरीच्या खिचडीची रेसिपी
साहित्य
१ वाटी बाजरी,
अर्धी वाटी मुगाची डाळ,
८ ते १० लसूण पाकळ्या,
डॉ. श्रीराम नेनेंचा सल्ला, हिवाळ्यात आजारी पडायचं नसेल तर करा ५ गोष्टी -सर्दी खोकला होणार नाही
१ इंच आल्याचा तुकडा,
१- २ हिरव्या मिरच्या,
१ टेबलस्पून शेंगदाणे
फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, कडिपत्ता आणि २ ते ३ लाल मिरच्या
चवीनुसार लाल तिखट आणि मीठ
कृती
सगळ्यात आधी बाजरी धुवून घ्या आणि ती तासभर पाण्यात भिजू द्या. त्यानंतर धुतलेली बाजरी थोडी पुसून एका स्वच्छ कापड्यावर पसरवून ठेवा.
पेरू भाजून खाण्याचे फायदे माहिती आहेत? बघा पेरू खाण्याची खास पद्धत- वजन उतरेल भराभर
२ ते ३ तासांनी अर्धवट सुकलेली बाजरी मिक्सरमधून थोडी जाडीभरडी वाटून घ्या. अगदी पीठ करू नये.
गॅसवर कुकर गरम करायला ठेवा. त्यामध्ये तेल, मोहरी, हिंग, लसूण, मिरच्या, आल्याची पेस्ट, कडिपत्ता टाकून फोडणी करून घ्या.
फोडणी झाल्यानंतर कुकरमध्ये बाजरीचा भरडा आणि मूगाची डाळ हे मिळून जेवढे असेल त्याच्या दुप्पट पाणी टाकावे. पाण्याला उकळी येताच बाजरीचा भरडा आणि मुगाची डाळ पाण्यात टाकावी, चवीनुसार मीठ घालावे आणि मध्यम आचेवर ३ ते ४ शिट्ट्या होईपर्यंत बाजरी शिजवनू घ्यावी.
कमी वयातच व्हेरीकोज व्हेन्सचा त्रास सुरू झाला? ३ गोष्टी अजिबात करू नका, दुखणं कमी होईल
दुसरीकडे एका छोट्या कढईमध्ये तेल, मोहरी, जिरे, हिंग, कडिपत्ता, लाल मिरच्या टाकून फोडणी करून घ्यावी. बाजरीची खिचडी ताटात वाढल्यानंतर त्यावर वरतून फोडणी घालावी आणि खावे.. हा उबदार पदार्थ नक्कीच घरातल्या सगळ्यांना खूप आवडेल.