Lokmat Sakhi >Food > तब्बल आठवडाभर टिकणाऱ्या मेथीच्या पुऱ्या! प्रवासात न्या नाहीतर चहासोबत खा पोटभर-पाहा रेसिपी

तब्बल आठवडाभर टिकणाऱ्या मेथीच्या पुऱ्या! प्रवासात न्या नाहीतर चहासोबत खा पोटभर-पाहा रेसिपी

methi puri recipe : easy to make and storable for 4 to 5 days : नाश्त्यासाठी किंवा प्रवासासाठी तयार करा मस्त घरगुती मेथी पुरी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2025 08:15 IST2025-03-05T08:12:34+5:302025-03-05T08:15:01+5:30

methi puri recipe : easy to make and storable for 4 to 5 days : नाश्त्यासाठी किंवा प्रवासासाठी तयार करा मस्त घरगुती मेथी पुरी.

methi puri recipe : easy to make and storable for 4 to 5 days | तब्बल आठवडाभर टिकणाऱ्या मेथीच्या पुऱ्या! प्रवासात न्या नाहीतर चहासोबत खा पोटभर-पाहा रेसिपी

तब्बल आठवडाभर टिकणाऱ्या मेथीच्या पुऱ्या! प्रवासात न्या नाहीतर चहासोबत खा पोटभर-पाहा रेसिपी

सहलीला जाताना आपण मुलांना डब्यामध्ये मेथीचे पराठे बरेचदा देतो. ते चवीला छान लागतात. मुलांना आवडतात. बरोबर सॉस असला की काय मुलं खुष. (methi puri recipe : easy to make and storable for 4 to 5 days)मेथीसारखे पदार्थ फार पौष्टिक असतात. त्यामुळे ते खावे. मेथीपासून विविध पदार्थ तयार करता येतात. त्यापैकीच एक म्हणजे मेथीची पुरी. ही तयार करायला फारच सोपी आहे. एकदम कुरकूरीत होते. (methi puri recipe : easy to make and storable for 4 to 5 days)जास्त तेलकटही होत नाही. पण टिकायला मात्र ४ ते ५ दिवस आरामात टिकते. साधा वासही लागत नाही. एकदा तयार करून झाल्यावर हवाबंद डब्यामध्ये ठेवायच्या एवढाच काय तो नियम. चहाशी खायला ही फारच छान लागते. 

साहित्य :
मेथी, मीठ, मिरची, लाल तिखट, तेल, कोथिंबीर, कणीक, ज्वारीचे पीठ, बेसन, ओवा, जीरं, हळद 

प्रमाण : (methi puri recipe : easy to make and storable for 4 to 5 days)
२ वाटी कणीक घेतली की अर्धी वाटी ज्वारीचे पीठ घ्यायचे. तेवढंच किंवा अर्ध्याहून थोडं कमी बेसनाचं पीठ वापरा. बाकी पदार्थ चवीनुसार वापरायचे.   

कृती:
१. मस्त ताजी मेथी धुऊन घ्या. जरा पाणी निथळलं की बारीक चिरून घ्या. कोथिंबीरही बारीक चिरून घ्या. 
२. त्यामध्ये मिरची बारीक चिरून घाला. आता मेथीमध्ये थोडं गरम तेल घाला. त्यात जीरं हळद लाल तिखट, मीठ घाला. सगळं छान एकजीव करून घ्या.
३. एका भांड्यात कणीक, ज्वारीचे पीठ, बेसन एकत्र करून घ्या. मग ते पीठ मेथीच्या मिश्रणामध्ये टाका. त्यामध्ये गरजेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्या. पोळीच्या पीठापेक्षा थोडं मऊ पीठ भिजवायचं.


४. थोडावेळ पीठ बाजूला ठेवायचे. त्याला तेल लावून मळून घ्यायचे. अति पातळ पुरी लाटायची नाही. जराशी जाडसर पुरी लाटा. तेल तापवून घ्या. त्यामध्ये लाटलेल्या पुऱ्या तळून घ्या. जाळीदार भांड्यात ठेवा म्हणजे तेल उरणार नाही. मस्त कुरकूरीत अशा पुऱ्या तयार होतात.                     

प्रवासासाठी अशा पुऱ्या फार फायदेशीर ठरतात. नाश्त्यासाठी तर एकदम मस्त बेत आहे. तयार करून ठेवायच्या आणि खात राहायच्या.  

Web Title: methi puri recipe : easy to make and storable for 4 to 5 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.