सहलीला जाताना आपण मुलांना डब्यामध्ये मेथीचे पराठे बरेचदा देतो. ते चवीला छान लागतात. मुलांना आवडतात. बरोबर सॉस असला की काय मुलं खुष. (methi puri recipe : easy to make and storable for 4 to 5 days)मेथीसारखे पदार्थ फार पौष्टिक असतात. त्यामुळे ते खावे. मेथीपासून विविध पदार्थ तयार करता येतात. त्यापैकीच एक म्हणजे मेथीची पुरी. ही तयार करायला फारच सोपी आहे. एकदम कुरकूरीत होते. (methi puri recipe : easy to make and storable for 4 to 5 days)जास्त तेलकटही होत नाही. पण टिकायला मात्र ४ ते ५ दिवस आरामात टिकते. साधा वासही लागत नाही. एकदा तयार करून झाल्यावर हवाबंद डब्यामध्ये ठेवायच्या एवढाच काय तो नियम. चहाशी खायला ही फारच छान लागते.
साहित्य :मेथी, मीठ, मिरची, लाल तिखट, तेल, कोथिंबीर, कणीक, ज्वारीचे पीठ, बेसन, ओवा, जीरं, हळद
प्रमाण : (methi puri recipe : easy to make and storable for 4 to 5 days)२ वाटी कणीक घेतली की अर्धी वाटी ज्वारीचे पीठ घ्यायचे. तेवढंच किंवा अर्ध्याहून थोडं कमी बेसनाचं पीठ वापरा. बाकी पदार्थ चवीनुसार वापरायचे.
कृती:१. मस्त ताजी मेथी धुऊन घ्या. जरा पाणी निथळलं की बारीक चिरून घ्या. कोथिंबीरही बारीक चिरून घ्या. २. त्यामध्ये मिरची बारीक चिरून घाला. आता मेथीमध्ये थोडं गरम तेल घाला. त्यात जीरं हळद लाल तिखट, मीठ घाला. सगळं छान एकजीव करून घ्या.३. एका भांड्यात कणीक, ज्वारीचे पीठ, बेसन एकत्र करून घ्या. मग ते पीठ मेथीच्या मिश्रणामध्ये टाका. त्यामध्ये गरजेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्या. पोळीच्या पीठापेक्षा थोडं मऊ पीठ भिजवायचं.
प्रवासासाठी अशा पुऱ्या फार फायदेशीर ठरतात. नाश्त्यासाठी तर एकदम मस्त बेत आहे. तयार करून ठेवायच्या आणि खात राहायच्या.