Join us
Daily Top 2Weekly Top 5

मटारचा मौसम आणि खाण्याची चंगळ! मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी करा मटार-पनीर सँडविच, सुपरहेल्दी पदा‌र्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2026 17:13 IST

Winter Special Matar Paneer Sandwich Recipe: सध्या बाजारात ताजे मटार भरपूर प्रमाणात मिळत आहेत. त्यामुळे मटार पनीर सॅण्डविच ही रेसिपी एकदा ट्राय करून पाहा..(how to make matar paneer sandwich?)

हिवाळ्यात हिरव्यागार मटारच्या शेंगा पाहिल्या की त्या घेऊन खाण्याचा मोह होतोच. मटारचा टपोरा दाणा नुसता तसाच खायला तर छान लागतोच पण त्यासोबतच आपण त्याच्या कित्येक वेगवेगळ्या रेसिपीही करू शकताे. अशीच एक रेसिपी म्हणजे मटार पनीर सॅण्डविच. तसंही सॅण्डविच लहान मुलांसकट मोठ्या माणसांनाही मनापासून आवडतं. त्यात आपण मटार आणि पनीर हे दोन भरपूर प्रोटीन्स देणारे पदार्थ घालणार आहोत. त्यामुळे तर हे मटार पनीर सॅण्डविच खूप पौष्टिकही होतं. त्यामुळे या रेसिपीचा विचार तुम्ही मुलांच्या डब्यासाठी तसेच नाश्त्यासाठी नक्कीच करू शकता (how to make matar paneer sandwich?). मटार पनीरची ही खास रेसिपी सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी शेअर केली आहे.(Winter Special Matar Paneer Sandwich Recipe by Kunal Kapoor)

मटार पनीर सॅण्डविच रेसिपी

 

साहित्य

ब्रेड स्लाईस

१ वाटी मटार आणि तेवढेच किसलेले पनीर

बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर

ऐन तिशीत सांधे दुखतात, उठताबसता अंगदुखी छळतेय? ‘हे’ पदार्थ रोज खा, दुखणं जाईल पळून

पुदिना चटणी आणि टोमॅटो सॉस चवीनुसार

धनेपूड, चाट मसाला, गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि कसूरी मेथी

१ टेबलस्पून बटर आणि बारीक चिरलेला कांदा

कृती

 

मटार पनीर सॅण्डविच करण्यासाठी एक कढई गॅसवर ठेवून गरम करून घ्या. त्यानंतर तिच्यामध्ये बटर घाला आणि थोडंसं मीठ घालून मटार हलकेसे परतून घ्या.

यानंतर मऊ झालेले मटार मॅश करून घ्या. त्यामध्ये किसलेलं पनीर, कोथिंबीर, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि कांदा, धणेपूड, चाट मसाला, कसूरी मेथी, गरम मसाला, चवीनुसार मीठ घालून सगळे पदार्थ व्यवस्थित एकजीव करून घ्या.

वेटलॉस, डाएटिंगच्या नादात स्वत:ची किडनीच तर खराब करत नाही ना? फिटनेस प्रेमींनो एकदा 'हे' वाचाच...

यानंतर २ ब्रेड स्लाईस घ्या. एका स्लाईसला पुदिना चटणी आणि दुसऱ्या स्लाईसला टोमॅटो केचअप लावा. यानंतर तयार केलेलं बॅटर दोन ब्रेडच्यामध्ये ठेवून ते बटर लावून ग्रील करून घ्या. किंवा तव्यावर ठेवून दोन्ही बाजूंनी भाजून घ्या. गरमागरम, चटपटीत मटार सॅण्डविच तयार..

 

English
हिंदी सारांश
Web Title : Delicious Matar Paneer Sandwich: A protein-packed recipe for kids!

Web Summary : This winter, try the Matar Paneer Sandwich, a protein-rich recipe perfect for kids' lunchboxes or a healthy breakfast. Celebrity Chef Kunal Kapur shared this easy and nutritious recipe. It's made with peas, paneer, and spices, offering a tasty and wholesome meal.
टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.हिवाळाहिवाळ्यातला आहार